Skip to main content

पाककृती हवी आहे! मिर्ची का सालान!

लेखक संजय अभ्यंकर यांनी शनिवार, 04/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
हैदराबादी बिर्याणी बरोबर वाढले जाणारे मिर्ची का सालान जसे बनवतात?

वाचने 2956
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

तरला दलाल ची रेसिपी आहे. साहित्यः २ कप जाड हि. मिरच्या किंवा ढोबळी मिरची ..जाड लांबट आकारात कापून , १ चमचा जिरे, १/२ चमचा मोहरी , १/४ चमचा मेथ्या (मेथी बी) , १/४ चमचा कलौंजी (कांदा बी) १/४ चमचा हळ्द, २ चमचे धने जीरे पूड , २ चमचे तिखट (लाल मिरची पूड) ६-७ कडीपत्त्याची पाने , १ चमचा चिंचेचा कोळ , कोथिंबिर चिरून , तेल, चवीनुसार मीठ, दाणे तीळ कूटासाठी - २ चमचे शेंगदाणॅ, २ चमचे तीळ , १ चमचा जीरे मिक्सर मधून कोरडेच वाटून घेणे. ओल्या मसाल्यासाठी - ६ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले , १ कप चिरलेला कांदा, १/२ चिरलेला टोमॅटो , ३ मोठे चमचे ताजा खोवलेला नारळ. सर्व पदार्थ लागेल तसे थोडे पाणी घालून मिक्सर मधून वाटून घ्यावेत. कृती: लांबट आकारात मिरच्या कापून घ्याव्यात. आतील बी काढून टाकावे. कढईत तेल गरम करून मिरच्या किंचित पांढरट रंग येईपर्यन्त तळून घ्याव्यात. बा़जूला काढून ठेवाव्यात. त्याच तेलात जीरे , मोहरी, कलौंजी, मेथ्या आणी कडीपता टाकावा. मोहरी तडतडली की ओला मसाला घालावा. २ मिनिटे परतावा. हळद, धने जिरे पूड , लाल तिखट , दाणे-तीळ पूड घालावी. सर्व नीट मिक्स करून घेऊन मध्यम आचेवर तेल सुटेपर्यन्त परतत रहावे. २ कप पाणी घालावे. चिंचेचा कोळ घालावा. उकळी येऊ द्यावी. मग तळलेल्या मिरच्या घालाव्यात. कोथिंबीर् मीठ घालून ग्रेव्ही घट्टसर होईपर्यंत शिजू द्यावे. गरमागरम वाढावे. mirchi ka salan फोटो आंतरजालावरून साभार.