शासनाने कडक नियम करूनसुद्धा रॅगिंगने नुकतेच पुन्हा काही बळी मिळवले आहेत. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून माझ्याही रॅगिंगविषयी काही आठवणी जाग्या झाल्या.
अर्थातच आता सगळेच हास्यास्पद वाटते, वाटतं की तेंव्हा उगीचंच आपण इतके घाबरलो, पण फर्स्ट इयरला 'सिनियर' म्हटले की पोटात गोळा उभा राह्यचा. त्यातून फायनलमधल्या एका किडकिडीत सरदारजीचा दरारा खूपच होता. सगळे हॉस्टेलाइट्स चळचळ कापत असत. तो मध्यरात्री सगळ्यांना फक्त बनियन-चड्डीवर भर पुणे-बंगळूर हायवेवर नेत असे व एखादी बस जवळून पास झाली की सगळ्यांना कोरसमध्ये 'हम सब चूत्ये हैं ! अशी गर्जना करायला लावीत असे. मूड वेगळा असेल तर चूत्येच्या ऐवजी गांडू वा भोसडीवाले असे किरकोळ बदल तो सुचवित असे. जसबीर हॉस्टेलमध्ये शिरताक्षणी पळापळ होत असे, फटाफट दारं लागत.
आता हसू येतं पण वेगवेगळ्याप्रकारचे सॅल्यूट करणे (तेही सुंदर मुलींपुढे जाऊन) हाही रॅगिंगमधला लोकप्रिय प्रकार होता. बायोकेमिस्ट्री सॅल्यूट, हिमॅट सॅल्यूट, इ. बायोकेम सॅल्यूट म्हणजे एका पायावर उभं राहायचं, एक हात ढुंगणावर, दुसरा डोक्यावर नागाच्या फण्यासारखा धरून जीभेने वेडावून दाखविणे ! बघणार्यांची चांगलीच करमणूक होत असे. माझ्या एका मित्राला जसबीरने शर्टामध्ये हेल्मेट ठेवून गरोदर बाईसारखे चालत जाऊन लाऊंजमध्ये भीक मागायला लावली होती. ह्या सगळ्या प्रकाराला 'इंट्रोडक्शन ऍन्ड ओरिएंटेशन' असे गोंडस नाव होतं. जसबीरला गुड मॉर्निंग सर न म्हटल्याबद्दल शिक्षा म्हणून माझा एक मित्र डिसेक्शन रूममधल्या प्रेताचे दात घासून आला होता ! (पुढचे दोन दिवस तो स्वतःचे सुद्धा दात घासत नव्हता :)
सुदैवाने मी लोकलाइट होतो त्यामुळे त्यामानाने माझं रॅगिंग कमी झालं. साधारणतः जेवणाच्या सुट्टीत आणि कॉलेज संपताना रॅगिंगसाठी बकरे धरले जायचे. मी भितीपोटी लंच ब्रेकमध्ये वर्गाबाहेर पडतच नसे, हात धुवायला जातांनासुद्धा दबकत दबकत जात असे. कॉलेज सुटल्यावर टिचिंग स्टाफच्या मागोमाग लपत छपत पार्कींगपर्यंत जायला लागायचं. पण असं किती दिवस दडणार? एक दिवस मीही जसबीरच्या तावडीत सापडलो..
(क्रमशः)
वाचने
9733
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
तो
वा ... काय मुडी आहे :)
In reply to तो by घाशीराम कोतवाल १.२
माझ्याही काही आठवणी
आम्ही
In reply to माझ्याही काही आठवणी by योगी९००
हो..
In reply to आम्ही by सुहास
मुख्य फरक
In reply to माझ्याही काही आठवणी by योगी९००
हो बरोबर..
In reply to मुख्य फरक by भडकमकर मास्तर
मला पेढा?
जबर्या
In reply to मला पेढा? by प्रकाश घाटपांडे
[अवांतरः धीटपणा]
In reply to मला पेढा? by प्रकाश घाटपांडे
(विषय दिलेला नाही)
In reply to [अवांतरः धीटपणा] by प्रदीप
स्वतःविषयी
In reply to [अवांतरः धीटपणा] by प्रदीप
मजेशीर ?
बनियन
णंगेसे तो
In reply to बनियन by विनायक प्रभू
पुढची?
In reply to बनियन by विनायक प्रभू
दोन्ही
In reply to पुढची? by प्रकाश घाटपांडे
ब्रेन वॉश
माझा एक
आमच्या
आयला
रॅगिंग हा
In reply to आयला by मराठमोळा
सहमत
In reply to रॅगिंग हा by रेवती
मला तुमचे
In reply to आयला by मराठमोळा
वरच्या "या
हे ग्लोरिफिकेशन नव्हे
In reply to वरच्या "या by मराठी_माणूस
ही मुलभुत
In reply to हे ग्लोरिफिकेशन नव्हे by प्रकाश घाटपांडे
शब्दकोष
In reply to ही मुलभुत by मराठी_माणूस
र्यागिंग
काय वाक्य
In reply to र्यागिंग by घाटावरचे भट
हम्म! सुरवा
मी पण कधी
In reply to हम्म! सुरवा by विसोबा खेचर
विटा
In reply to मी पण कधी by llपुण्याचे पेशवेll
आपला, (सज्ज
In reply to हम्म! सुरवा by विसोबा खेचर
खरेय अगदी
In reply to आपला, (सज्ज by नरेश_
अभाविपचा
एखादा अनुभव
In reply to अभाविपचा by विशाल कुलकर्णी
नो रॅगिंग एट ऑल.........
जमले नाही. खपवून घेतले नाही..