Skip to main content

( णडू णको )

लेखक टारझन यांनी गुरुवार, 14/05/2009 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , " टार्‍याच्या डोस्क्यातले " ह्या अत्यंत मनापासून विचारपुर्वक (कि विचारपश्चिमक?) लिहीलेल्या णिबंधात्मक विडंबणातला हा कितवा तरी प्रयत्न ... पचनी पाडून घ्या ... नाय तर तापलं तापलं पघा :) रंगेश्वरम ह्यांचं "के व ळ अ प्र ति म " विडंबण '(सोडू नको)' ही वाचल्यावर हिणकसगिरी सोडू नको असे आमच्या मनाने बजावलेच! म्हणूनच एक मनापासून विचारपुर्वक लिहिलेलं विडंबण स्क्वेयर =)) णडू णको . . मेला निम्मा तरी चोपायचे सोडू नको! अन प्रसंगी नडग्या फोडायचे सोडू नको!
Taxonomy upgrade extras

जाग

लेखक स्वप्नयोगी यांनी गुरुवार, 14/05/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
तू दूर असताना मनात तुझी आठवण उमलते आणि जागेपणी देखील माझ्या स्वप्नांना जाग येते

मिपा मंत्रिमंडळासाठी शिफारशी पाठवा !!

लेखक अनंता यांनी गुरुवार, 14/05/2009 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सगळ्यांनीच ह. घ्या. कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता आणि नाही. यादीत आपले नाव नसल्यास मिपा आमदारांनी नाराज होऊ नये. (एकूण २० भाग आहेत. प्रत्येकाला कुठे ना कुठे सामावून घेण्यात येईल. ;) ) मंत्रिमंडळातील ६ जागा रिक्त ठेवण्यात येतील. माननीय स्त्री-सदस्यांसाठी ३३% आरक्षण ठेवण्यात येईल. बहुमताने खातेवाटप / खांदेपालट करण्यात येईल. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम राहिल. सर्व मिपा-सदस्यांसाठी : आंतर्जालिय पंचवार्षिक निवडणूकीत मिपा आघाडीला तब्बल दोन-तृतीयांश बहुमत मिळाले असून लवकरच खातेवाटप जाहीर होईल.

मोबाइलचा टॉवर

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 14/05/2009 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच नविन जागेत रहायला आलोय. २० जणांची सोसायटी आहे. जरा कोठे स्थिर होतोय तोच बिल्डरने मोबाइलचा टॉवर इमारतीवर लावायला सुरवात केली. आता प्रोब्लेम असा आहे की अजुन सोसायटी फॉर्म झाली नाही, त्यामुळे जरी टॉवरला सगळ्या सभासदांचा विरोध असला तरी सोसायटीच्या जागेची मालकी कुणाची हा प्रश्न आहे. इमारतीच्या भोवतालची जागा आणि गच्ची यांचा आधिकार या काळात कुणाकडे असतो? विकासक अशा प्रकारे त्याचा फायदा घेवु शकतो का? मिपावरील जाणकारांनी कृपया मत द्यावे.

नयन मोहणारे नैनीताल - भाग २

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 14/05/2009 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या दिवशी पाच वाजता आम्ही उठलो तेव्हा आम्हाला कळलं की आपण उगाच लवकर उठलो आहोत. सगळेजण डाराडूर झोपले असताना आम्ही फुकटच एक तास लवकर उठलो. खरं तर सहा वाजता उठायचं होतं. मग आम्ही मिळालेला तास तरी का सोडावा? लगेच झोपून गेलो. तो एकदम सव्वा सहा वाजता जागे झालो. तेव्हा आम्हा सगळ्यांना आमच्यातल्याच दोघा मित्रांनी उठवलं. आदल्या रात्री आमच्यातला एकजण पत्ते खेळायच्या आधीच झोपला होता. तोच आम्ही अजुनही बिछान्यावर रेंगाळत पडलेला पाहिला. जेव्हा सगळेजण 'फ्रेश' होऊन आलो, तेव्हाही त्याने फक्त दात घासून कप़डे बदलले होते.

चुकले का हो ?

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 14/05/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
(इलाही जमादारांच्या 'चुकले का हो ? ' ह्या अत्यंत सुंदर गझलेचे एक असुंदर विडंबन) श्वसुराला, त्रास म्हणालो, श्वसुराला, त्रास म्हणालो, चुकले का हो? मेहुणीला, 'लै खास' म्हणालो, चुकले का हो? (उरली) चिरंजीव वेदना, मस्तकी, हळहळणारी (कसली बर ? ) भाचरांना (तिच्या) , बकवास म्हणालो, चुकले का हो? बुडत्याला, तरण्यासाठी, काय लागते?
Taxonomy upgrade extras

माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..२

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/05/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे -- १ १) संगीत पुण्यप्रभाव व संगीत राक्षसी महत्वाकांक्षा या दोन नाटकांची १९५० सालातली कोकणातल्या गुहागरातील जाहिरात. नटवर्य नानासाहेब फाटक, मास्टर दामले (नूतन पेंढारकर), मा दत्ताराम अशी मातबर ष्टार कास्ट! जाहिरातींवरून गुहागरातले दामले नावाचे कुणी वकील नाटकाची तिकिटं विकण्याचे काम पाहात असत असं जाहिरातीतून कळतं!

सोबत

लेखक जागु यांनी गुरुवार, 14/05/2009 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाच्या वाटेवर असावी सोबत कर्म, प्रेम्,संयम, ज्ञानाची संगत असावे तृप्ती, आनंद, समाधान रांगत सगुण घोळक्याची असावी सोबत दुर्गुणांना झाडण्या गुणांची संगत एकांतालाही करावी सोबत बरसणार्‍या सुख, दु:खाना झेलत आधारा द्यावा निराधारास क्षणभर असावी निर्मळ, निर्व्याज सोबत चुकलेली वाट दाखवण्यास सोबत .
Taxonomy upgrade extras

हर्क्युलस मी होणार

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 14/05/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
काल कधी नाही ते वैकुंठात गेलो होतो. जवळच्या स्नेह्यांचा पत्ता कट झाला होता. बाकीचे विधी चालु असताना त्यांच्याच ऑफिस मधल्या दोन तरुणांमधला संवाद सहज कानावर आला. "यार, अती तेथे माती म्हणतात ते हेच.. पिकनीकला गेला होता, तिथेच खपला. सिलदेफिनाल चे बळी. नॅन्ड्रेनॉल पण घेत होता." नाव ऐकुन आधी वाटले च्यायला कोकेन वगैरे आजकल 'पुराने जमाने की बात' वगैरे झाले का काय? 'जंगलात' हे नवीन ड्र्ग्ज कुठले आलेत ? हा काय प्रकार बॉ? गुगुल बाबाला विचारायचे ठरवले. पण नीट स्पेलींग नव्हते माहीत. म्हणुन 'कामशेत' मुक्त विद्यापिठांच्या कुलगुरुना फोन लावला. गुरुवारी सुट्टी ह्यांना.