(सोडू नको)
प्रेषक, चतुरंग, Tue, 12/05/2009 - 22:28
मिल्या ह्यांची अप्रतिम गजल 'सोडू नको' ही वाचल्यावर विडंबनधर्मा सोडू नको असे आमच्या मनाने बजावलेच! 
संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको!
अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको!
तू तिच्यापासून नक्की वाचशी, सांगू कसे?
हेलमेटा रोज तू घालायचे सोडू नको!
केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी
रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको!
काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो?
तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको!
पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे
बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको!
काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला
गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको!
चतुरंग
प्रतिक्रिया
हा हा हा ...
हा हा हा ...
रस्सा आणि अंगणी पडणारे केस आवडले.
-- लिखाळ.
-- लिखाळ.
तेच ते तेच ते !
हा हा हा
रंगाशेठ,
एकदम जब्राट विडंबन.. चालू दे..
केशवसुमार
रस्सा, सलमान आणि
खर्ज हे शेर विशेष आवडले रे
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
रस्सा, थिरकणे
विशेष!
(वाचक)बेसनलाडू
खि: खि: खि:..
नेहमीप्रमाणेच मस्त.
काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला
गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको! ..... खरंच भारी!!
राघव
संपला
संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको!
अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको!
मस्त रे रंगा!
तात्या.
-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!
वा
चालू द्या. हे आपले म्हणायचे म्हणून, हे आम्ही सांगण्यासाठी तुम्ही थोडेच थांबणार आहात...
पाहिजे तर
पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे


बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको!
लै भारी इडंबन !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
मस्तच
"केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी
रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको!
काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो?
तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको!"
बारीक निरीक्षण.
प्र. के. अत्रेंची आठवण झाली.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
एक नंबर
चतुरंगराव, एकदम झकास विडंबन.
(विषय दिलेला नाही)
---------------------------------------------------------------------------------------
© "बादवे"
कोंबायचे !!
कोंबायचे !! आवडले.
प्रतिसाद देण्याचे न सोडलेल्या आणि सोडलेल्या
अशा सर्व रसिकांचे आभार!
चतुरंग
लय लय भारी...
एक नंबर ईडंबन
मज्जा आली...
जबरी
जबरी विडंबन.
>
आवडले..
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
झकास
झकास विडंबन...
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
मदनबाण.....
Eesha Khare: California Teen Invents Life-Changing Instant Phone Charger
मस्तच !
मस्तच !
--अवलिया
--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..
लै भारी
मूळ कविता नाही वाचली, तरी स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणुन सुद्धा कविता आवडली .
कपाळ करंटा
भारी
'कोंबा'यचे बेष्ट! बाकी गळणार्या केसांचा विषय हा अगदी जिव्हाळ्याचा दिसतो आहे
[उदा. (फिरवतो हात)]
(समदु:खी गॉन-केस) नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आवडले
गॉन-केस आवडलं. तुझ्या दुःखात लांबूनच सहभागी आहे.
हेहेहे
मस्तच विडंबन! गॉन केस (काका) लोकांना सहानुभूतीदेखील दर्शवून घेते.
अदिती
Belle de jour - स्त्रीच्या लैंगिकतेचा शोध
-- स्वाक्षरी सल्लागार कार्यकर्ते यांच्याकडून प्रीअप्रूव्ह्ड
मजा आली वाचतांना !
संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको!
अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको!
मलाबी हेच आवडले !