Skip to main content

मिपा मंत्रिमंडळासाठी शिफारशी पाठवा !!

लेखक अनंता यांनी गुरुवार, 14/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सगळ्यांनीच ह. घ्या. कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता आणि नाही. यादीत आपले नाव नसल्यास मिपा आमदारांनी नाराज होऊ नये. (एकूण २० भाग आहेत. प्रत्येकाला कुठे ना कुठे सामावून घेण्यात येईल. ;) ) मंत्रिमंडळातील ६ जागा रिक्त ठेवण्यात येतील. माननीय स्त्री-सदस्यांसाठी ३३% आरक्षण ठेवण्यात येईल. बहुमताने खातेवाटप / खांदेपालट करण्यात येईल. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम राहिल. सर्व मिपा-सदस्यांसाठी : आंतर्जालिय पंचवार्षिक निवडणूकीत मिपा आघाडीला तब्बल दोन-तृतीयांश बहुमत मिळाले असून लवकरच खातेवाटप जाहीर होईल. संसदीय पक्षनेतेपदासाठी सर्वानुमते श्रीयुत विसोबा खेचर यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. शपथविधी लवकरच शिवाजी पार्कवर होईल. शपथविधीसाठी कॅबिनेट मंत्र्यांची प्राथमिक यादी जाहीर करीत आहोत. श्री. विसोबा खेचर : मुख्यमंत्री . अर्थ, सांस्कृतिक विभाग, महसूल, दारुबंदी. श्री. नीलकांत : उपमुख्यमंत्री. उद्योग, सहकार, माहिती व तंत्रज्ञान. श्री. क्लिंटन : पणन, अर्थ व नियोजन. ३_१४ विक्षिप्त अदिती : गृहमंत्री, हुच्च व तंत्रशिक्षण. श्री विनायक प्रभू : युवा कल्याण, कुटूंब-कल्याण,रोज गार हमी योजना. ;) श्री ब्रिटिश : आदिवासी विकास, उत्पादनशुल्क, खारजमिन व बंदरे विकास. श्री आनंद घारे : अंधश्रद्धा निर्मूलन. सौ. स्वाती दिनेश : अन्न व नागरीपुरवठा. सौ जागु : महिला व बालकल्याण. श्री. दिलीप बिरुटे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण. श्री. श्रीकृष्ण सामंत : अल्पसंख्याक मंत्री. डॉ. श्री. प्रसाद दाढे : आरोग्यशिक्षण व अवजड वाहन परिवहन. श्री. भडकमकर मास्तर : सार्वजनिक आरोग्य. श्री. पाषाणभेद : कृषी, जलसंधारण. सर्व सन्माननीय सदस्यांनी इतर मंत्रीपदासाठी नावे सुचवावीत.

वाचने 10782
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

आवलीया : वनखाते (फोरेस्ट डीपार्ट्मेन्त) :-? चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

मंत्रीमंडळाचा .नेहमीप्रमाणे कोकणावर अन्याय नको हा?

कुन्दन : एक्स्तर्नल अफेअर्स (फोरेन मिनिस्त्रि) ;) चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

आम्ही एक्स्तर्नल वा इंतर्नल अशी कोणतीही अफेअर्स निस्तरु इच्छित नाही... बिपिनदांसाठी आम्ही "एक्स्तर्नल अफेअर्स" मंत्री पद मोकळे सोडतोय...

श्री. विसोबा खेचर : मुख्यमंत्री . अर्थ, सांस्कृतिक विभाग, महसूल, दारुबंदी. काय तरीच काय? दारुमुक्ती म्हणा. म्हणजे मुक्तपणे दारू मिळेल अशा अर्थी. दारूपासून मुक्ती नव्हे. ;) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

In reply to by प्रमोद देव

हीच तर खरी गोम आहे. ;) वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

In reply to by अनंता

घ्या ! म्हणजे डोंगर पोखरुन निघाली गोम. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्री.परिकथेतील राजकुमार : गृहराज्य सायबर-गुन्हेगारी (प्रतिबंधक) श्री. || राजे || : दळणवळण, अर्थ राज्य. कामगार कल्याण. वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

In reply to by अनंता

परिकथेतील राजकुमारः इतिहास संशोधन (अतिरिक्त भार)(खरडवह्या वाचण्याचा जंगी अनुभव) खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by कुंदन

>>पर्नल नेने मराठे : राज्य मंत्री : शालेय व उच्च तांत्रिक शिक्षण. त्याशिवाय मराठी भाषा विकास (ह. घ्यालच) खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by कुंदन

श्री विनायक प्रभू : कुटुंब कल्याण ( अतिरिक्त भार) हे जर्रा असे थोडेसे सुधारुन घ्या श्री विनायक प्रभू : अतिरिक्त कुटुंब कल्याण ( अतिरिक्त भार)

माहिति व जनसंपर्क खाते ... श्री. प. रा

दुर संचार खाते-- श्री. कुंदन

In reply to by सायली पानसे

अहो पैसा खाता येईल असे एक तरी खाते द्या की =)) दुरसंचार खात्यासाठी आम्ही मिंटीतैंचे नाव सुचवत आहोत. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

दुरसंचार खात्यासाठी आम्ही मिंटीतैंचे नाव सुचवत आहोत. :? :? :? :? :? :?

In reply to by मिंटी

कसला विचार करतीयेस मिंटैय्या ? (चाल :- कसला विचार करतोयस रामय्या? ) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by सायली पानसे

प्रौढ-साक्षरता आणि प्राथमिक शि़क्षण. छोटा डॉन- वस्रोध्योग. पिवळा डांबिस- फलोत्पादन, कृषी. वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

In reply to by अनंता

छोटा डॉन- वस्रोध्योग.
अतिरिक्त भार: अवजड उद्योग आणि संसदीय कामकाज मंत्रालय!

श्री नाटक्या. इतर नावे सुचवा / बदलही करु शकता. राज्यमंत्री पदासाठीही नावे सुचवा. अवांतर : माझी खव, व्यनि बंद आहे. वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

In reply to by पर्नल नेने मराठे

चुचु - खाद्य राज्यमंत्री. -संदीप. काय'द्याच बोला.

In reply to by अनंता

मी आणि उत्पादनशुल्क : राज्यमंत्री? नशीब माझं दारुबंदी खातं दिलं नाही ते. नाही तर नाक्यावरच्या दादाला जेपी करण्यासारखं होतं ... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

ही निवडणुक कधी झाली बॉ? :O असो.. अनंता: माहिती व प्रसारण मंत्री . (सोबत पार्ट टाईम समीक्षक) ;) देवकाका: पर्यटन मंत्री टारझणः ग्रामविकास मंत्री अवलिया: प्रमुख सल्लागार आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

श्री विनायक प्रभू : युवक कल्याण, रोज गार हमी योजना. श्री ब्रिटिश : आदिवासी विकास, उत्पादनशुल्क, खारजमिन व बंदरे विकास. सौ जागु : महिला व बालकल्याण. हे सर्वात जास्त आवडलं! :) चालू द्या... तात्या अभ्यंकर. मुख्यमंत्री, अर्थ, सांस्कृतिक विभाग, महसूल, दारुमुक्ति! :)

श्री विनायक प्रभू : युवक कल्याण, रोज गार हमी योजना.
मग प.रा. युवती कल्याण आणि पाठलाग मंत्रालय (हेरखातं) का? ;-)
३_१४ विक्षिप्त अदिती : गृहमंत्री, हुच्च व तंत्रशिक्षण.
=)) =)) गृहमंत्री, तंत्रशिक्षण हे वाचून लोटपोट! हुच्च शिक्षण कसं ऐकल्यासारखं वाटतं! आमचे राजकीय कोलॅबोरेटर, श्री. डानराव, दिसत नाहीत कुठे मंत्रिमंडळात??

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी, प्रभूमास्तर रोज एक धमाका टाकून सगळ्यांना 'रोज गार' करायची 'हमी' आहेच. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

घ्या ............ आम्ही वेगळंच "रोज गार" करण्याबद्दल समजत होतो :)

In reply to by टारझन

गार होण्यात काय अर्थ आहे? लवकरच हर्क्युलस होईल तुमचा!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

टिंगोजी राव .... मी "गार करण्या" बद्दल बोलतो आहे !!! दोन्ही प्रकारात जिमीन-आस्मानाचा फरक आहे !! कळावे !!

In reply to by टारझन

कुनी जमिनिवर कुनी आसमानात चालायचेच. बदल हवा असतो की?

In reply to by विनायक प्रभू

एक साधी लाईन टाकलेली ... च्यायला .. ती कस काय डिलीट झाली ? एक विणंती आहे .. सरळ सरळ अर्थाची एक साधी लाईन का बरं डीलीट व्हावी ? कळतं तर ठिक .. नाय तर जाब देण्यास कोणी बांधील नाही याची जाण आहे !! बाकी मास्तर ... गार होणे .. आणि गार करणे ह्यात हार-जित मधे जेवढा फरक आहे तेवढाच फरक आहे हो :) सांगा त्या टिंग्याला

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वाह ! एकदम प्लॅटॉनीक कल्याण करीन मी ;) आणी हो पाठलाग सुद्धा भयानक करीन. या या वेड्याच्या कल्याण खात्यात आपले मनापासुन स्वागत .. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

अगदी भारताच्या भावी मंत्रीमंडळाचेच चित्र दिसतय इथं. पक्ष कुठलाही असो, किंवा कोणतीही आघाडी! जय हो!! जनतेचं 'कल्याण' हे मात्र नक्की!!! ;)

सामंत काका - साहित्य मंत्री उदय सप्रे - साहित्य राज्यमंत्री - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

सहज यांचाही मंत्रीमंडळात समावेश आहे फक्त गोपनीयता महत्त्वाची असल्यामुळे त्यांचं खातं जाहीर करू नये.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>सहज यांचाही मंत्रीमंडळात समावेश आहे फक्त गोपनीयता महत्त्वाची असल्यामुळे त्यांचं खातं जाहीर करू नये. सुप्पर !!! :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो आम्हाला माहित होतं की ते मंत्रीमंडळात आहेत, पण गोपनियतेच्या कारणांमुळे तेवढं पण जाहिर करायचं नव्हतं.... तुम्ही फोडलंत की भांडं... बिपिन कार्यकर्ते

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांचं प्रोफाईल 'बिनखात्याचा मंत्री'. सर्वात महत्त्वाचे 'खाते'. सगळी खाती व्यापून उरणारे.

विरोधी पक्षनेता कोण? ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळे आहेतच. लावून टाकू वर्णी ;) वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

In reply to by कुंदन

अजानुकर्णसुद्धा लायक होता! पण मुख्यमंत्र्यांनी त्याचा पत्ताच साफ केला! ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

आम्ही गोड तोंडाने येथे 'बेला' यांचे नाव विरोधी पक्षनेता म्हणुन सुचवु इच्छीतो ;) हलकट परा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by कुंदन

जरी ते विरोधी पक्षनेता असले तरी आम्हाला त्यांच्या बद्दल आदर आहे.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मेल्या मुडद्या ... तुझ्या बोटाला काही हाड ?

In reply to by ऋषिकेश

एकच. त्यांचं आख्खं प्रोफाईल झालेलं आहे. त्या नावाची एक गायिका आहे. ओळखा पाहू कोण ते? स्वगत: हे तुझं क्षेत्र नाही ना? मग, शांत बस!!!

9 आठवडे 5 दिवसात बराच आंतरजालीय अभ्यास झालेला दिसतोय! लगे रहो! धागा लै भारी!

महिला व बालकल्याण. अरे वा वा आवडीचा हुद्दा दिलात. आता बघा महीला आणि बालकांचे कल्याण करते. नविन योजना राबवायची तयारी केली पाहिजे.

वा ! मस्त धागा !! :) --अवलिया

१ प्रश्न : मंत्रिमंडळात माननीय धमाल पंत आणि माननीय आनंदयात्री कुठे दिसत नाहीत ते ????

In reply to by मिंटी

मंत्रिमंडळात माननीय धमाल पंत आणि माननीय आनंदयात्री कुठे दिसत नाहीत ते ???? हवे तेवढे पोहचवले नसतिल कदाचित. ;)

धमालपंत : बालकामगार कल्याण खाते आणि बालविवाह मंत्रालय आनन्दयात्री : भायल्या भानगडीचो मन्त्री ( मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स)

ही पदाची लालसा निर्माण झाली आहे .एक तरी पद द्या की?

In reply to by विकि

विरोधी पक्षनेतेपद दिले तर नाही म्हणालात. सरकार मध्ये सामील होणार की बाहेरुन पाठिंबा देणार ते नक्की ठरवा.... -- (किंग मेकर) कुंदन

शपथविधी कधी आणि कुठे? शपथ कोण देणार? @) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

In reply to by क्रान्ति

विजुभाऊ देतील शपथ...... काव्यखेचरं मारुन :D ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

बाकरवडी :- स्वागताध्यक्ष. हल्ली कोणीच नवीन सदस्य येत नसल्याने काही काम नसणार ! :B :B :B बाकरवडी :B :B :B