मनसेमुळे सेना - भाजपा युती मुंबईत साफ झोपली
राज ठाकरेंच्या करिश्म्यामुळे मुंबईत शिवसेना भाजपा युतीचा सुपडा साफ झाला मनसे सारख्या नवख्या पक्षांच्या नवख्या उमेदवारांमुळे शिवसेना भाजपाचे राम नाईक गजानन किर्तीकर किरिट सोम्मया सारखे दिग्गज उमेदवार पडले आहेत
मनसेची लाट युतीची वाट लावणार ’ , असं समीकरण राजकीय विश्लेषकांनी आणि अभ्यासू मतदारांनी ३० एप्रिलला मतदानाच्या दिवशीच मांडलं होतं. अगदी तसंच चित्र आज पाहायला मिळालं. महाराष्ट्रातल्या १२ जागांवर, जिथे मनसेचे उमेदवार उभे होते, तिथे शिवसेना-भाजप युतीचे अक्षरशः बारा ’ वाजले आहेत. ठाणे आणि मुंबई या शिवसेनेच्या दोन गडांना तर त्यांनी खिंडार पाडलंय.
मिसळपाव
