संसदेच्या शाळेत...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
संसदेच्या शाळेत...
मतदारसंघानी 'भूगोल' बदलला
नेत्यांनी 'इतिहासा'ला वापरले
नको ती 'भाषा' सर्वानी वापरली
कुणी कुणी' भाषे'ला वापरले
तीन पायांची शर्यत, जोडाफेक
कोलांट्यांसारखे 'खेळ' झाले
निवडणूकीच्या तमाशामध्ये
'नागरीकशास्त्रा'चे हसे झाले
संसदेच्या शाळेत कुणालाच
'नीतीशिक्षणा'ची नाही ओढ
यानंतर फक्त गणिताचा वर्ग
बेरजा, वजाबाक्या, आकडेमोड...
-अविनाश ओगले
वाचने
2233
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
ओगलेभाऊंची लौकिकाला साजेशी कविता. छान जमली आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
अगदी वेळीच आली. शेवटच्या चार ओळी खास. ओगले खासीयत म्हणूया त्याला आता!!!
सद्य परिस्थितीला अत्यंत समर्पक, व चपखल बसणारी कविता.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
आवडली :)
नाहि आवडली
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
एकदम मस्त कविता आहे. शेवटचे कडवे वाचताना अटलजींच्या "कौरव कौन, कौन पांडव" कवितेतील,
दोनोँ ओर शकुनि का फैला कूटजाल है | धर्मराज ने छोड़ी नहीं जुए की लत है | हर पंचायत में पांचाली अपमानित है | बिना कृष्ण के आज महाभारत होना है, कोई राजा बने, रंक को तो रोना है |या ओळी आठवल्या...
संसदेच्या शाळेत... ऐवजी संसदेच्या नौटंकीत... असे नाव द्यावे का?
वा ! मस्त !!
--अवलिया
एकंदर शिक्षण व मुल्यांबद्दल भाष्य करणारी!
मस्त कविता... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
सध्याच्या परिस्थितीला समर्पक. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
Prof.(Er.)Suresh Khedkar
भल्या भल्यान्चा क्लास घेणारी अभ्यासू कविता. अभिन्दन.
लौकिकाला साजेशी कविता.