२६ नोव्हेंबर २००३ हा दिवस खर्या अर्थाने म्हणजे अगदी शब्दशः माझ्यासाठी मदर्स डे होता.
नववा महिना लागून २-३ दिवसच झालेले .. थोडे कॉप्लिकेशन्स होऊनसुद्धा, महिनाभर आधी झालेलं माझं पिलू .. मला मिळालं. सी-सेक्शनसाठी दिलेली भूल उतरल्यावर जेव्हा मला जाग आली, तेव्हा फक्त मान वळवून पाहिलं तर शेजारच्या पलंगावर माझी आई बसली होती आणि तिच्या बाजूला, माझ्या आजीच्या नऊवारी साडीच्या मऊसूत कपड्यात गुंडाळून माझं येडू झोपलं होतं.. डोक्यालाही टोपड्यासारखा कपडा बांधला होता त्याच्या, त्यामुळे त्या कपड्याच्या कडेवरून मला फक्त त्याचं सरळसोट नाकच दिसत होतं..