वडील
लेखनविषय:
महिनाभर सुटी काढून
आलो होतो भारतात
पंचाहत्तरी विसरून
उत्साहाने राहिलात
एकच शल्य मनात
परत येतांना वाढले
फक्त तुमच्या सान्निध्यात
मी किती क्षण काढले?
वय विसरून विमानतळास
पोचवायला निघालात
"आलास, भेटलास,
हेच पुरेसं" म्हणालात
एव्ह्ढंसं कुठे नाव झालं
सार्या सिनीयर सिटिझन्सना कळवलंत
तुमच्या साठी मात्र वेळ नव्हता
"दगदग होते हो त्याची" म्हणत सांभाळलंत
दरवर्षी घरी येताना
खूप सुखवेन म्हणतो
मात्र परत जाताना
काळाची भीती आणतो
काय करतोय जगावेगळं?
कसलं ध्येय? कसलं नाव?
सोडून द्यावं सगळं, सगळं
आता घ्यावी घरी धाव
वाचन
6825
प्रतिक्रिया
0