Skip to main content

गराज सेल- लेखिका मीनल गद्रे- चतुरंग पुरवणी लोकसत्ता

लेखक सुवर्णमयी यांनी रविवार, 12/07/2009 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/daily/20090711/chchou.htm या दुव्यावर मीनल गद्रे यांचा 'गराजसेल 'यावरील लेख लोकसत्ताच्या 'चतुरंग' पुरवणीत वाचला. लेखाबद्दल मीनलचे अभिनंदन. लेखाखालील पत्ता पाहून मिपाकर मीनल या लेखिका असाव्यात असे वाटले. संपादकांनी मिपावर याची दखल इतरत्र घेतलेली असेल तर हा नोड तिथे जोडावा. हा लेखावर प्रतिसाद, चर्चा करता यावी म्हणून दुवा दिलेला आहे.

((जुळ्या चिंबोर्‍या))

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 11/07/2009 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुनीलरावांचा जुळ्या चिंबोर्‍या हा धागा आणि नीधप यांची ही कविता ह्या वरून पुढील विडंबन स्फूरले. आधी प्रतिसादात दिले होते ते इथे (खास लोकाग्रहास्तव) स्वतंत्र धाग्यात देत आहे :) चल!

आठवणी पावसाळ्याच्या

लेखक विमुक्त यांनी शनिवार, 11/07/2009 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात, रेवदंड्याच्या पावसाची आणि लहानपण ची खुप आठवण येते. रेवदंड्यात असताना, विहीरीत पोहण्याची, शाळा सुटल्या वर छत्री असुन सुद्धा भिजत घरी येण्याची, पोखरण कीती भरलीय हे रोज बघण्याची आणि पावसात भीजत समुद्रावर हुंदडायची जाम मजा होती. आमचं घर नारळा-पोफळीच्या वाडीत होत. वाडीत एक बय्रापैकी मोठ्ठी विहीर होती. पावसाळा सुरु झाला की रोज विहीरत डोकवुन ती कीती भरलीय हे मी बघायचो. पाऊस पडत असताना विहीरीतल्या पाण्याला एक वेगळाच रंग आलेला असायचा, गढुळ नाही पण एकदम गुढ असा रंग असायचा.

[रोजचीच गोष्ट.]

लेखक Nile यांनी शनिवार, 11/07/2009 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रः काय रे काय गोंधळ चाललाय आज जंगलात? मी: काय नाय रे कोणी तरी श्वापद परत आलंय म्हणे. मित्रः च्यायला! मग एवढी पळापळ कसली? जंगलात काय श्वापदं कमी आहेत काय? मी: मुर्ख आहेस! अरे निम्मे बुरखा पांघरलेले, काही नुसतेच खाजगीत गुरकावणारे. काही उगाच गरीब सश्यांवर वगैरे फोक उगारणारे, काही नुसत्याच जंगलनीतीच्या सभा घेणारे, काही नखांची धार गेलेले अन काही दात पडलेले. मग आता फुकटात काही लचके तोडायला मिळताहेत तर कोण सोडील? मित्रः काय कळलं नाय राव! मी: कीती दिवस झाले तुला जंगलात येउन? तु फक्त तमाशा बघायचा अन हा ला हा जोडायचा, काय समजलास? मित्र: अरे पण साला कोणाला हा जोडायचा हे कसे कळणार?

(( आजचीच गोष्ट ))

लेखक दशानन यांनी शनिवार, 11/07/2009 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
आजचीच गोष्ट. दोन दोन पेग झालेले. आतल्या बातम्या बाहेर निघण्याची वेळ. मित्रः तो परत आला आहे, नाव बदलून आला आहे म्हणे. मी: मग काय प्रॉब्लेम आहे ? मित्रः तु असे कधी केले आहेस का ? तेथे तर पळापळ होत आहे सर्वत्र. मी: तुझ्या बाने कधी केले होते का ? लोकांना काय झाले पळायला ? अमेरिकेतुन काय हिममानव आला कि काय ? मित्रः ते जाऊ दे. पण हे आपल्याला कसे जमायचे ? मी पण असे करु काय ? जरा गम्मंत- जम्मत, काय म्हणातोस. मी: भाड्या, न जमायला काय झाले ? आणी तो काय तुझी परवानगी घेऊन येईल का ? . आता आला तो आला परत दंगा घालेले येथे. मित्रः चार वर्षात तुझीही वेळ येईलच. मी त्याचे परत येण्याचे मनावर घेतले आहे आता.

जडण घडण २

लेखक सरपंच यांनी शनिवार, 11/07/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव हे सतत बदलत जाणारं संकेतस्थळ आहे. नव्याने आवश्यकता भासलेल्या सोई येथे जोडल्या जात असतात. नवीन सोईंची घोषणा, ओळख करून देण्यासाठी हा धागा दुसर्‍या भागात सुरू करीत आहोत. या आधीचा धागा येथे आहे. सदस्यांना काही अडचणी असतील तर त्या येथे मांडू शकतात.

हॅले कॉमेट

लेखक मुक्तसुनीत यांनी शनिवार, 11/07/2009 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
मी : मग ? जोरात दिसतात हल्ली तुमचे ते.... मित्र : "तुमचे" ! हाहाहा.. का रे बाबा ? मी : अजून तू त्याना किंवा त्यांनी तुला डिच नाही केले म्हणून "तुमचे". मित्र : ह्म्म ... म्हणजे अन्य कुणाच्या बाबतीत डिचिंग अन् डिसोनिंग झालेय तर.... मी : डोंबलाचे डिसोनिंग. या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे "मिसळपाव" जणु , गुतला तो संपला. मित्र : हाहा .... हे बाकी खराय. मी : दर ७६ वर्षानी येतो तो. आला की आपली मजा. लोक दुर्बिणी घेऊन धावताहेत. येईल नि जाईल. मित्र : हाहा ..अंतू बर्व्यासारखा बोलतो आहेस ! "अहो कसला न्हेरु ! त्या रत्नांग्रीत भाषणे कसला देत फिरतोस !

गुगल नावाची पुस्तकाची खाण

लेखक विकास यांनी शनिवार, 11/07/2009 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल फास्टनॉलेज चा जमाना तेजीत आहे. कुठलीही माहीती हवी असली तर गुगलवर लगेच त्यासंदर्भातील शब्द टाकून पाहीले जाते. कधीकधी ऐतिहासीक/सामाजीक/राष्ट्रीय माहीती शोधायला या शोधामधे बहुतांशी येणार्‍या विकीपिडीयाचा उपयोग होतो. तरी देखील कधीकधी याहून अधिक माहीती हवी असते. अशी वेळ जशी काही कामानिमित्त संशोधन करताना येते तशीच ती मिपा अथवा इतरत्र काही चर्चा करताना योग्य संदर्भ करताना पण येते. अशा वेळेस नेहमीच्या गुगलच्या उपयोगापेक्षा अधिक काहीतरी हवे असते. जिथे ठाम संदर्भ मिळू शकतील. त्याला परत उत्तर तेच आहे - गुगल! फक्त नुसते गुगल नसून ते गुगलबुक्स म्हणून आहे.

अजितदादांची मुक्ताफळे-- "राजू शेट्टींनी कारखाना काढला, की दूध संघ? का निवडून दिले?"

लेखक सुहास यांनी शनिवार, 11/07/2009 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या "ई-सकाळ" मध्ये "राजू शेट्टींनी कारखाना काढला, की दूध संघ? का निवडून दिले?" या मथळ्याची बातमी बघितली.. अजित दादाचा फोटो बघितला म्हणून वाचली... सांगली जिल्ह्यातील एका उद्घाटन समारंभाच्या वेळी दादा असे म्हणाले हे कळले.. राजू शेट्टींवर टीका असती तर ही बातमी ठीक-ठाक होती.. पण पुढे दादा काय म्हणाले ते मात्र आपल्याला विचार करण्यास भाग पाडतेय.. दादा म्हणतात.. "तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू, सगळीकडे पाणी देऊ; पण तुम्हीही मते देऊन पाठिंबा द्या." पवार यांचे स्वागत करताना टाळ्या वाजल्या नाहीत.