आजच्या "ई-सकाळ" मध्ये "राजू शेट्टींनी कारखाना काढला, की दूध संघ? का निवडून दिले?" या मथळ्याची बातमी बघितली.. अजित दादाचा फोटो बघितला म्हणून वाचली... सांगली जिल्ह्यातील एका उद्घाटन समारंभाच्या वेळी दादा असे म्हणाले हे कळले.. राजू शेट्टींवर टीका असती तर ही बातमी ठीक-ठाक होती..
पण पुढे दादा काय म्हणाले ते मात्र आपल्याला विचार करण्यास भाग पाडतेय.. दादा म्हणतात..
"तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू, सगळीकडे पाणी देऊ; पण तुम्हीही मते देऊन पाठिंबा द्या."
पवार यांचे स्वागत करताना टाळ्या वाजल्या नाहीत. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले, ""मला वाटले लोक माझ्यावर नाराज असावेत म्हणून टाळ्या वाजल्या नाहीत; परंतु जयंत पाटलांच्या सत्कारा वेळीही टाळी वाजली नाही. मला वाटले, तुम्ही झोपला आहात काय. तुम्ही आम्हाला मते द्या. विकासकामे भरभरून देतो. फुकटात वाटायला आम्ही साधू-संत नाही.''
पवार म्हणाले, ""आम्हाला मते दिली तर एका वेळी दोन कंटेनर जातील, अशी व्यवस्था करू.'' आमच्याशी दगबाजी केली तर सायकलही जाणार नाही याची व्यवस्था करू, असे म्हणताच लोकांत हास्याची लकेर उमटली.
राजू शेट्टींबद्द्ल दादा काय म्हणाले? "पोकळ घोषणा करणाऱ्या राजू शेट्टींचे काय काम आहे दाखवा. त्यांनी दूध संघ, साखर कारखाना काढला? शिक्षण संस्थांचे जाळे उभारले? काय केले होते म्हणून त्यांना तुम्ही निवडून दिले? असे पुढे चालणार नाही. जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभे राहा, तरच ते आणखी काही तरी मोठे काम करतील."
संपूर्ण बातमी इथे वाचता येईल..
http://beta.esakal.com/2009/07/09234934/western-maharashtra-ajit-pawar…
राजकारणातील सरंजामशाही आणि घराणेशाहीची पाठराखण दादांच्या आणि राष्ट्रवाद्यांच्या गेल्या १० वर्षांच्या कारकिर्दीत झाली आहे हेच राजू शेट्टी निवडून येण्याचा मूळ कारण दादा विसरतायेत..! आपण ते विसरू नये हीच अपेक्षा म्हणून हा काथ्याकूट..!
ता.क.-- हा संपूर्ण कार्यक्रम शासकीय होता आणि याची 'अशी' बातमी फक्त "ई-सकाळ" मध्येच आहे..
वाचने
2728
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
साहेब, काय हे?
फारच विनोदी आहेत अजित पवार
बापाचे (काकाचे) राज्य आहे
>>एकदा शरद
सत्ता आणि
दादा दादा तुम्ही खच्चुन *दा
लेकीच्या
हिंदुराव
सरळ सरळ धमकीच दिली आहे.