सुनीलरावांचा जुळ्या चिंबोर्या हा धागा आणि नीधप यांची ही कविता ह्या वरून पुढील विडंबन स्फूरले. आधी प्रतिसादात दिले होते ते इथे (खास लोकाग्रहास्तव) स्वतंत्र धाग्यात देत आहे :)
चल! वाजल्या खुळखुळ बांगड्या
त्या टोपलीवरून नजर फिरवताना
मी कोळीणीला विचारलं
'सांग की कितीला दिलास हा वाटा
अरेच्या ह्या एकातएक मिसळणार्या
आणि एकातून एक फुटणार्या?
सांग ना ह्या जुळ्या चिंबोर्या कुठून आणल्यास?
लख्ख पिवळा रंग
आणि पिवळट जुळ्या'
उत्तरादाखल ते दोघे टोपलीतून
केवळ रोखून बघत राहीले.
आणि नोटांगणिक अजूनच
विस्कटत, उसवत, पेटत गेले.
त्यांचे लाल केस भुरूभुरू जळत होते
भोवती ठिणग्या होत्या
आणि उजव्या बाजूचा पाय तोडल्याची जखम होती.
मग मला वाटत राह्यलं
आपल्याला हा वाटा फळलाय,
चविष्ट जाणीवांचा उगम हातीच आलाय..
आता माझं मन
खदाखदा हसलं
केलेला रस्सा पिवळा जांभळ्यात, जांभळा निळ्यात, निळा हिरव्यात
हिरवा परत पिवळ्यात उडी मारून गेला
तवंग खुळ्यासारख्या भिंगोरला
....
....
मी अजून जुळ्या चिंबोर्याच चापतोय!
**(आज सहजदिनानिमित्त हे विडंबन सहजरावांना अर्पण)**
याद्या
4268
प्रतिक्रिया
21
लेखनविषय:
मिसळपाव
वा! मस्त
वा वा ..
In reply to वा! मस्त by अवलिया
_/\_
In reply to वा वा .. by टारझन
अगागागागागागा
In reply to वा वा .. by टारझन
+१ सहमत
In reply to अगागागागागागा by अवलिया
सकाळम्
In reply to वा वा .. by टारझन
(विषय दिलेला नाही)
In reply to वा वा .. by टारझन
बापरे
In reply to वा वा .. by टारझन
-१
In reply to बापरे by श्रावण मोडक
-२
In reply to -१ by दशानन
खास
मस्त
गंमत
भन्नाट!
सगळंच
भन्नाट!
खत्तरनाक
In reply to भन्नाट! by सुबक ठेंगणी
टार्या .........
काय बोलू?
फारच छान
टारू