मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हॅले कॉमेट

मुक्तसुनीत · · जनातलं, मनातलं
मी : मग ? जोरात दिसतात हल्ली तुमचे ते.... मित्र : "तुमचे" ! हाहाहा.. का रे बाबा ? मी : अजून तू त्याना किंवा त्यांनी तुला डिच नाही केले म्हणून "तुमचे". मित्र : ह्म्म ... म्हणजे अन्य कुणाच्या बाबतीत डिचिंग अन् डिसोनिंग झालेय तर.... मी : डोंबलाचे डिसोनिंग. या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे "मिसळपाव" जणु , गुतला तो संपला. मित्र : हाहा .... हे बाकी खराय. मी : दर ७६ वर्षानी येतो तो. आला की आपली मजा. लोक दुर्बिणी घेऊन धावताहेत. येईल नि जाईल. मित्र : हाहा ..अंतू बर्व्यासारखा बोलतो आहेस ! "अहो कसला न्हेरु ! त्या रत्नांग्रीत भाषणे कसला देत फिरतोस ! तांदूळ दे म्हणावं." मी : फार बोलू नकोस , आण्णू गोगट्या करेन तुझा ! मित्र : नाही , म्हणजे इतका कडवटपणा बरा नाई. आता दिसतोय आकाशात तर दर्शन घे ! पुन्हा ७६ वर्षे काय फिरकेल न फिरकेल. मी : अहो , तो आकाशात पाजळतो आहे तेच ठीक. लोकांनी काय आपले फायरवर्क्स पाहून टाळ्या वाजवाव्यात. आम्ही बरे आमच्या खोपटात. मित्र : का रे ? ये की बाहेर जरा. वाजव तूपण टाळ्या. मी : तोच तर साला प्रॉब्लेम आहे आपला. साला कधीममधी होणार्‍या घटकाभरच्या रोषणाईच्या चूषपणाला आम्ही लांबवर वाट दाखवणारी मशाल समजतो ! मित्र : हाहाहा .... तुम्ही म्हणजे .... कुणी शिवाजी म्हाराज की म्हण्टले की "जय" म्हणायला मोकळे. चल , बोअर करू नकोस मी फायरवर्क्स ला चाललो ... तुम्ही बसा तिच्यायला कुढत ! (सन्माननीय सदस्य सहजरावना सादर अर्पण. )

वाचने 3045 वाचनखूण प्रतिक्रिया 16

विनायक प्रभू 11/07/2009 - 11:11
गंमतच हाय की.

अवलिया 11/07/2009 - 11:11
(हा प्रतिसाद अनोळखी लोकांनी वाचु नये) मुसुशेट, लै दिवसांनी ... चला तुम्हाला पण सुरुसुरी आलीच तर तळपण्याची ! चालु द्या !! :) --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

सहज 11/07/2009 - 11:14
काका तुम्ही सुद्धा...हा हा हा =)) सगळे काका लोक्स म्हणजे नो लिसनिंग. बनी दिसली नाही ती कुठे गेलीय सध्या?

In reply to by सहज

अवलिया 11/07/2009 - 11:18
(हा प्रतिसाद सहजराव सोडुन कुणीही वाचु नये) सहजकाका, तुम्ही पण घ्या हात धुवुन... येवु द्या काहीतरी पेश्शल तुमच्याकडुन... :) --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

दशानन 11/07/2009 - 11:16
हाणतिच्या मायला =)) डायरेक्ट धुमकेतू च उतरला कि मिपा वर ! दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

ऋषिकेश 11/07/2009 - 11:20
आज चंद्र बघायचा राहिला तरी चालतो.. तो उद्या येईलच.. हॅलेचे तसे नसते.. तुम्ही नाहि बघितलात तर ७६ वर्षे हळहळावे लागते [हॅलेच्या होणार्‍या आतिषबाजीला बघायला मोक्याची जागा पटकावून बसलेला] ऋषिकेश (सर्किठॅलेकर) ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

सुनील 11/07/2009 - 11:32
लगे रहो मुसुराव! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

परिकथेतील राजकुमार 11/07/2009 - 11:36
फायरवर्क भारीच बर का !! 'सहजपोर्णीमा' वगैरे साजरी करणे चालु आहे का सध्या ? रोज कोण ना कोण काय अर्पण करतय म्हणुन शंका आली ;) (हा प्रतिसाद सहजकाकांना अर्पण) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहज 11/07/2009 - 11:48
'सहजपोर्णीमा' =)) =)) =)) लाईन ऑफ फायर आपलं आताषबाजी मधे उभे करतायत, दुसर काय..

श्रावण मोडक 11/07/2009 - 11:43
एकच राहिलं. हा सारा संवाद दोन झाल्यानंतरचा की त्याआधीचा? संवाद वाचल्यावर वाटतंय की आधीचा नक्कीच नसावा. ;) बनी कुठंय?

मिसळभोक्ता 11/07/2009 - 12:16
जुन्या आणि नव्यांतला फरक लगेच दिसून येतो. (मुसुशेठचा नवा मित्र. मात्र प्रतिसाद सहजशेठला अर्पण.) -- मिसळभोक्ता

In reply to by नंदन

३_१४ विक्षिप्त अदिती 11/07/2009 - 16:55
नंदनशी सहमत. ह्याकुटा़के आणि शूमाकर-लेव्हीपेक्षा हॅलीचा धूमकेतू चांगलाच. पॉझिटीव्ह थिकिंग करा की हो जरा! (हा प्रतिसादाही सहजरावांना सादर समर्पण)

बिपिन कार्यकर्ते 11/07/2009 - 13:39
लै भारी!!! आता मज्जा येणार. :) अवांतर: मी सगळ्यांनाच ओळखून आहे म्हणून सगळेच प्रतिसाद वाचले. ;) बिपिन कार्यकर्ते