Skip to main content

अर्ध्या गट्टूची किंमत!

लेखक वेदश्री यांनी बुधवार, 12/08/2009 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो मॅडम, ते नेतायत ती गाडी तुमची आहे का?" माझ्यामागून हे विचारणार्‍याचा हात कुठल्याबाजूने निर्देश करतोय तिकडे बघत मी पाहिले तर माझीच अ‍ॅक्टीव्हा होती. मी धावतच त्या अवैध ठिकाणी पार्कींग केल्याबद्दल गाड्या उचलून नेणार्‍या गाडीकडे धावत गेले. "है मिस्टर, हाऊ यू डेअर्ड टू टच माय अ‍ॅक्टीव्हा?" "काय रे, हे कालेजातलं पाखरू काय फिसफिस करून र्‍हायलंय इंग्लिसमदी?" "थोबाड संभाळून बोल बे. जास्त फडफड करू नको. गपगुमान माझी गाडी खाली उतरव नाहीतर..." एव्हाना माझा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. योग्य ठिकाणी गाडी लावूनही ही दमदाटी ऐकून घ्यायला मी काही पोचट नाही. "न्हाईतर काय?" "नाहीतर काही खास नाही.

मॅरेज लाईफ.....३

लेखक मस्त कलंदर यांनी मंगळवार, 11/08/2009 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
परा कधी हो म्हणाला ते त्यालाही कळलं नाही... आता निखिलने एक कोरा कागद काढला. आणि पराला समजाऊन सांगु लागला. हा क्लीनिंग कूकिंग विथ सप्तपदीलेस मॅरेजचा कोर्स अटेंड करायचा... कोर्स सोबत क्लीनिंग एजंट किट आणि कूकिंग टीप्सचे पुस्तक मिळेल.. बदल्यात या प्रोग्रामचे प्रोमोशनल राईट्स मिळणार. आपण काही करायचे नाही फक्त लोकाना अशा सेमिनार ला घेऊन यायचे. आपल्या ओळखी मुळे एक नवीन नोंदणी झाली की काही टक्के कमिशनचे मिळणार होते. असे करून मी एकूण १० नोंदणी झाल्या तर आपण आपल्या गुंतवणूकीतून मोकळे होऊ. सगळॅ ट्रेनिंग जवळ जवळ फुकटात पडणार होते... किती सोप्पंय हे... लग्न ठरण्याची शक्यताही वाढेल...

थाई प्रॉन्स करी

लेखक अडाणि यांनी मंगळवार, 11/08/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
सोपी पध्धत : ओळखीतल्या (किंवा अनोळखी पण चालेल ) 'थाई' कुकला बोलवा. त्याला प्रॉन्स करायला सांगा !!! झाली की थाई प्रॉन्स 'करी' . . . आता थोडी अवघड पध्धत : करायला तशी खुप सोप्पी आहे पण जिन्नसांची तयारी करून ठेववी लागते. जिन्नसः तेल - २ मोठे चमचे कांदा - १ मध्यम आकाराचा ढोबळि मिरची - १ (छोट्या आकाराची - मोठि असेल तर अर्धीच घ्या) कडीपत्ता - दोन-चार पाकळ्या कोथिंबीर - दहा काड्या लसून - २ मोठ्या पाकळ्या आले - अर्धा चमचा (किसलेले) साखर - १ चमचा लिंबू - १ नारळाचे दुध - १ कप थाई रेड करी सॉस - ३ ते ४ चमचे (उस गावला हा ट्रेडर जो मधे चांगला मिळतो ) आणि.....

घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार व शाळकरी मुले

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 11/08/2009 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे स्वाईन फ्ल्यु सर्व भारतात पसरला आहे हे स्पष्ट दिसत आहे. मी स्वतः बराच वेळ निर्निराळ्या वेब साईट्सवर संघटीत अशी अद्ययावत माहीती मिळते का हे पाहीले पण सगळी माहीती तुटक/जुनी-नवी अशी आहे. त्यामुळे मला जे येथे मांडायचे होते ती आकडेवारी मांडता आली नाही.

भूमिका

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 11/08/2009 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाठ वार्‍याने फिरविली ती दिशा माझीच होती मूक, हळवी, दीन, शापित नायिका माझीच होती दैव दुबळे; शाप माझा भोगते जन्मांतरी मी राम तो नव्हता, अहिल्येची शिळा माझीच होती एकही नव्हता दिवा, ना काजवा होता कुठेही चांदणे ना चंद्र, अवसेची निशा माझीच होती भंगले फुलताक्षणी का स्वप्न माझे मोहराचे? वादळाने मोडलेली वाटिका माझीच होती संशयाने गोठल्या संवेदना माझ्याच होत्या, जाळली क्रोधाग्निने ती संहिता माझीच होती काळजाला विंधणार्‍या आप्तस्वकियांच्या विषारी बोलण्यावर चालली उपजीविका माझीच होती ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी, काय सांगू?
काव्यरस

चला मजेमजेत संस्कृत शिकूया :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 11/08/2009 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
साला आपल्याला कोण संस्कृत शिकवायला तैय्यार नाय. आजपत्तुर जे तज्ञ भेटले ते सौताला लै शाणे समजणारे. त्यांचं-आपलं काय जमेना! ते फक्त संस्कृतची ट्यँव ट्यँव करतात पण साध्यासोप्या रितीनं शिकवा म्हटलं तर एक जण तैय्यार नाय! पण साला आपल्याला पण शिकायची लै हौस. मग लास्टमदी आपण आंतरजालावर काही संस्थ़ळं शोधली आणि आपली आपण काही वाक्य तैय्यार केली. मिपावरील धनंजयादि संस्कृत तज्ञांनी ती तपासावी अन् काय बरोबर, काय चूक ते सांगावं... हां, सुरवातीला सर्व काय चुकेल, पण फिकर नाय! नाकातोंडात पाणी गेल्याबिगर पोहता येत नाय अन् ढोपरं फुटल्याबिगर सायकल शिकता येत नाय यावर आपला भरौसा हाय!

काशीद बीचचा सुर्यास्त ......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 11/08/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबागपासुन साधारण चाळीस किमीवर असलेल्या काशीद बीच वर टिपलेला सुर्यास्त ... त्याच सागरकिनार्‍यावर टिपलेला हा फेसाळलेला समुद्र ...

ठिणगी .....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 11/08/2009 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्षे वसई-विरार पट्ट्याचे अनभिषीक्त सम्राट म्हणुन मिरवणारे आ. हितेंद्र ठाकुर यांना जनता जनार्दनाने आपला हिसका दाखवला. ठाकुर यांच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत. यावर आता अनेक प्रश्न उभे राहतील. ठाकुर समर्थकांनी विरार - नालासोपारा परिसरात धुमाकूळ घालुन आपली लायकी व स्वभावगुण दाखवले आहेतच. पण कुठेतरी सुरूवात झाली हे महत्वाचे. आज लोक आ. हितेंद्र ठाकुर यांच्यावर हात उचलायचे धाडस दाखवताहेत हे अपेक्षित बदलाचे चिन्ह आहे का? म.टा.

स्वप्नांचे पहारेकरी

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 11/08/2009 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या स्वप्नात जागुन तुझ्या स्व्प्नांना पहारा देतो, तुझ्या स्वप्नात तु माझ्यापासुन दुर जाशील म्हणुन मी घाबरतो चांदण्याना तुझ्या स्वप्नात येण्याची परवानगी देतो, पण चंद्राला मात्र दारावरुनच हाकलतो, मला माहितेय चंद्र तुला आवडतो, पण काय करणार चंद्र पण तुझ्यावरच मरतो मी ही कधी कधी हळुच तुझ्या स्वप्नात डोकवतो, तुला डोळे भरुन पाहुन घेतो, तुझ्या माथ्यावर डोके टेकवणार असतोच, तेवढ्यात कुठलातरी अज्ञात पहारेकरी मलाच हाकलतो मला कळाले मी इकटाच नाही अजुन बरेच जण तुझ्या स्वप्नांना पहारा देतात, आणि तुझ्या स्वप्नांच्या प्रवेशदारावर एकमेकांशी भांडत बसतात तु पण थोडीफार चुकतेस, डोळ्यांनी अशी काय जादु करत