वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे स्वाईन फ्ल्यु सर्व भारतात पसरला आहे हे स्पष्ट दिसत आहे. मी स्वतः बराच वेळ निर्निराळ्या वेब साईट्सवर संघटीत अशी अद्ययावत माहीती मिळते का हे पाहीले पण सगळी माहीती तुटक/जुनी-नवी अशी आहे. त्यामुळे मला जे येथे मांडायचे होते ती आकडेवारी मांडता आली नाही.
इलेक्शन च्या प्री-पोल/एक्झिट पोलची आकडेवारी ज्या पद्ध्तीने मांडली जाते (किंवा किचकट माहीती विश्लेषण करणारे तज्ञ जशी शेअर मार्केटची आकडेवारी मांडतात) तशीच माहीती गोळा करणे अत्यावश्यक आहे.
कदाचित खालीलप्रमाणे माहीती-विष्लेषण केल्यास पॅनिक कमी होऊ शकेल-
डाटा पॉइंटस-(उदाहरणार्थ)-
१. एकुण संशयित रुग्ण
२. एकुण घोषित रुग्ण
२.१ घोषित रुग्ण: वय
२.२ घोषित रुग्ण: लिंग
३. घोषित रुग्ण: शाळकरी मुले
४. घोषित रुग्ण: इतर
५. घोषित रुग्ण: प्रवासाचा पुर्वेतिहास
६. घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार दिवसेंगणिक
७. घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार शहरानुसार
८. घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार वयानुसार
९. घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार शाळकरी मुले
घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार वरील प्रमाणे पाहणे अशा डाटा पॉईंटस वरुन शक्य होईल का?. ह्यावरुन जर असे दिसत असेल की, आता रेशो अधिक जोर दाखवत आहे (जो वरकरणी दिसत आहेच) तर खालील प्रश्नांची उत्तरे मिळतात का ते पाहणे-
अ) घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार शाळकरी मुले: ह्या रेशोची वाढ शाळा बंद करेपर्यंत अधिक होती व नंतर कमी झाली का?. म्हण्जेच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे.
ब) घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार शाळकरी मुले: ह्या रेशोची वाढ "एकुण घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण" रेशोच्या कितीपट आहे? ती वाढत आहे का? कमी होत आहे का?
क) "एकुण घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण" हा रेशो वाढत चालला असेल तर शाळा सुरु करणे धोकादायक आहे का?
ड) "एकुण घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण" हा रेशो पीकवर जात असेल तर पुर्वीच्या "घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार शाळकरी मुले" रेशोवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
अशी शंका असेल तर शाळा अधिक काळ बंद करावी की नाही, ह्याचा विचार ईन्फॉर्म्ड डिसीजन असेल. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तर किती पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार होतील ही शंकाच आहे. मुलांना घरी ठेवून घेतले तर त्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून काय उपाययोजना करता येईल हे पहाणे योग्य ठरावे. ही एक सामाजिक आपत्ती असल्यामुळे गंभीर परिणाम होऊ नयेत म्हणून ह्यावर्षीच्या अभ्यासक्रमात योग्य ती काटछाट केली तरी चालू शकेल का?
अनुभवी डॉक्टर्स व अनुभवी संख्याशास्त्रज्ञ जर एकत्र आले तर अधिक चांगली माहीती लोकांना देता येईल असे वाटते. लोकनेत्यांना त्याची मदतच होईल. असे अगोदरच करत असावेत असेही वाटते. त्यामुळे मी काही फार मोठे असे सांगत असल्याचा आव मुळीच आणत नाही.
वाचने
3341
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली कल्पना
खरे म्हणजे
In reply to चांगली कल्पना by विकास
कल्पना
स्वाईन
In reply to कल्पना by अभिज्ञ
ट्विट ट्विट
चांगला
In reply to ट्विट ट्विट by विकास
अशा
बाकी जाऊ देत...
दुरूस्ती
In reply to बाकी जाऊ देत... by विसुनाना
सीडीसी
ग्रेट.
In reply to सीडीसी by विकास
पुणे