मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चला मजेमजेत संस्कृत शिकूया :)

विसोबा खेचर · · काथ्याकूट
साला आपल्याला कोण संस्कृत शिकवायला तैय्यार नाय. आजपत्तुर जे तज्ञ भेटले ते सौताला लै शाणे समजणारे. त्यांचं-आपलं काय जमेना! ते फक्त संस्कृतची ट्यँव ट्यँव करतात पण साध्यासोप्या रितीनं शिकवा म्हटलं तर एक जण तैय्यार नाय! पण साला आपल्याला पण शिकायची लै हौस. मग लास्टमदी आपण आंतरजालावर काही संस्थ़ळं शोधली आणि आपली आपण काही वाक्य तैय्यार केली. मिपावरील धनंजयादि संस्कृत तज्ञांनी ती तपासावी अन् काय बरोबर, काय चूक ते सांगावं... हां, सुरवातीला सर्व काय चुकेल, पण फिकर नाय! नाकातोंडात पाणी गेल्याबिगर पोहता येत नाय अन् ढोपरं फुटल्याबिगर सायकल शिकता येत नाय यावर आपला भरौसा हाय! :) आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागलो की लागलो. मंग माघार नाय! तात्या अभ्यंकर म्हनतात आपल्याला! भास्करचा भास्करबुवा होईन तेव्हाच तुम्हाला तोंड दाखवीन असं आमचे भास्करबुवा एकदा सौताला लै शाणा समजणार्‍या एकाला बोल्ले होते. त्याच चालीवर आपण पण बोलतो - "तात्याचा 'तात्याशास्त्री' होईन तेव्हाच दम खाईन!" :) आपण मदत घेत असलेली संस्थळं - http://www.sanskritdeepika.org/ http://spokensanskrit.de/ इतरही काही संस्थळे असल्यास कळवा - आधी वरजिनल मराठी वाक्य अन् मग आपण केलेलं भाषांतर - १) तात्या संस्कृत शिकतो. "तात्या गीर्वाण भाषा पठति" २) तात्याने आंबा खाल्ला. "तात्या आम्रफल अखादत्" की, "तात्या आम्रफलं अखादत्" ? (तसे असल्यास 'ल'वर अनुस्वार का द्यायचा?) ३) तात्या आळशी आहे. "तात्या कार्यहीन:" ४) तात्या लिहीत आहे. "तात्या लेखन वर्तते" ५) तात्या मरेल. "तात्या मृतश्यति" ओक्के.. अरे चूक का बरोबर ते कुणीतरी सांगा रे. चुकल तर काय चुकलं ते पण सांगा... आपला, (विद्यार्थी) तात्या. सूचना - येथे फक्त विषयाला अनुसरूनच चर्चा होईल. अवांतर प्रतिसाद त्वरीत उडवले जातील. त्याकरता खरडवह्या वापराव्या.

वाचन 19012 प्रतिक्रिया 0