Skip to main content

रसूल अल्लाह आणि तो

लेखक अन्वय यांनी सोमवार, 14/09/2009 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
रसूल अल्लाह या बंदिशीचा जालावरील धागा मिळविण्यासाठी चर्चा टाकाली होती. ही बंदिश मिळेल का नाही ही शंकाच होती. ती मिळाली. त्यासाठी हुप्प्याचे विशेष आभार! या बंदिशीने मला खूप पूर्वीपासून वेड लावले आहे. या विषयावर असंख्य मिपाकरांचे प्रतिसाद मिळाले. त्यावरून रसूल अल्लाह बंदिशीवर लोक किती प्रेम करतात, हेच दिसून आले. त्यामुळे मला या संबंधीचा एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो आहे. हा किस्सा मी फारसा कुणाला सांगितलेला नाही.... एकदा रात्रपाळीचे काम उरकून आम्ही तिघेजण (त्यातील एक मिपाकर आहेत.) आत्म"शांती' करण्यास बसलो होतो. अर्थातच हॉटेलमध्ये. आमची संगीतावर चर्चा सुरू झाली.

बाली

लेखक नंदू यांनी रविवार, 13/09/2009 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच सुट्ट्यांमध्ये बालीला जायचा योग आला. तसं पुलंचं पुर्वरंग वाचल्यापासून बाली कायम डोक्यात घर करुन होतंच पण शेवटी योग यावा लागतो. यावेळी मात्र महाजालावरून विमान आणि हॉटेल बुकिंग करूनच टाकलं आणि सहकुटुंब बालीला जाउन आलो. या ट्रीपचा हा सचित्र वृत्तांत. देनपसार विमानतळावर उतरण्यापुर्वी विमानातून दिसणारा हा अगुंग पर्वत. हा एक निद्रीस्त ज्वालामुखी आहे. १९६३-६४ साली याचा उद्रेक झाला होता. रामायणावरील सुप्रसिद्ध केचक नृत्यनाटिका.

अर्धा कप चहा

लेखक सुनिल पाटकर यांनी रविवार, 13/09/2009 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धा कप चहा चहा पिणं हा तसा प्रत्येकाचा आवडता शौक .मी तसा सतत फिरत असल्यामुळे कुठेनंकुठे अर्धा कप चहा आमचा होतचं असतो.अगदी ए.सी. रुमअमध्ये बसून नाहीतर चहाच्या टपरीवर चक्क उभं राहून.वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळ्या चवीचे चहा मी रिचवला आहे. सरकारी कार्यालयात कामानिमित्त नेहमीच फेर्‍या होत असतात,असाच एकदा कार्यालयात चहा मागविण्यात आला.चहा घेऊन येणारा ‘पोर्‍या‘ असेल १०-१२ वर्षाचा!

मी

लेखक अजिंक्य यांनी रविवार, 13/09/2009 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
जाणुनी, झुंजीत नाही शूर मी, दौडलो ऐसा कसा चौखूर मी ||१| काव्यप्रांती काय माझी थोरवी, आग बाकीचे, फुकाचा धूर मी ||२|| ओघ हे मोठे नद्यांचे वाहती, गावच्या छोट्या नळाचा पूर मी ||३|| या जगी जे मोठमोठे गायले, वाटतो त्यांच्यापुढे बेसूर मी ||४|| का अजिंक्या, मोह काव्याचा पडे, त्याच त्या स्वप्नात का हो चूर मी? ||५||

सध्या वाचत असलेली पुस्तके... भाग अमुकतमुक..

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 13/09/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी सध्या वाचत असलेली पुस्तके... ... गेल्या महिन्याच्या मध्यात स्वाईन फ्लू उद्रेकामुळे काही काळ धंदा नियंत्रण करून घरी बसलो होतो .. त्या काळात ही ही पुस्तके वाचली... १.कुमार माझा सखा २.अवघड अफगाणिस्तान ३.सुलतान ( नाटिक संग्रह) ४. युगान्त ( त्रिनाट्य ... वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी , युगांत)) ५.मौनराग ६.काटेसावरी ( नाटक) ७.अग्नि आणि पाऊस ( नाटक) ८.गगनभेदी ( नाटक) ९.प्रेमाची गोष्ट ( नाटक) १०. कोबाल्ट ब्लू ( कादंबरी) ११.

मात्र रात्रीची गोष्ट भाग ४

लेखक दशानन यांनी रविवार, 13/09/2009 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
मात्र रात्रीची गोष्ट भाग ३ ********* स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच. (तिसरा पेग होवुन गेला आहे, अवांतर चर्चा सुरू आहे अशी स्वप्नावस्था.... अशातच पेग ४ आगमन) मी - काल फिरत फिरत त्या पेठेत गेलो होतो.. तो- हं... दिवाळीची जोरदार तयारी चालु आहे सध्या तिथे मी - आपला तो भेटला होता... तिकडेच खरेदी करणार आहे या वेळेस दिवाळीची तो - हं.. इथली रंगीत कापडं त्याला आवडत नाहीत, डिसेंन्सी नसते म्हणे... घालता येत नाही, अंगात बसत नाही हे सांगत नाही मी - जावु दे ना आपल्याला काय करायचे? पण तो का पुढे पुढे करायला लागला हल्ली.. तो - हल्ली ?

ताकुमा बॉयलर

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 13/09/2009 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
ताकुमा बॉयलर ताकुमा बॉयलर ह्या जगप्रसिद्ध जापानी कंपनीचे मालक श्री ताकुमा ह्यांनी त्यांच्या जवळची सर्व पुंजी ताकुमा बॉयलर बनविण्यात घालवली पण तो बॉयलर काही केल्या चाचण्या पार पाडू शकत नसे. व त्यामुळे तो बॉयलर विक्रीसाठी उपलब्ध करुन देता येत नव्हता. अगदी कफल्लक झाल्यानंतर त्यांनी एक शेवटचा उपाय म्हणून कोरियात राहणाऱ्या एका मित्राकडे काही कर्ज मागायचे ठरवले व पुढील चाचण्या व संशोधन करता येईल असा विचार केला. झाले, ते एका बोटीवर चढले व कोरियाला निघाले. तरीही त्यांच्या मनात धाकधूक होतीच, मित्राने कर्ज नाही दिले तर काय, ह्या विचाराने रात्रभर झोप नाही आली.

भय तिचे संपलेच नाही

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/09/2009 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
दोन मैत्रिणी वरती बघती डब्बे उंच रुळावर फ़िरती नागमोडी रांगांतुनी खाली गर्दी बघते उत्सुकलेली भय इथले संपतच नाही एक बोलली भयांकीतशी सखी तिची ऐकेना काही धीर देऊनी तिजला नेई गोलगोल रुळांवर फ़िरुनी चहुबाजुला रम्य पाहुनी वेगाची बहु नशा घेऊनी परी सम झाल्या दोघीजणी मी तुला म्हटले नाही? भिऊ नको मुळीच बाई धिटावली आता पहीलीही म्हणे काय मस्त मजाही भराभरा उंचावर नेई क्षणात खाली झोकून देई ओरडणे हसणेही काही धडधडाटी विरून जाई रूळ तिरके कोनात मांडले उंच उंच चढ चढू लागले खडखड गडगड डबे चालले शिखर बळे गाठून थबकले

लहान लहान विचार.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 13/09/2009 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आम्ही मुंबईहून न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आंबे, गरे,बोंडू खाण्यासाठी आणि विश्रांती आणि मजा मारण्यासाठी जात असूं. आता संसाराच्या रग्याड्यात,तसंच ऑफिसच्या कामाच्या व्यापात कोकणातल्या आमच्या खेपा त्यामानाने कमीच झाल्या आहेत. पण कधी कधी उलटं होतं.अलीकडे कोकणातून उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची मित्रमंडळी आणि नातेवाईक मुंबईला येतात.