Skip to main content

जी फॉर..

लेखक विकास यांनी शुक्रवार, 02/10/2009 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने गुगलने गांधीजींना लोगोमधे सामावले आहे. आजपर्यंत गुगलने असे विशेष लोगो तयार करताना दाखवलेली कला येथे पण दाखवली असती तर अजून चांगले झाले असते असे वाटते...तरी देखील सध्याच्या काळात गांधीजींची आणि पर्यायाने भारतीय नेत्याची दखल घेतली गेली याचा आनंद झाला. तुम्हाला काय वाटते?

चखना पेश्शल.

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 02/10/2009 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी विकांत जवळ आला, आठवडाभर कष्ट उपसुन उपसुन थकला आसाल नै. तेव्हा श्रमपरीहारार्थ तिर्थपान ;) होणारच असेलच. (ड्रायडेपण आज संपेल. आगीत तेल टाकातोय कारे भाऊ. ;) ) तर तुमच्या उद्याच्या तिर्थपानाच्या जोडीला ही सोबत. (काल सुट्टी मुळे आम्ही कालच विकांत साजरा केला.) १) पायनॅपल चीज चेरी : पाकृ. एकदम सोप्पी. अननसाचे आणि चीज लहान चौकोनी तुकडे करुन घ्या, पाकात मुरवलेल्या चेरीचे १/२ तुकडे करुन घ्या.

गांधी जयंती निमित्तच्या ड्रायडेचा तीव्र निषेध!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 02/10/2009 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज गांधी जयंती. या निमित्ताने आजच्या दिवशी देशात लादल्या गेलेल्या ड्रायडेचा (दारुबंदी) मी तीव्र निषेध करतो.. ज्या गांधींनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, आणि कुठकुठल्या फ्रीडमस्चा वगैरे पुरस्कार केला असे ऐकून आहे, त्या गांधींच्या जयंतीच्या दिवशी देशातला एक फार मोठा कष्टकरी वर्ग विनाकारण बेरोजगार राहणार हा विरोधाभास चीड आणणारा आहे.. मद्यविक्रीच्या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळतो आणि त्यांची रोजीरोटी चालते.

valley of flowers in india

लेखक jaypal यांनी गुरुवार, 01/10/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
3

(टुर्र)

लेखक लंबूटांग यांनी गुरुवार, 01/10/2009 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
(मला कवितेतले काहीही कळत नाही त्यामुळे मी कधीही काव्य विभागात फिरकत नाही. आमचे मित्र ही आणि ही सम्राट टारोबा ढेकर यांनी आम्हाला शरदिनी यांच्या कवितांचा खजिना दाखवला आणि आमचा कमी झोपेचा त्रास अजूनच वाढला. मागील २-३ रात्री जागून अथक परिश्रम करून आम्ही त्यांच्या कविता वाचल्या आणि अथक परिश्रम करून अर्थ समजण्याचा प्रयत्न केला. त्यांची पूल ही कविता पाहून एक विडंबन आमच्यातल्या सुप्त विडंबन्कारास स्फुरले.
काव्यरस

एक गाणे/कविता हवी आहे

लेखक अरुण वडुलेकर यांनी गुरुवार, 01/10/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी माझी आई एक गाणे (कविता) नेहेमी म्हणायची. ते गाणे जसेच्या तसे मला आता आठवत नाही. मात्र ध्रुवपदातील एक ओळ चांगली आठवते. ती अशी, अजुनि कसें येती ना परधान्या राजा किरकिरती रातकिडे झाल्या तिन्हीसांजा हे गाणे एक विवाहिता, जी कामावर गेलेल्या (किंवा परगावी गेलेल्या) आपल्या पतीची वाट पाहाते आहे, त्याच्या प्रतिक्षेत म्हणत आहे.

मला मोठं व्हायचय...

लेखक अभिजा यांनी गुरुवार, 01/10/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याजवळ जे नाही ते प्राप्त करण्याचा माणसाला कोण हव्यास! आपल्याला लहान असताना मोठं होण्याचे वेध लागलेले असतात (आणि मोठं झाल्यावर, लहान!). मोठं होणं किती मज्जेचं असतं. आपण खूप शक्तिमान होतो. आपल्याला जे हवं ते मिळवता येतं. मोठ्या माणसांजवळ खूप पैसे असतात. मग काय? भरपूर गोळ्या-बिस्किटं घ्यायची. परत, मोठ्या माणसांना, कोणी लहान मुलांना ओरडतात तसं ओरडतं का? छे! कधी एकदाचा मोठा होतोय मी! असं म्हणून मी अनेकदा कणसाच्या तु-यांच्या मिश्या नाकाखाली लावून, मोठा झाल्यावर मी कसा दिसेन हे आरश्यात बघून आजमावले आहे. कधी मुद्दाम घरातील मोठ्या लोकांच्या चपला घालून चालून पाहावे.

आम्ही देवाच्या दयेने सुखरूप आहोत

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 01/10/2009 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
" मिपा"वरील सभासद मित्रांनो, हा लेख असा इथे लिहिणे कायद्यात बसत असेल अशी आशा करतो. एक-एक करत खूप जणांनी खूप आस्थेने माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या सुरक्षित असल्याबद्दलची चौकशी केली व त्याने मी भारवून गेलो आहे. प्रत्येकाला आतापर्यंत वैयक्तिक उत्तरेही पाठविली, पण शेवटी असं जाहीररीत्या कळवायचं ठरविलं! हा धरणीकंप सुमात्रा बेटाच्या पश्चिमेला "पाडांग"जवळ झाला. रिश्टर स्केलवर ७.९ म्हणजे चांगलाच मोठा होता. जीवित-वित्तहानी खूपच झालेली दिसतेय.

जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 01/10/2009 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. गुलझार) अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र भरावी नीज कशी कळेना मात्र स्वपनांच्या छाया भरलेल्या नयनी अपुल्या रात्रभर गैरांच्या होती दिनी अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र भरावी नीज कशी कळेना मात्र मिथ्या तुझ्या वचने वर्षे जाती व्यतीत जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र भरावी नीज कशी कळेना मात्र कशी सामावू नीज माझ्या नयनी दोन्ही माझे नेत्र भरले त्या अश्रूनी श्रीकृष्ण सामंत
काव्यरस