मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक गाणे/कविता हवी आहे

अरुण वडुलेकर · · काथ्याकूट
माझ्या लहानपणी माझी आई एक गाणे (कविता) नेहेमी म्हणायची. ते गाणे जसेच्या तसे मला आता आठवत नाही. मात्र ध्रुवपदातील एक ओळ चांगली आठवते. ती अशी, अजुनि कसें येती ना परधान्या राजा किरकिरती रातकिडे झाल्या तिन्हीसांजा हे गाणे एक विवाहिता, जी कामावर गेलेल्या (किंवा परगावी गेलेल्या) आपल्या पतीची वाट पाहाते आहे, त्याच्या प्रतिक्षेत म्हणत आहे. त्या काळच्या रीतिप्रमाणे ती पतीचे नांव सरळ सरळ घेऊ शकत नाही. म्हणून ती, ज्या बैलगाडीने तो बाहेर गेला आहे आणि त्याच गाडीने परतही येणार आहे, त्या गाडीच्या 'परधान्या - राजा' या बैलांची बैलांची नांवे घेऊन आपली काळजी व्यक्त करीत आहे. सर्व काव्यरसिक मिपाकरांना विनंती की ही कविता आणि तिचा कर्ता कवि कोणास माहिती असेल तर ती कृपया मिपावर द्यावी अथवा मला व्यनिने पाठवावी. कृपाभिलाषी, अरुण वडुलेकर

वाचन 5864 प्रतिक्रिया 0