Skip to main content

बंधारा

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 07/10/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
फॅन च्या पुलीला लावलेल्या फ्लो मिटर वरचे रीडींग पाहिल्यावर त्याने सुस्कारा सोडला. चाळीस अंश तापमानाची वेधशाळेने शक्यता वर्तवली होती. मे महीन्यात .२९ डेन्सीटीने फार्मिंग ही आत्महत्या आहे हे माहीत असुन सुद्धा ८००० स्क्वेअर फुटात सुमारे २५००० पिल्ले घेण्याचा धोका पत्करला होता त्याने.

वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -२००९

लेखक जिवाणू यांनी बुधवार, 07/10/2009 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
सजीवांची वाढ व विकास हे पेशिविभाजनाने होत असते. पेशींच्या वाढीची विशिष्ट सायकल असते ती चार भागात विभागलेली असते. १) G - 1 : ह्या फेज़ मधे विविध विकर तयार होतात, जी DNA च्या Replication ( म्हणजे DNA ची जशी संरचना तसाच DNA तयार करणे.) २) S : ह्या फेज मधे २ सारख्या गुणसूत्रांचे संच तयार होतात. ३) G - 2 : ह्या फेज़ मधे प्रथिने तयार केली जातात, जी माइक्रोट्युब्यूल्स च्या निर्मितीसाठी वापरली जातात. हि माइक्रोट्युब्यूल्स पेशींच्या विभाजनासाठी कार्य करतात. हि प्रकिर्या मिटोसिस (Mitosis) मधे होत असते. ४) M : M म्हणजे Mitosis ,ह्या फेज़ मधे सुरू होते. ह्यात केंद्रकाचे तसेच पेशींचे विभाजन होते.

(टोळभैरवी)

लेखक चेतन यांनी बुधवार, 07/10/2009 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुंदर 'भैरवी' वाचुन आणी चतुरंगांची (भैरवी) पाहुन म्हणलं आपण पण भैरवी ऐकवावी ;) ह. घे. एक एक शब्द जोड, भावनांचा मेळ नाही शब्दबंबाळ फार्स हा, यमकाचा खेळ नाही विसर टोमणे सारे, पाड लेखनेही मोठी, कोण कसे बोलते हे, ऐकण्याला वेळ नाही तुझे ढापलेले सारे, लेख इथे सिध्द झाले वेड घेउन पेडगावला जाण्याचे काम नाही सर्कीटांनी लेखकाशी उभे दावे मांडलेले अस्त्र विरजणाचे हे, थांबण्याचे नाव नाही मार खाणार आता, सावरुन घे स्वतःला तिखटावाचून काही, मिसळीची चव नाही
काव्यरस

अजुन एक प्रवास - भ्रमण

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 07/10/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
हुश्श्य ..... सुटलो बुवा!! एस. टी तुन उतरुन खिळखिळे झालेले अवयव आळोखे-पिळोखे देत जागेवर असल्याची खात्री करुन घेतली आणि बघतो तर काय, च्यामारी, हा हॉटेलवाला कुठे चालला? "ओ भाऊ, जरा चहा मिळेल का?"इति मी, "च्यॅक, बंद केलं म्या" त्याने हातभर मान हलवत नकार दिला, "आनि, तुमी कुठं चाल्ला हो, ह्या वक्ताला?, गडावर की काय?" म्हणत भुवया वाकड्या केल्या. आम्ही न बोलताच मान हलविली आणि गावात जायला निघालो. धा-पाच पावले पुढे जाऊन, एका बाप्याला विचारले, "गडावर जायला रस्ता कोठुन?" प्रश्नासोबत, त्याच्याही चेहर्‍यावर आश्चर्य आणि मित्रांच्या चेहर्‍यावर आठ्या एकत्रितपणे जन्माला आल्या.

तिरामिसु: A Piece of Cake

लेखक सुबक ठेंगणी यांनी बुधवार, 07/10/2009 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
'आपण खातो ते पदार्थ जर बोलू शकत असते तर त्यांनी काय बरं सांगितलं असतं?'असा मी ब-याचदा विचार करते. असाच एक मला विलक्षण गूढ वाटणारा पदार्थ म्हणजे तिरामिसु. नुसतं नाव घेतलं तरी तिरामिसुच्या घासाघासात भरलेल्या रुमानीपणाचा प्रत्यय येतो. कारण इटालियनमधे तिरामिसुचा अर्थ होतो “pick-me-up” एखाद्या रंगेल, बेफ़िकीर कलाकाराशी अनेक अफवा जोडल्या जाव्यात तसाच तिरामिसुही अनेक गुलजार कथांचा धनी आहे... काही सांगण्यासारख्या काही न सांगण्यासारख्या! असं म्हणतात की तिरामिसुचा जन्म पहिल्या महायुद्धाच्यावेळी झाला. त्यामुळे तिरामिसु म्हटलं की माझ्या डोळ्यापुढे येतं ते पहिल्या महायुद्धाच्या वेळचं इटली.

पुण्यातील मतदारांसाठी..

लेखक मि माझी यांनी बुधवार, 07/10/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
येथे तुम्ही स्वःतचे नाव व Sr. No पाहु शकता. http://58.68.122.135/newonlinevotersearch/frmSearch.aspx?value=Assembly येथे तुम्ही तुमच्या विभागातील उमेदवार व त्यांचे शिक्षण, क्रिमिनल रेकॉर्ड , मालमत्ता ई. पाहू शकता. http://pune.gov.in/election/election.html

आंबा कोणता , देवगड की रत्नागिरी..

लेखक गोगट्यांचा समीर यांनी बुधवार, 07/10/2009 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
या मौसमात आंब्याच्या आठवणीशिवाय काही नाही , म्हणुन म्हटलं जरा... आंबा म्हटलं की , आठवतो तो हापूस , आणि मग दोन नावे पुढे येतात . रत्नागिरी आणि देवगड .. बरेच वर्षं यावर वादविवाद होत आले आहेत .. की बेष्ट कुठचा? मिपावरही झाला असेल , पण आंबा जसा दरवर्षी येतो , तसा हा विषयही.. तर आपले यावर मत काय ? माझं विचारालं , तर देवगड दिसायला आकर्षक आणि आकाराने जरा अंमळ मोठा , पण रत्नागिरी ला तोड नाही.. चवीचा प्रश्न आहे हो !

(भैरवी)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 07/10/2009 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
फारा दिवसानी थोडा निवांतपणा मिळाला आणि समोर क्रांतीताईंची सुरेख 'भैरवी' दिसली, मग काय विचारावे?!..;) एक एक बोट जाड, चाखण्याची वेळ नाही 'भरती'चा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही आली पहा भजी गोल, घाल पुरणास पोटी, 'कट' कसा चुकला हे सांगण्याची वेळ नाही मनी असलेले सारे बेत इथे सिद्ध झाले, वेड्या मना, तुझी काजू 'सांडण्याची' वेळ नाही वारुणीचे टेबलाशी उभे ग्लास मांडलेले, रात्र चाखण्याची आहे, झिंगण्याची वेळ नाही 'बेड'पेच दिसे आता, आवरून घे सुरेला, घोरण्यावाचून काही 'रंग'ण्याची वेळ नाही! चतुरंग
काव्यरस