हराभरा कबाब
साहित्य :
कोबी ; गाजर ; फरसबी ; स्लाईस ब्रेड ; पनीर ; हि.मिरची (ठेचा) ; मीठ ; चाट मसाला ; चिली सास ;
बटर चुरा ; तेल .
कृती :
कोबी,गाजर,फरसबी,पनीर सर्व किसून घ्यावे . स्लाईस ब्रेड कोरडाच मिक्सरमधून चुरा करून घ्यावा.
भाज्यांचे पाणी काढून टाकावे.
नंतर सर्व भाज्या ,पनीर , ब्रेड कच्चेच एकत्र करावे.
'सामना'तील अग्रलेख
आजच्या सामन्यातील अग्रलेख वाचला का?
नसेल तर पहा...
मराठ्यांचे पुन्हा एकदा 'पानिपत'- शिवसेना
मुंबई
अखंड महाराष्ट्रासाठी राज्यात शिवसेनेच्या भगव्या झेंड्याने काय खस्ता खाल्या हे कदाचित नव्या पिढीला माहीत नसावे, त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, त्यांना भगव्या झेंड्याचे तेज ठावूक नाही आणि म्हणूनच त्यांनी हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याचे काम केले आहे.
स्टिम्ड फिश - एक हेल्दी रेसीपी
हा गणपा सांगून देखील नुस्ता तळतळाट करत राहील्याने व क्रस्टेशनच्या डिश बनवत राहील्याने मासा पाकृ मलाच द्यावी लागतीय. अरे पोट आणी कुल्ले फ्व्वाक्कन बाहेर आली तरी नुस्ते तळकट पदार्थ हाणताय तुम्ही सगळे. लेको जरा बनवा मी सांगतो ते पदार्थ. मग आवडती स्त्रीला आवडेल असे काही आवडते काम करु शकाल. खालच्या डीश मधे तेल वापरले नाही म्हणून इथे नमनाला दोन चमचे ;-)
बरं तर उत्तम मासे निवडायला लागणारी "साधना" नसेल किंवा तुमची आवडती "कोळीण" नसल्यास, तुमच्या आवडत्या मॉल / बाजारात जाउन फ्रेश सी फूड विभागातून तुम्हाला आवडेल असे ताजे कापलेले माश्याचे काप विकत घ्या. मी गुरामी नावाच्या माश्याचे काप घेतले आहे.
काही ऐकलेल्या आठवणी
नमस्कार मित्रहो,
कला क्षेत्रात अनेक महान व्यक्तिमत्व झाली.मग ते गायन , लेखन , अभिनय कोणतेही क्षेत्र असो त्या त्या क्षेत्रात पराकोटीची उंची गाठलेल्या व्यक्तींविषयी आपल्याला खचितच बोलायला , ऐकायला आवडतं. मला तरी नक्की आवडतं.
या धाग्यावर मला अशा आठवणी सांगायला आणि आपणाकडूनही ऐकायला आवडतील.
एक आठवण कविवर्य सुरेश भट यांच्याबद्दलची आहे.
एकदा भट साहेब एका महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवाला प्रमुख पाहुणे होते. गायनाचा कार्यक्रम सुरु होता . गायिकाही मन लावून गात होती . भटसाहेबही दिलखुलास दाद देत होते.
पान -रंगीत, गुळगुळीत
एक विषय बरेच दिवस मनात घोळत होता, परवा प्रमोद देवांच्या एका चर्चेला लागलेल्या अवांतर वळणांमुळे परत मनात आला. झाले असे की प्रमोद देव यांच्या चर्चेत पुढे कधी मिपाचा दिवाळी अंक निघाल्यास त्यावर एखाद्या चित्ताकर्षक बाईचे चित्र असणार म्हणून संकेतस्थळाच्या संस्थापकांनी जाहीर केले.
खरे तर केवळ व्यावसायिक दृष्टीने पाहिले तर अंकाच्या मुखपृष्ठाची गरज ही ग्राहकाला अंक आकर्षक वाटावा, त्याने तो विकत घ्यावा म्हणून असते. पण त्याचप्रमाणे अंकाच्या आत जो मजकूर असतो, अंकाची म्हणून एक खासियत असते त्याच्याशी तिचे साधर्म्य असावे ही देखील अपेक्षाही ग्राहकाची/संस्थापकांची असते किंवा असावी.
आभास तू..
मनांत माझ्या फ़ुलून आल्या
रातराणीचा सुवास तू
रंगबिरंगी वसंत फ़ुलांची
ओंजळितली रास तू
क्षणैक खांद्यावरी विसावे
तो असा निश्वास तू
मित्रत्वाच्या नात्यामधला
तो अभंग विश्वास तू
अखंड कोसळणार्या झिरमिर
चिंब सरींचा न्यास तू
क्षितिजावरती रंगलेली
सुवर्णाची आरास तू
डोळे मिटूनी तुला पहावे..
भास तू आभास तू
तुझ्याविना मी कसे जगावे
सांग!.. माझा श्वास तू
प्रेमवेड्या या मनाला
लागलेला ध्यास तू..
प्रणयातील उत्कटतेचा
अगळा उल्हास तू
पुढे पुढेच जात रहावे
न संपणारा प्रवास तू
कधी वेंधळा, कधी प्रगल्भ
जन्मोजन्मी हवास तू..
- प्राजु
बहुधा
त्याला माझे मोहरणे रुचलेच नसावे
त्याचे माझे बंध कधी जुळलेच नसावे
शब्दांचे हे गाव पोरके, केविलवाणे,
भावार्थाचे बीज इथे रुजलेच नसावे
भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती,
वेडे मन त्यांचे सावज पहिलेच नसावे !
त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला
आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे
मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले,
या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे
येता जाता श्रावण येथे थांबत होता,
त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे !
कालकुपीतुन काही क्षण हलकेच चोरले,
त्यांत जशी जगले मी, कधि जगलेच नसावे !
पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे,
इथे असावे तरी कधी इथलेच नसावे !
<?!#^&* भरीत *&^#!?>
आमची प्रेरणा मोडकांचे गणित व नान्याचे प्रतिबिंब
कविता करताना
मोडक म्हणाले स्वता:शी
"अगणीत>,(गणित!),[वळीत],
दहाजणीत!, (झिरो),सणसणीत>>>>,
((गणित)), [गणित!] की झणझणीत"
कोणतं विडंबन येईल आधी??
प्रश्न सुटेनासा झाला तेंव्हा
केव्हातरी, २००८ मधे केलेली
कविता ऑक्टो २००९ मधे मिपावर डकवली
***
जुम्म्याची आंघोळ करून आवरताना
आरशात पहिलं नानानं
तेंव्हा आरशातही त्याला
एक प्रतिबंब दिसलं
तिच्यायला , हे तर माझंच प्रतिबिंब आहे
असं म्हणत तो
एकटाच हापिसला निघाला तेंव्हा
त्याच्याकडे पाहत ते प्रतिबिंब म्हणाले
"दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं"
रचना उद्या टारूसोबत आहे.आम्ही आज आता ताबडतोब मजा करून
काव्यरस
गणित!-२
मिपाच्या नवे लेखन यादीत डोकवता
'शामो' स्वतःशीच म्हणाला,
"(गणित),दहाजणीत!,अगणीत>,((गणित)),(झिरो), झणझणीत,[गणित!] ,सणसणीत>>>>,[वळीत] -
विडंबन झाली का पूर्ण?"
गणित सुटेनासं झालं तेव्हा,
अंधुक फुटलेला एक हुंदका
आणि सहज एक विचार डोकावला...
***
खेद लपवून वाचताना
यादीवर पाहिलं त्यांन
तेव्हा 'विडंबनां'ची त्याला
एक संख्या दिसली...
दिसणं, आणि असणं
या जालाचा नियम
उमजेपर्यंत तो हरला...
मुळ कवितेचे प्रतिसाद
मोजले तेव्हा
त्याच्याकडंच पाहात
ती संख्या म्हणाली,
"येव्हडीतर विडंबने झालीत!"
रचना: केव्हातरी, २००९
मिसळपाव