Skip to main content

लिंगाणा...

लेखक विमुक्त यांनी रविवार, 08/11/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
तोरणा चढताना बिनी दरवाजाच्या जवळ पोहचलो, की उजव्या हाताला दूरवर एका सुळक्याचं टोक दिसतं. कोकणातून मान वर काढून रायगड आणि भवतालच्या परिसरावर पहारा ठेवणाऱ्या लिंगाण्याचं ते डोकं. "गड्या, ये की एकदा भेटायला" असं म्हणून लिंगाणा सारखा मला बोलवत असतो... लिंगाणा चढायला अतीशय अवघड आहे. निम्मा गड चढल्यावर दोर लावल्या शिवाय चढताच येत नाही. पूर्वी कैद्यांना लिंगाण्याच्या माथ्यावर ठेवायचे, म्हणजे कैदी पळायचा प्रयत्नच करायचे नाहीत (खरंतर पूर्वी गडाच्या माथ्या पर्यंत जायला खोबण्या होत्या, आता त्या नाहीत). तळकोकणातून बघितल्यावर शिवलिंगा सारखा दिसतो म्हणून कदाचीत ह्याला लिंगाणा म्हणत असावेत.

वा गं वा! तुझा का माझा......?

लेखक भानस यांनी रविवार, 08/11/2009 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळीच नम्रताचा फोन आला..... तिने जी पंजाबमेल सोडली ती शेवटी तिच्या स्वरयंत्राने तिच्या संतापाची-त्राग्याची साथ सोडल्यावर नुसताच फुसफुसाट होऊ लागला तशी जरा कुठे ती थांबली. " अग, हो हो... जरा हळू गं. किती संतापशील? आणि हा असा त्रागा करून तुझ्या जीवाला होणाऱ्या त्रासात फक्त भर पडतेय. तेव्हा दम खा आणि शांतपणे सांग मला. " हे माझे वाक्य ऐकले अन पुन्हा ही उसळली, " म्हणे शांतपणे.... तुझे काय जातेय गं हे सांगायला. ज्याचे जळते ना त्यालाच कळते. तू चुपचाप ऐकायचे काम कर.

जमलं एकदाचं...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 08/11/2009 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
एका घरात दोन पाळलेले बोके मजेत राहात होते. मालकाच्या घरी समृद्धी असल्याने त्यांची चैन होती. दिवसभर मलई खायची, आणि रात्री ढेकर देत मऊशार गादीवर लोळत पडायचे... असे मजेत दिवस जात होते... थोडक्यात, सुखाचा अगदी `वर्षा'व सुरु होता. दुसरा बोकाही हुशार होता. दिवसभर डोळे मिटून `मलई’ चापायची, आणि रात्री निजण्याआधी `राम'नामाचा जप करत दिवसभरातल्या गिव्ह ऎंड `टेक'चा हिशेब माडत पहुडायचे... एकूणच, दुसरा बोकाही सुखात असल्यामुळे, दोघांच्यातही भांडणाचा मुद्दाच नव्हता. आपापल्या ताटातली मलई खायची आणि मजा करत सुस्त राहायचं... शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय?... मजेत जगणं हेच ना?...

(पोटातला कावळा)

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 07/11/2009 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल भग्न खवल्यांचे तळे दाटलेले तुझे अंगही पूर्ण पाणावलेले मनी आठवे आमटीचा वाफारा काटे गिळतांना घशां टोचलेले असे मी मनाच्या खुशीच्या महाली जरी विळीने हात रक्ताळलेले सुखाची करू कामना मी कशाला? सुर्मई-भाताचे मीलन ठरलेले असे डांबिस पूर्ण कृतज्ञ तुझा मला आज हे प्राण तू वाहिलेले ||ओम श्री परमेश्वरस्य प्रथमावतारः नमः || :)
काव्यरस

सुनीता देशपांडे यांचे निधन...

लेखक विद्याधर३१ यांनी शनिवार, 07/11/2009 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
अत्ताच म्.टा. मध्ये वाचलेल्या बातमी नुसार श्रीमती सुनिता देशपांडे यांचे पुण्यात निधन झाले. "आहे मनोहर तरी" या आत्मचरित्राने प्रसिध्द झालेल्या सुनिताबाईना आदरांजली.

जरा मला मार्गदर्शन कराल काय?

लेखक उम्मि यांनी शनिवार, 07/11/2009 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपला उम्मि घर (Flat) खरेदिचा विचार करतोय सध्या... जरा मला मदत करा ना, पैशांची नाही हो, आपल्या अनुभवी सल्ल्याची.......... under construction असलेल्या ईमारतित बुंकिग करताना कोणती काळजी (कागदपत्रे वगैरे संदर्भात) घेतली पाहिजे? तसेच Resale मधिल Flat खरेदी करताना कोणती काळजी (कागदपत्रे पडताळुन) घेतली पाहिजे? तरी जाणकारांनी मार्गदर्शन करावे... आपला उम्मि...

पैलतिरी..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 07/11/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा पुन्हा तू नको विचारू! प्रीत आपुली जन्मांतरी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. इतुके ओझे अपेक्षांची खांद्यावरती असे भारी किंचित हसूनी जगतानाही कळ उठते हृदयांतरी थोडी होईल गती कमी पण नसेल काही जबाबदारी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. किती संपले किती राहिले, हिशोब सारा यथातथा मनांस वरले मनानेच मग काय कथा अन काय व्यथा? शितल छाया मनांस भावेल, रखरखणार्‍या उन्हापरी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. नको विचारू कधी, कुठे तू!
काव्यरस

'मिपा ताडीमाडी पुरस्कार!' 'माडीग्रंथ'! सर्व विडंबकांना एक विनम्र आवाहन...! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 07/11/2009 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
सदर निवेदनामागे कुणाच्याही ज्ञानाचा अवमान/अपमान करण्याचा हेतू नाही. केवळ अन् केवळ करमणूक, मौजमजा आणि विरंगुळा हाच एकमेव उद्देश आहे..

डोकेफिरु सैनिकाचा धिंगाणा (शीर्षक संपादित)

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 06/11/2009 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
तथाकथित शांतताप्रेमी धर्माचा एक कट्टर अनुयायी कसे आत्ततायी कृत्य करता झाला आहे पहा. अमेरिकेत टेक्सस प्रांतात फोर्ट हूड ह्या सैनिकी तळावर काम करणारा निदाल मलिक नामक एक ज्येष्ट मुस्लिम सैनिकी अधिकारी. काल कुठल्याशा कारणाने त्याचे टाळके सरकले आणि अल्ला हु अकबर च्या आरोळ्या ठोकत त्याने गोळीबार सुरु केला आणि डझनभर लोकांना ठार केले आणि कित्येकांना जखमी केले. अजून सगळ्या का आणि कसे ह्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. पण गंमत अशी की इथली तमाम बातम्या देणारी चॅनले ह्यात इस्लामचा कसा काहीच दोष नाही हे दाखवण्यात मग्न आहेत. कुणी त्या नराधमाची माहिती फारशी देत नाही.

सचिन....

लेखक कोदरकर यांनी शुक्रवार, 06/11/2009 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
भारत क्रिकेट ... सचिन ने दिलेल्या नेत्रदीपक अनुभवा बद्द्ल त्याचे शतशः आभार... सचिन जिंकला... भारत हारला... हे असे नेहमी का होते...?