Skip to main content

हिरवा साज

लेखक जयवी यांनी बुधवार, 25/11/2009 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिम बरसतो सखा साजण पाऊस साज घेऊन हिरवा, येतो साजण पाऊस तिची प्रतिक्षा ओलेती अन सखा ही आतूर पानापानात शहारा, कणाकणात अंकूर हिरवाईचे डोहाळे तिचे पुरवतो सखा खुळावते राणी कशी साज लेऊन अनोखा मिरविते नवा शालू भरजरी तो हिरवा प्रेमसरीत भिजूनी चढे रंग गाली नवा मेघ दाटती नभात तिचे बघण्या कौतुक हलकेच उतरती, घेती चुंबन नाजुक तीट लावियतो गाली, वारा हळूच वाकून शेला फुलांचा रंगीत, धरा घेते पांघरुन जयश्री अंबासकर
काव्यरस

गुगल वेव्ह ?

लेखक माझी दुनिया यांनी बुधवार, 25/11/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी गुगलच्या या सेवेकरिता मी मागणी केली होती. मला या सेवेबद्दल फारशी काही माहिती नाही. ही सेवा कशी वापरावी ? या सेवेकरिता माझ्याकडे ८ जणांना आमंत्रण पाठवण्याची मुभा आहे. ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी मला व्य.नि. पाठवावा.

[कसाही का असेना]

लेखक अमृतांजन यांनी बुधवार, 25/11/2009 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अन माफी- मुळकविंची! कामांना घरातल्या पटापट उरकत जा ना बैलोबा नुसता; म्हणे नवऱ्याचा दर्जा द्या ना..!! सवलती मला दे की, चालते भुणभूण रोज ती तीच ती कारणे अन त्याच त्या फुसक्या गर्जना.. निस्तरतांना थकते मी चुका तुझ्या पुन्हा पुन्हा करते का हे सहन मी हेच मला समजेना.. काय रे ते निर्वाणाचे बोललास काय नेमके होणार नाही दुःख मला, तुला बाहेर काढतांना... बोच दुखरी आहे तरी मनाला माझ्याही ठोंब्या असला तरी नवराच माझा आहेसना.. एऽऽ, दुपारी थोडीशी विश्रांती तू घेशील ना कामाला त्या नंतरच्या ताकद तर हवीना.. सुटकेची ती स्वप्ने पाहतोसच तू कशाला व्यर्थ आहेत ती बरे, गाठ माझ्याशी आहेना..!
काव्यरस

(२६/११/२००९)

लेखक चेतन यांनी बुधवार, 25/11/2009 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
ऋषिकेशची (२६/११/२००९) वाचुन आणि इतर काही प्रगल्भ संस्थळावरचे मराठीद्वेषी विचार वाचुन थोडिशी विडंबनाची कंड सुटली.... डिस्क्लेमिअरः ओषधोपचार सुचवु नये (स्वयंघोषित डॉ.
काव्यरस

<नंदनला पत्रे>

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 25/11/2009 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल "स्त्रीसौंदर्य, रुचकर खाणंपिणं, आणि संगीत बजावणं या तिन्ही वाबतीत भारतासारखी महासत्ता कोणाकडेच नाही रे!!!!" व्वा!! क्या बात है!!!
काव्यरस

आमचा रंग देऊन पाहा

लेखक गिरीश कुळकर्णी यांनी बुधवार, 25/11/2009 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
********************************** ********************************** ढगांना सांगीन जरासे जमीनीवर येऊन पाहा वीजा पोरखेळ होई इथे श्वांस तर घेऊन पाहा वळीवाचे बेत कसले,कसला वादळाचा पुकारा इथल्या बंदूका नी आमच्या शांतता झेलून पाहा दुरुन दिसते साजरे असेच सर्वदूर म्हणती तुम्ही मात्र धरीत्रीला मनसोक्त बिलगून पाहा गमते उदास जेंव्हा तुमचा मोठाच आधार होतो आमच्या काळजांतही कधी जरासे ढुंकून पाहा आकाशी म्हणे सगळे आलबेल आहे,दुरुस्त आहे इथे येऊन गड्यांनो जरासा तालही सोडून पाहा आमचे दाह आम्हीच जाणतो तरीही त्रुप्त जगतो आत गोठल्या पावसाला आमचा रंग देऊन पाहा ****************************** ***************

दम बिर्याणी

लेखक गणपा यांनी बुधवार, 25/11/2009 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या हिंदुस्तानाने जगावर अनंत उपकार केले आहेत. अहो मंडळी अशी दचकु नका. मुद्दामच भारता ऐवजी हिंदुस्तान हा शब्द वापरला. नाही नाही कुणा हिंदुहृदय सम्राटांच भाषण ऐकुन आलो नाही की दै. सनातन वा रा.स्व. संघाच पत्रकही नाही वाचलं. अहो आपल्या देशाने जगाला सर्वात मोठ्ठ अस शुन्याच वरदान दिलं. अनेक गणितज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत,कलावंत दिले. संगिताचा अमुल्य ठेवा दिला. हिंदुस्ताना एवढा विविधतेने नटलेला दुसरा एखादा देश या भुतलावर विरळाच. जितक्या वेगवेगळ्या भाषा, वेशभुषा, परंपरा, चाली-रीती, निसर्ग सौंदर्याने नाटलेले प्रदेश तितकीच विविधता इथल्या खाद्य परंपरेत.

तुमच्या आवडीचं हेरगिरीचं पुस्तक कुठलं?

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 25/11/2009 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, हेरगिरीवरचे तुमचे आवडते पुस्तक/के कुठलं? तुम्हाला ते सर्वात जास्त का आवडलं ते सांगता येईल का? एखाद्या लेखकाचा या विषयात हातखंडा आहे का? हे पुस्तक मराठी किंवा इंग्रजीतील असावं. मी अश्या तर्‍हेची पुस्तके कधीच वाचलेली नाहीत मात्र आता एक चौकशी झाली तेव्हा मी काहीच बोलू शकलो नाही. मग म्हटलं मिपाकरांकडून मदत घ्यावी. तर तुम्हाला आवडलेलं हेरगीरीवरचं सर्वात चांगलं पुस्तक कुठलं? तसेच याच विषयावरचा उत्तम चित्रपट सुध्दा सुचवू शकता. -- नीलकांत

बुधवारची कविता: (प्रतिसाद का टिकेना)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 25/11/2009 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कवितेची प्रेरणा टंकतानाही का ना टीकेना शब्द आता सांग ना तेच सारे ताव आणि त्याच सार्‍या वल्गना हाणामार्‍या त्याच त्या की, वारही हो तेच ते तेच ते धमकाविणे अन मिर्‍या वाटणे पुन्हा भांडताना हाणतो मी त्यासहो पुन्हा पुन्हा असते तेथेही नित्य संपादकीय निर्भत्सना घाव तेही वर्मीचे, 'भुर्र' झाले नेमके तेच ते निषेध आणि त्याच शरमेच्या भावना तीच संस्थळे आणि तीच संपादकीय धोरणे तेच ते लोचट करती लुभ्रा निलाजरेपणा जा कुठेही मिळती तेच फासलेले रंगही भुर्र होई वेगळीशी मांडलेली भावना.. सर्वत्र जा तीच वृत्ती दिसतसे या लोचना एक नागोबाच वसतो वेगवेगळाल्या
काव्यरस

अहो पाहुणे हळुहळू होवू द्या, घाई करू नका, असं लाजू नका

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 25/11/2009 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
अहो पाहुणे हळुहळू होवू द्या अहो पाहुणे हळुहळू होवू द्या घाई करू नका, असं लाजू नका || धृ || लई दिसानं आलेत आज जेवण केलयं पुरणपोळीचा थाट स्वस्थ होवूद्या काय लागलं तर मागून घ्या जेवण निवांत होवूद्या ||१|| घाई करू नका, आसं लाजू नका || धृ || पुढ्यात ठेवलीय वाटी आन ताट त्याखाली दिलाय चंदनी पाट वरणभात कालवूनी करा सुरूवात आजच्या दिवस रहा जा हो उद्या ||२|| घाई करू नका, आसं लाजू नका || धृ || कुरडई पापड भजी अन पुरी ओरपा की जरा सार, गुळवणी तुप लावूनी घ्या एकदा पुरणपोळी पोटभर जेवा हात मारा आडवा |||३|| घाई करू नका, आसं लाजू नका || धृ || भरीत झालय झकास आज तुमच्या वहिनीन केलय खास ठ