Skip to main content

(उशिराने आलेलं) शहाणपण.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 16/12/2009 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
( उशिराने आलेलं ) शहाणपण..... रहायला भलं मोठठ घर आहे झोपायला स्वतंत्र खोली आहे अंगावर पांघरणारे "बाबा" नाहीत..... म्हणून झोप मात्र हरवली आहे ! जेवायला रोज चमचमीत मिळते आतून ढेकर मात्र येत नाही ! शिळ्या पोळी-पिठल्याची चव यावी म्हणून रात्री एक पोळी उरवली आहे ! कामावर जायला कंपनीची बस आहे इमर्जान्सीला मोबाईल फोन आहे सुबत्ताअसूनही मुलं नाखूष का? गरीबीत पण आमची सोय कशी पुरवली आहे? या कुशीवर वळतो , बाबा दिसतात त्या कुशीवर वळतो , आईचे कष्ट दिसतात उताणी पडलो तर मन मारलेले ताई-दादा दिसतात आठवांच्या आसवांत रात्र रात्र जिरवली आहे ! सुखांसाठी पैसा लागतो पण.....

एक अस्वस्थ रात्र

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 16/12/2009 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री एकचा सुमार असेल. काळी कभिन्न रात्र! थंडीचा कडाका अर्धवट झोपेत जाणवत होता. बेडरूममधला छोटा दिवा मिणमिणत होता. त्याचा पांढुरका मंद प्रकाश खवळलेल्या अंधाराला भगदाड पाडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. अंधाराने जणू त्या मंद आणि रडवेल्या प्रकाशाचे धड आपल्या मुठीत गच्च पकडून ठेवल्याचा भास होत होता. मी एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर वळत पुन्हा गाढ झोपी जाण्याचा प्रयत्न केला. नाही जमलं. अर्धवट झोप आणि विचारांची अविरत चालणारी चक्की! शांत झोप लागत नव्हती. झोपण्याच्या काही क्षण आधीच मित्राचा एसएमेस वाचला होता.

दुरावा

लेखक जयवी यांनी बुधवार, 16/12/2009 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
देतोस का उजाळा त्या धुंद आठवांना होतोस काय हळवा स्पर्शून आठवांना ती एकली दुपार तो प्रश्न कापरासा ती खूपशी कबुली इन्कार ही जरासा झाल्या मग अचानक सांजा अजून कातर अवघडले होते जगणे विरहातले निरंतर तैसाच चंद्र अर्धा दोघांत वाटलेला त्या पौर्णिमेत अजूनी तू मुक्त सांडलेला आहे तसा शहाणा अपुला जरी दुरावा आतून पेट घेतो कधी तोच रे दुरावा जयश्री अंबासकर
काव्यरस

खरडवही आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न

लेखक चिंतातुर जंतू यांनी बुधवार, 16/12/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
  1. इतरांच्या खरडवहीत खरडण्याचा हक्क मिळवण्यासाठी नक्की काय पराक्रम गाजवावा लागतो ते कुणी सांगेल का?
  2. वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांपैकी हा एक दिसतो. त्यामुळे वाविप्र मध्ये त्याविषयी माहिती टाकल्यास बरे होईल असे वाटते. तसे करता येईल का?
  3. वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना कुणी उत्तरे देताना दिसत नाही. त्याची व्यवस्था होऊ शकेल का?
अग्रिम पण चिंताग्रस्त ( :S काय करणार? स्वभावाला औषध नाही) धन्यवाद.

(दाढदिवस)

लेखक रेवती यांनी बुधवार, 16/12/2009 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा?... घरातूनच मिळाली हे सांगायलाच हवे का? म्हणतात ना ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या.....जाऊदे तुम्ही आपलं विडंबनच वाचा! ;) (सूचना - वृत्त, मात्रा वगैरे कोल्हापुरी चपला घालून फिरायला गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही!... :D ) हे रोजचेच दुखणे, सहण्यात वेळ गेला दाढेस भर पहाटे मळण्यात वेळ गेला घासू किती किती मी, चोळू किती किती मी ढवळ्या न दंतपंक्ती जपण्यात वेळ गेला चोळून जाड ब्रश हा तोंडात कोंबताना गळत्या चुकार फेसा धरण्यात वेळ गेला अजमावुनी बदामा जोरात चावताना तुटला असा कसा हा? कळण्यात वेळ गेला वार्षीक दंतदिवशी क्राऊन बसवताना दिसते खरी कशी मी बघण्यात वेळ गेला!! रेवती
काव्यरस

गझल तिहाई - सस्नेह आमंत्रण

लेखक अजय जोशी यांनी बुधवार, 16/12/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
गझल संग्रहांचे प्रकाशन आणि गझल मुशायरा दिनांक २० डिसेंबर २००९, रविवार रोजी सायंकाळी ५ ते ८ यावेळात सह्याद्री सदन, हॉटेल विश्वची गल्ली, टिळक रोडजवळ, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्ष : डॉ. राम पंडीत, प्रमुख पाहुणे : डॉ.

कसाब आणि दयेचा अर्ज...

लेखक प्रशान्त पुरकर यांनी बुधवार, 16/12/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरानो... आजच्या मटा मध्ये खालिल बातमी वाचलि... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5341505.cms शन्का फक्त येवढिच कि कसाब (पाक नागरिक ) पण अफझल गुरु सरखा दयेचा अर्ज करु शकतो का...(त्याल म्रुत्युदन्ड होनार हे मी ग्रुहित धरले आहे)... तसे असल्यास त्याचे पण लाड पुरवावे लागतील पुढे...माझ्या घामाच्या पैशातुन ~X(

('वाढ'दिवस)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 16/12/2009 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
हा वाढदिवस वाचून आम्हाला आमचा प्रत्येक 'वाढदिवस' आठवला! :D हे रोजचेच फुगणे, बघण्यात वेळ गेला गजरास भर पहाटे कळण्यात वेळ गेला पळलो किती किती मी, वळलो किती किती मी ढळल्या न वळकट्या ह्या जपण्यात वेळ गेला अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला अजमावुनी बळाला वजनास उचलताना घटलो असा किती मी? कळण्यात वेळ गेला "रंग्यास" वाढदिवशी ये भान वाढल्याचे पोटामुळेच काटा दिसण्यात वेळ गेला!! चतुरंग
काव्यरस

खरी कमाई....

लेखक भानस यांनी बुधवार, 16/12/2009 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय साध्या साध्या गोष्टी किती सुख देऊन जातात. अनेकदा त्या करणाऱ्याला त्याचा गंधही नसतो. तो आपला नेहमीच्या रहाटगाडग्यात अगदी नकळत ते करून जात असतो. पण ते दुसरे मन मात्र हा चांगुलपणा टिपत असते. आणि कुठेतरी त्या मनातही या अनपेक्षित मदतीच्या ओघाचा जन्म होतो. त्यातल्या निखळ सुखाची त्याला एकदा का गोडी कळली की आपसूक तोही त्या साखळीचा हिस्सा होऊन जातो. मी याबाबतीत खूपच भाग्यवान. अनेक मित्र-मैत्रिणी, ओळखीचे, अनोळखीही माझ्या जीवनात अनेकप्रकारे बंध निर्माण करून गेलेत. ही ’ खरी कमाई ’. सहजी केलेली निरपेक्ष गुंतवणूक.

भिगवणचे परदेशी पाहुणे

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी मंगळवार, 15/12/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या आठवड्यात खबर लागली की पुण्यापासून १०० किलोमीटरवर असणाऱ्या भिगवणला नवीन पाहुणे आलेत: रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो ऊर्फ अग्निपंख. मग काय केले दोन लोक तयार आणि गेलो डायरेक्ट तिकडे. पण काही कारण नसताना ट्राफिक जाम लागले पुणे-सोलापूर रोडवर आणि १०० किमी अंतर कापायला चार तास लागले. पहाटे पाच वाजता निघालो होतो, पण साडेनऊला पोचलो तिथे. काही बरे फोटो मिळाले. त्यातलेच दोन मिपासाठी.
सर्व हक्क सुरक्षित.