मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुरावा

जयवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
देतोस का उजाळा त्या धुंद आठवांना होतोस काय हळवा स्पर्शून आठवांना ती एकली दुपार तो प्रश्न कापरासा ती खूपशी कबुली इन्कार ही जरासा झाल्या मग अचानक सांजा अजून कातर अवघडले होते जगणे विरहातले निरंतर तैसाच चंद्र अर्धा दोघांत वाटलेला त्या पौर्णिमेत अजूनी तू मुक्त सांडलेला आहे तसा शहाणा अपुला जरी दुरावा आतून पेट घेतो कधी तोच रे दुरावा जयश्री अंबासकर

वाचने 3443 वाचनखूण प्रतिक्रिया 13

अवलिया Wed, 12/16/2009 - 14:12
माननीय जयवीजी चांगली रचना.
ती एकली दुपार तो प्रश्न कापरासा ती खूपशी कबुली इन्कार ही जरासा
इन्कार या शब्दाऐवजी नकार हा शब्द चालला असता का याचा विचार करत आहे. धन्यवाद ! --अवलिया

In reply to by श्रावण मोडक

दशानन Wed, 12/16/2009 - 14:45
श्रावण मोडक -जी, + १ मी देखील असेच म्हणतो. धन्यवाद. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

In reply to by दशानन

श्री श्री श्री अवलिया'जी', श्रामो'जी' आणि राजे'जीं' शी आम्ही पण सहमत 'जी' ! धन्यवाद. अवांतर : जयुताई सुंदर कविता. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

भानस गुरुवार, 12/17/2009 - 01:58
जयश्री कविता आवडली! विशेषतः ' आतून पेट घेतो कधी तोच रे दुरावा '.... सहीच.

प्राजु गुरुवार, 12/17/2009 - 08:18
सुंदर!! तैसाच चंद्र अर्धा दोघांत वाटलेला संदर आहे ही कल्पना! - प्राजक्ता http://www.praaju.com/

चतुरंग गुरुवार, 12/17/2009 - 17:20
अर्धा चंद्र - छान कल्पना! (आम्हाला कविता आवडल्याचा पुरावा इथेही आहे! ;) ) चतुरंग

तैसाच चंद्र अर्धा दोघांत वाटलेला त्या पौर्णिमेत अजूनी तू मुक्त सांडलेला
क्या बात है! सहीऽऽ! आपला, (वाचक) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

शुचि Mon, 02/08/2010 - 01:05
काय सुंदर कविता आहे वा!! खल्लास!!!!! ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)