Skip to main content

(उशिराने आलेलं) शहाणपण.....

(उशिराने आलेलं) शहाणपण.....

Published on 16/12/2009 - 14:47 प्रकाशित मुखपृष्ठ
( उशिराने आलेलं ) शहाणपण..... रहायला भलं मोठठ घर आहे झोपायला स्वतंत्र खोली आहे अंगावर पांघरणारे "बाबा" नाहीत..... म्हणून झोप मात्र हरवली आहे ! जेवायला रोज चमचमीत मिळते आतून ढेकर मात्र येत नाही ! शिळ्या पोळी-पिठल्याची चव यावी म्हणून रात्री एक पोळी उरवली आहे ! कामावर जायला कंपनीची बस आहे इमर्जान्सीला मोबाईल फोन आहे सुबत्ताअसूनही मुलं नाखूष का? गरीबीत पण आमची सोय कशी पुरवली आहे? या कुशीवर वळतो , बाबा दिसतात त्या कुशीवर वळतो , आईचे कष्ट दिसतात उताणी पडलो तर मन मारलेले ताई-दादा दिसतात आठवांच्या आसवांत रात्र रात्र जिरवली आहे ! सुखांसाठी पैसा लागतो पण..... नुसत्या पैशाने सुख मिळत नाही ! कष्टाची बी प्रेमाच्या खताने आता मी समाधानाच्या मातीत जिरवली आहे !....... -------उदय गंगाधर सप्रे - ठाणे.
लेखनविषय:

याद्या 1424
प्रतिक्रिया 2

श्री रा रा उदयजी सप्रेजीसाहेब आपली कविता छान आहे. मात्र अनिवासी सुखी माणसांकडुन मिळणा-या थपडांना तयार रहा. विशेषतः सिंगापुर आणि यक्षनगरीतील भारतमातेचे कर्तृत्ववान सुपुत्र आपल्यावर विशेष रोष दर्शवु शकतात. धन्यवाद ! --अवलिया