Skip to main content

“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)

लेखक II विकास II यांनी रविवार, 03/01/2010 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
“महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून “हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा” ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत.

अश्वत्थ

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 03/01/2010 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
अश्वत्थ अश्वत्थाच्या अखंड सळसळी मधे अजुन एक पान गळून पडले आहे अश्वत्थ तसाच सळसळतो आहे अखंड हसतो आहे. पान गळून जाण्याचा कधी होतो उत्सव तर कधी आक्रोश ... अश्वत्थाला त्याचे काहीच नसते जशी पाने गळतात ... तसेच धुमारेही फुटत राहतात ... .... अश्वत्थाला त्याचेही काही नसते हां ...

द्विधा

लेखक गिरिजा यांनी शनिवार, 02/01/2010 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
(काल्पनिक) "मग आता तुझं शिक्षण संपल्यावर काय करणार तू?" "काय म्हणजे काय? करेन जॉब नाहीतर पुढे शिकेन अजून.." "काय पण म्हणजे?" "बघू गं.. हे होऊ देत आधी.. तोवर ठरवेन मी.." ------------------------------------------------------------------------------------------------ "जॉब ना.. मला काही फरक पडत नाही फारसा.. पुण्यात मिळालं काय किंवा बाहेर जावं लागलं काय.. माझी तयारी आहे.. जोवर भारत सोडवा लागत नाहीये" "हम्म.. मला माहितीये.. तुला पुण्याबाहेरचा का चालणारे ते.." "अस्सं?" "हम्म.. म्हणजे मग आत्याची भुणभुण नाही तुझ्यामागे लग्न कर लग्न कर.." "हा! well.. that is like an additional thing..

पूर्वीगत पण आता कोणी हिणवत नाही

लेखक चेतन यांनी शनिवार, 02/01/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
अभ्यंकर गुर्जींचा कच्चा आणी पक्का माल वाचुन थोडासा टाइमपास करावासा वाटला पूर्वीगत पण आता कोणी हिणवत नाही पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही B) खरेच का पण आपण कंपुत सामिल झालो अजून का लेखास प्रतिसाद मिळत नाही :?
काव्यरस

नटरंग डोस्क्यामंदी झिंग

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शनिवार, 02/01/2010 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
( वि. सु. चित्रपट परिक्षण लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे मंडळी काही चुकल माकल तर माफ करा तस बघायला गेल तर हे आमच पहिलेच व्हर्जिनल लिखाण आहे सुज्ञ मिपाकरांनी ओळखलच ;) असेल समजुन घ्या मायबाप वाचकहो) नमस्कार मंडळी काल फर्स्ट डे फर्स्ट शो नटरंग हा सिनेमा पाहिला खरच केवळ अप्रतिम सिनेमा आहे नटरंग
कागल गावचा गुणा ऐका त्याची कहाणी ! हा हाSSSSS रांगडा ज्याचा बाज आगळहुत पाणी ! हा हाSSSSS पैलवानी तोरा त्याचा रुबाब राज्यावाणी ! हा हाSSSSS कौतिक सांगु किती पठ्या बहुगुणी !

व्यथा

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 02/01/2010 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुसाच्या थंडीनं कहर मांडला तवा मास्तर मालकाची माडी चढला . तवा मालकाच्या सोबत बसल्याली फारेनर पाहुणी विलायती गरमी गिलासात वतत हुती. या मास्तर , हे मास्तर आमच्या साळंचे. यांचा लई जीव पोरांवर आणि आमचा जीव त्यांच्या आयांवर मालक बोलले फारेनराला.आणि खिंकाळले जोरात. पुसाच्या थंडीत आंग आखडून मास्तर बसला . तवा मालक म्हणलं घ्या मास्तर गिलासात गरमी भरून. सलगीचं घोडं दामटत मास्तर म्हणलं चार हिरव्या नोटा भेटल्या तर..... दोनाचे चार करीन म्हणतो धावीचे वर्ग. आनी, थोडा सोडा घाला की मालक. लई सवकलास की मास्तरा. थोडी गिलासातली बरुबरी दिली तर सोडा मागतोस व्हय.? मालक गिरमटून बोललं तवा,दोन पाहुणं चार हिरव्या नोटा चु
काव्यरस

काही कविता.

लेखक रामदास यांनी शनिवार, 02/01/2010 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
असा नको अवेळी वारा पदराचा. झाकले इंगळ राखेखाली . मन माझे. +++++ माझी फितूर पानं गुलाम तुमची झाली . हुकुम आमचा झाला बाजी तुमची झाली. अवघड खेळ आहे बुवा. ++++++= आळंबीचं पांढरं रान माजलं आहे तिथे माझं प्रेम तुझी वाट बघत उभं होतं . आता, शोधाशोध निरर्थक आहे. उपेक्षेच्या उंबर्‍यावर मनाचा चुडा फोडून मी जगण्याचे गाव सोडले आहे. +++ ते म्हणाले, हा वेडा आणि ती वेडी पण.. मी खोल खोल डोहात तू काठावर कोरडी. ++++ नव्या वर्षाची सुरुवात करू या.

पूर्वीगत पण आता काही करवत नाही

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 02/01/2010 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकर यांची कविता पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही पूर्वीगत पण आता काही करवत नाही पूर्वीगत अन आता काही झेपत नाही भेटलो तर हल्ली आम्ही चोरून भेटतो गळ्यात आम्ही गळे घालुनी हिंडत नाही बंद घेतली करून आधी खिडक्या दारे जरासुद्धा मज जोखिम हल्ली घेवत नाही खरेच मग आम्ही इतके निर्धास्त जाहलो खरेच हा आवाज कुणाला पोचत नाही खूप शोधतो बाप तिचा मज गावामधुनी चुकून सुद्धा घरी स्वतःच्या शोधत नाही हाच फायदा इतक्या साऱ्या तडजोडींचा तिच्या कधी बापास सुगावा लागत नाही जरी नसे ही सेफ योजना तिचीच होती उगाच मी ती गप्पगुमाने ऐकत नाही पुढे

थोडसं मनातलं..........

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 02/01/2010 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी कोणाला एखाद्या गोष्टीत तल्लीन झालेलं बघितलं आहे का? म्हणजे एखादा गायक गाणं गाता गाता एखाद् वेळेस एकरूप होतो त्या गाण्याशीच. किंवा रंगमंचावर काम करता करता एखादा अभिनेता त्या भूमिकेशी एकरूप होउन जातो. मग कशाचंच भान उरत नाही त्याला. सगळ्या जगाचा विसर पडावा आणि आपण स्वतःच आपल्या कलाकृती सह विश्व व्यापून रहावं अशी ही अवस्था. खरं तर स्वतःचं अस्तित्व अशी काही गोष्टंच उरत नाही अशा वेळेस. मी, माझं गाणं, माझा आवाज, माझा अभिनय, माझी कलाकृती असं काही मनात येतच नसावं अश्या वेळेस, ईतकी भारून टाकणारी ती अवस्था असते. आणि याचा अनुभव ती अवस्था बघणार्‍यालाही येते.