"Who killed Karkare?" by former IG, Maharashtra, S M Mushrif
मिपा सभासदांनो,
मी जेंव्हा "To the last bullet" या पुस्लिहिलेदोन लेख लिहिले तेंव्हा एका सभासदाने "Who killed Karakare या पुस्तकावरही लिहिणार का?" असा प्रश्न मला केला होता.
मी कालच तेही पुस्तक मागवले, पण अनुक्रमणिका वाचल्यावर (खाली पहा) माझे असे मत झाले कीं हे पुस्तक हेमंत करकरे यांच्या हौतात्म्याबद्दल फारसे सांगत नाहीय् व इतर गोष्टींची चर्चाच जास्त आहे.
या गोष्टीही वाचायला हव्यातच व म्हणून हे पुस्तक वाचणारही आहे, पण वाचण्याची priority कमी झाली.
इतर कुणी हे पुस्तक वाचले आहे कां?
तळेगावचे सतीश शेट्टी
तळेगाव दाभाडे येथील सतीश शेट्टी हे नाव मला आज टाईम्स आणि नंतर सकाळ बघे पर्यंत माहीत नव्हते. मात्र त्यांच्या हत्येची बातमी वाचून त्यांच्याबद्दल वाईट वाटले, झालेल्या प्रसंगाबद्दल एकीकडे चीड आली आणि दुसरीकडे आपण पूर्ण रानटी होत आहोत का असे वाटून अस्वस्थता आली.
सतीश शेट्टी, वय वर्षे ३९ ह्यांना एपिलप्सीसारखा आजार असूनही भ्रष्टाचाराविरुद्ध काम करत होते.
सूर्यग्रहणाचे दुष्परिणाम नको असतील तर हे वाचाच
सहस्त्रकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण येत्या शुक्रवारी म्हणजे दि. १५.१.२०१० रोजी येत आहे. सदियों के बाद म्हणजे पंधरा हजार चारशे अट्ठावन्न वर्षांनी हा दुर्मिळ अन खतरनाक योग येत आहे! प्रगाढपंडितांच्या मतानुसार, या वर्षीच्या सूर्यग्रहणावर अमावस्येची काळीकभिन्न छाया असणार आहे ;) संपूर्ण जगभरात याचे भयानक परिणाम ( पूर्वलक्ष्यी प्रभावाने) दिसून येणार आहेत.पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर अनुक्रमे पूर व अवर्षण, झालंच तर स्वाइन फ्लू, महागाई, भ्रष्टाचार, चलनवाढीचा वाढता दर, साखरेचे चढते भाव इ.इ.
शुभ्र काही जीवघेणे
अंबरीष मिश्र ह्यांचं “शुभ्र काही जीवघेणे” हे पुस्तक नुकतंच वाचलं. पुस्तकाचं नाव वाचूनच आत काहीतरी झालं. पुस्तक नक्कीच काहीतरी खास असणार असं वाटलं. अंबरीष मिश्र ह्या लेखकानं मराठीत इतक्या सुंदर नावाचं पुस्तक लिहावं…म्हणजे थोडं आश्चर्यच वाटलं. थोड्याशा कुतूहलानेच पुस्तक वाचायला घेतलं आणि लेखकाची पुरती फॅन झाले.
काही मनस्वी कलाकारांबद्दल ह्या लेखकाने असं काही लिहिलंय ना……. की त्या कलावंताच्या प्रेमात पडावं की लेखकाच्या…… ह्याच संभ्रमात पडायला होतं. लिखाण असं काही काळजात घुसतं ना…..!!
मैत्र जिवांचे
मला शिकायला आवडते अभ्यासातही खूप रस आहे, पण आज वर्गात लक्ष लागत नव्हते. मी अस्वस्थही नव्हते. कोणते ही टेंशन नव्हते. कुणी काही मनाला लागेल असे बोलले नव्हते कि एखाद्या अपयशामुळे खचून गेले नव्हते. सगळे जग निर्जिव वाटत होते. चालती बोलती मानसे यंत्रवत भासत होती. ईतक्यात एक खट्याळ वर्गमैत्रिण थट्टेने म्हणाली, "चुपचुप बैठे हो जरुर कोई बात है?? आज लक्ष कुठे आहे तुझे? प्रेमाबिमात पडलीस काये?. थोडावेळ स्वतःवरच शंका आली. असं तर नसेल?... पण कोणताही चेहरा किंवा व्यक्ती डोळ्या समोर येत नव्हती. का्हीतरी झालं होतं पण नक्की काय झालं होतं मला?.
आक्रोश...!
*************************************
कोपर्यात रस्त्यांच्या कलेवर अहिंसेचे...
संपले दिवस बापु.., तुमच्या रामराज्याचे
आता उरली भयाण केवळ..,शांतता शेवटाची
किं गर्भ कोवळे हे उद्याच्या अनावर हिंसेचे?
रक्ताने भरली झाडे.., फळे शस्त्रांची...
किं पुरावे ते अमुच्या...? कोडग्या मुर्दाडपणाचे ...
द्वेषाने बरबटली मने .., वाहले पाट रुधिराचे
हे फक्त कोसळणे मानवतेचे ...
किं संपणे संवेदनांचे ?
******************************************
विशाल.
सोनपावले ही तुझी...
सोनपावले ही तुझी...
काळे ढग नैराश्याचे
होते जीवनात माझ्या.
हर्ष घेउनिया आली
सोनपावले ही तुझी.
होतो एकटा प्रवासी
वाटेवरी या जगाच्या.
आली वसंत घेउनी
सोनपावले ही तुझी.
अंधारात या निशेच्या
डोळे शोधती प्रकाश.
झाली मंगल प्रभात
सोनपावले ही तुझी.
होतो प्रेमाच्या शोधात
मरुभुमीत वैराण.
झाले मृण्मयी किनारे
सोनपावले ही तुझी.
मिसळपाव