Skip to main content

प्रसारमाध्यम स्वरुप, कारणे आणि उपाय

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 29/01/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर सध्या राजु परुळेकर: राजकीय पत्रकार? या भडकमकर मास्तरांनी मांडलेल्या काथ्याकूट मधे अनेकांनी चर्चा केल्यात. ३ जानेवारी २०१० ला अंनिस द्विदशकपुर्ती समारंभात पुण्यातील एसेम जोशी सभागृहात प्रसार माध्यम हा विषय परिसंवादासाठी घेतला होता. संजय आवटे हे तरुण पत्रकार सध्या पुढारीचे निवासी संपादक व सकाळ टाईम्स चे श्री आनंद आगाशे हे पत्रकार यानिमित्ताने बोलत होते. प्रसारमाध्यमातील वृत्तपत्रे व दृकश्राव्य माध्यमे यांचे वेगाने बदलत जाणारे स्वरुप हा समाज बदलाशी निगडीत आहे. पत्रकार हे त्यांचे प्रतिनिधि.

नाहीश्या होत चाललेल्या पाककृती

लेखक दिपाली पाटिल यांनी शुक्रवार, 29/01/2010 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज एक लेख वाचता वाचता "धनगरी मटणा"चा उल्लेख पाहीला. मी आंतरजालावर शोधूनही पाहीलं पण त्याबद्दल माहीती काही मिळाली नाही. (कुणाला ठाऊक असेल तर नक्की द्या...).

अनूभव उपयोगी पडला

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 29/01/2010 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
एका शेतकर्‍याच्या पोल्ट्री फार्म मध्ये एक कोंबडा रहात होता. पोल्ट्री फार्म मध्ये काही शे कोंबड्या होत्या. हा कोंबडा बरेच महीने तेथे रहात होता. तो म्हातारा झाला होता. शेतकर्‍याने विचार केला की कोंबडा आता म्हातारा झालाय. एखादा नवा तरूण कोंबडा आणायला हवा. जुन्याला रीटायर करायला हवे त्याने ऐटदार तुरा असलेला एक नवा कोंबडा आणला. नवा कोंबडा खरोखरच ऐटदार होता. इतक्या काही शे कोंबड्यांकध्ये तो फारच खुलून दिसत होता. नवा कोंबडा जुन्या कोंबड्याला म्हणाला. गड्या तू आता म्हातारा झालायस. त्यामुळे शतकर्‍याने मला इथे आणलय. तुझी आता छुट्टी.... जुना कोंबडा म्हणाला. खरे आहे रे तुझे.

द्रौपदी

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 29/01/2010 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
ती कोण, कुठली, कुणाची काहीच ठाउक नाही. तिचं मी माझ्यापुरतं ठेवलेलं नाव द्रौपदी. तेही तिच्या अवतारावरून. तिच्या अंगावर एक नेसूची साडी असते आणि तीन ते चार साड्या पोटावर बांधलेल्या. त्याशिवाय सोबत असलेल्या कापडी पिशवीत दोन-तीन साड्या असतात. साध्याच जुनेर झालेल्या, विटलेल्या, रंग उडालेल्या त्या साड्या ही तिची दौलत! तिची माझी पहिली भेट (?) अगदी लक्षात रहावी अशी. रविवारची निवांत दुपार. माझ्या घरातल्या दोन जागा माझ्या सगळ्यात जास्त आवडीच्या. एक तर हॉलमधलं माझं कंप्यूटर टेबल आणि दुसरी म्हणजे दोन चौक पार करणारा वाहता रस्ता जिथून दिसतो, अशा माझ्या किचनच्या खिडक्या.

असाही एक अनुभव

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 28/01/2010 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः बंगलोर च्या जवळचे एक छोटेसे गाव काळः हल्लीचाच वेळ : सायंकाळी पाच्/सहा घसा फारच खवखव करायला लागला लवंग घ्यावी म्हणून एका दुकानात गेलो. भोवताली ज्या वस्तु दिसल्या त्यात लवंग वगैरे काहीच नव्हते. लवंगेला कानडी/ तमिळ भाषेत काय म्हणतात या बद्दल एकूणच अज्ञान. आता दुकानदाराला लवंग द्या या साठी काय म्हणायचे याचा विचार सुरु झाला मी इंग्रजीत क्लोव्ह दे असे म्से म्हणालो. क्लोव्ह चा उच्चार दुकानदाराने काहीतरी भलताच घेतला असावा. त्याने दुकानातल्या कामगाराला काहीतरी आणायला पिटाळले.

रंगकर्मी - पुन्हा एकदा

लेखक रंगकर्मी यांनी गुरुवार, 28/01/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्वांना कळवण्यास अत्यंत आनंद होतो की आजपासुन मराठीतले नाटकावरचे पहिले संस्थळ रंगकर्मी .कॉम पुन्हा सुरु झाले आहे. जवळ जवळ ४ महिन्यापुर्वी गिरिष ओकांच्या हस्ते उद्घाटन होऊन हे संस्थळ सुरु झाले होते,मात्र मध्यंतरी काही तांत्रिक अडचणींमुळे हे स्थळ बंद पडले होते. मात्र आता अथक प्रयत्नानंतर हे संस्थळ पुन्हा सुरु झाले असुन वाचकानी मागितलेल्या सर्व सोयी देण्यात आलेल्या आहेत. आजपासुन http://www.rangakarmi.com या पत्त्यावर तुम्ही हे स्थळ पाहु शकता.

कन्नथिल मुथ्थुमित्ताल ( २००२) ... राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 28/01/2010 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
कथा पटकथा आणि दिग्दर्शन मणिरत्नम.... हम्म्म.... दहशतवादाच्या आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवरच्या प्रेमकथा मणिरत्नमने यापूर्वी रोजा ( १९९३) , बॊम्बे ( १९९५) आणि दिल से ( १९९८) बनवल्या होत्या. त्यातला रोजा आवडला होता ( अगदी डायरीत मणिरत्नमची नोंद करून ठेवली होती.. मॆन टू बी वॊच्ड :) म्हणून ) आणि दिलसे ठीकठाक वाटला होता...

प्रित माझी कळेना..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 28/01/2010 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रियकराला,प्रित माझी कळेना.. अधरी अडकति शब्द ..भाषा डोळ्यांची उमजेना मास श्रावणाचा .,शशी तेवतो नभि ते चांदणे हि शितल..पण तनुदाह सोसवेना सुकुन गेले अधर..,कोमेजली काया. कसा कठोर हा..मम दुःख्ख त्यास कळेना,, आठवता छबी..विज तनुत कल्लोळे रात्रभर ना डोळ्यास डोळा..ना पापणी मिटेना वाटते असे..हे गुपित त्यास वदावे हि लाज गडे मुलखाचि..पाठ माझी सोडेचना Avinash

माघ पोर्णिमा विशेषांक

लेखक संजा यांनी बुधवार, 27/01/2010 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या ३० जानेवारीला 'माघ पोर्णिमा' आहे त्या निमित्ताने मिसळपावचा "माघ पोर्णिमा विशेषांक " काढावा असे मी सगळ्यांना मंडळीना सुचवू इच्छितो. ह्या अंकात फक्त चेष्टा,कुचेष्टा, टींगल, टवाळी अशा उत्साहवर्धक साहित्याचा समावेश असावा असे माझे वैयक्तिक मत आहे. तेव्हा आपापली मतं मांडा पाहू.