Skip to main content

सर्वच राजकीय पक्षांचा निषेध

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 05/02/2010 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
ताजी बातमी : रॉकेल ६ रु., गॅस १०० रु. वाढीची शिफारस. गेल्या कित्येक दिवसांपासून डाळ, तांदूळ, गहू, भाज्या, दूध, साखर ह्या सर्व महाग होत असलेल्या वस्तूंमध्ये आता रॉकेल, गॅसची ही भरती. अर्थात त्यांना भाववाढ करायची असेल ५० रू ची. पण १०० सांगितले तर ५० वर लोक तयार होतील असाच त्यांचा विचार असेल म्हणून १०० रू.ची शिफारस. आणि पुढे डिझेल/पेट्रोल रांगेत आहेतच.

कोलंबीचे लोणचे

लेखक स्वाती२ यांनी शुक्रवार, 05/02/2010 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
कोलंबीचे लोणचे साहित्य १/४ किलो कोलंबी १ टी स्पून तिखट १/४ टी स्पून हळद १/४ टी स्पून मेथी पावडर १ टी स्पून मोहरीचे कुट १/४ टी स्पून हिंग २ टी स्पून आलं, किसून १/२ टी स्पून मोहरी २ टी स्पून विनेगर १ टे. स्पून तेल मीठ चवी प्रमाणे कृती कोलंबी साफ करुन त्याला हळद आणि तिखट लावून अर्धा तास मुरवत ठेवा. कोलंबी मुरली की एका भांड्यात तेल गरम करत ठेवा. तेल चांगले तापले की त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की त्यात आल्याचा किस घालुन १ मिनिट परता.

माझेच होते.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 04/02/2010 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझेच होते..... हाय ! तुजला जिंकले त्याने जरी , ओठी तुझ्या पण नाव ते .....माझेच होते ! माळू दे त्याला तुझ्या केसांत गजरा , गंधदायी मोगरे.....माझेच होते ! स्पर्शता त्याने तुला जे लाभले , सगळे जुने शहारे.....माझेच होते ! एकही खुलली जरी ना स्मीतरेषा , दाबलेले हुंदके.....ताजेच होते ! अंतरी तुझिया जरी झंकारलो झाकलेले प्रेतही.....माझेच होते !

गरुडाची मुले

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 04/02/2010 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या व्याख्यानात काय सांगायचे हा मी विचारच केला नव्हता. एका वर्तमानपत्राचा वर्धापनदिन. त्यानी काही पालकांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. निमन्त्रण खरेतर पंधरा दिवसाअगोदरच मिळाले होते. व्याख्यानाला नेहमी तयारीनिशी जातोच असे नाही. बरेचदा काही ठराविक विषयावर बोलायचे असे ठरवून जाऊनही उपस्थित गर्दीचे अ‍ॅव्हरेज वय पाहून विषय बदलावा लागतो असा अनुभव गाठीशी बरेचदा होता. वर्तमानपत्राचा वर्धापनदिन ..न नक्की कोणकोण बोलावले आहेत याचा अंदाज लावणे कठीण असते.

अंगाई

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 03/02/2010 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
broken image नीज आली, पेंगलेले नेत्र झाकी श्रीहरी सानुलीशी झाकलेली मूठ चाखी श्रीहरी या मुठीतुन काय झरते अमृताची धार रे? गीत सृजनाचे तुझे हे कोवळे हुंकार रे रुणुझुणू या घाग-यांचा नाद रोखी श्रीहरी गोड अंगाई तुला ही रातराणी
काव्यरस

ज्ञानेश्वरीतली आकाशयात्रा?

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 03/02/2010 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
शुचि चा http://www.misalpav.com/node/10919 हा लेख वाचून पसायदान च्या दोन ओळी आठवल्या. संपूर्ण पसायदान एक सुंदर रचना आहे. पण मला ह्या दोन ओळी खूप भावल्या आहेत. "चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन | ते सर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु ||" ह्या ओळींचा अर्थ खालील प्रमाणे सरळ सरळ लावण्याची खुप ईच्छा होते.------ चंद्रमे जे अलांछन- अनेक चंद्र जेथे आहेत अशा ग्रहाचा उल्लेख? हे चंद्र डाग रहीत आहेत. म्हणजे उल्का पडून पडून खडबडीत झालेले नाहीत. म्हणजेच वातावरणाचे कवच असलेले. मार्तंड जे तापहीन- असे अनेक सुर्य, जे तापहीन आहेत.

लताबाई, माज, बाणा, पंगा वगैरे

लेखक सन्जोप राव यांनी बुधवार, 03/02/2010 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
"लताबाईंबद्दल भलतंसलतं बोलशील तर सूर्यावर थुंकशील. लोक जोड्यानं हाणतील तुला धरुन." सिगारेट ओढणारा माझा मित्र म्हणाला. "भलतंसलतं म्हणजे?" "म्हणजे हेच तू आत्ता जे म्हणत होतास ते. त्या तिरुपतीला गेल्या होत्या तेंव्हा त्यांची राजेशाही बडदास्त ठेवली नाही म्हणून त्या आंध्र प्रदेश सरकारवर नाराज झाल्या वगैरे.." "अरे,मग ते खरं नाही का? पेपरमध्ये छापून आलंय तसं..." "कुठल्या पेपरमध्ये? सकाळमध्ये? सकाळवर किमान तू तरी विश्वास ठेऊ नयेस" तो धूर सोडत म्हणाला. "फक्त सकाळमध्ये नाही. बर्‍याच पेपरांत आलंय. बरं ते जाऊ दे. त्या अमिन सायानींना दिलेल्या मुलाखतीचं काय? "काय त्याचं?" "काय म्हणजे ...

गोभी मंचुरीयन - गोभी ६५

लेखक गणपा यांनी बुधवार, 03/02/2010 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
काल अंगारिका संकष्टी चतुर्थी होती. ऑफिस मध्ये गेले २-४ दिवस बरच काम होत. त्यामुळे लंच टाइम मध्ये घरी येउन साबुडाण्याची खिचडी वगैरे करायला फुरसत नव्हती. त्यामुळे काल निर्जळी उपवासाच पुण्य आयतच पदरात पडल. संध्याकाळी घरात पाऊल ठेवल्यावर पोटातल्या कावळ्यांनी आवाज दिला. देवाला नैवेद्य तर ठेवायचा पण नेहमी सारख साग्रसंगीत ताट करण्याच त्राण नव्हत. त्यामुळे पटकन होणार चायनीज करायच ठरवल. म्हटल तेवढच देवालापण जरा चेंज ;) फ्रिज मधल्या कच्च्या मालाचा अंदाज घेतला. जास्त भाज्या नव्हत्या पण फ्लॉवर, भोपळी मिरची, पाती कांदा दिसला.

समुद्रकिनार्‍यावर

लेखक अश्विनीका यांनी बुधवार, 03/02/2010 03:41 या दिवशी प्रकाशित केले.
जलपैंजण - एक छोटी मुलगी समुद्राच्या पाण्यात खेळत असताना पाण्याची लाट तिच्या पायावरून मागे जात असताना हा फोटो काढला. शंख