गोभी मंचुरीयन - गोभी ६५
काल अंगारिका संकष्टी चतुर्थी होती.
ऑफिस मध्ये गेले २-४ दिवस बरच काम होत. त्यामुळे लंच टाइम मध्ये घरी येउन साबुडाण्याची खिचडी वगैरे करायला फुरसत नव्हती.
त्यामुळे काल निर्जळी उपवासाच पुण्य आयतच पदरात पडल.
संध्याकाळी घरात पाऊल ठेवल्यावर पोटातल्या कावळ्यांनी आवाज दिला. देवाला नैवेद्य तर ठेवायचा पण नेहमी सारख साग्रसंगीत ताट करण्याच त्राण नव्हत. त्यामुळे पटकन होणार चायनीज करायच ठरवल. म्हटल तेवढच देवालापण जरा चेंज ;)
फ्रिज मधल्या कच्च्या मालाचा अंदाज घेतला. जास्त भाज्या नव्हत्या पण फ्लॉवर, भोपळी मिरची, पाती कांदा दिसला. त्यावरच वेळ मारुन नेण्याच ठरवल.
गोभी मंचुरीयन
साहित्यः
१ कांदा लांब कापलेला.
१ भोपळी मिरची लांब उभी कापलेली.
२ हिरव्या मिरच्या बारीक कापुन.
३-४ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
पातीकांदा चिरुन (असल्यास).
फ्लॉवर लहान तुकडे करुन.
२ चमचे मैदा
२ चमचे कॉन फ्लॉवर
सोया सॉस, चीली सॉस, टोमॅटो सॉस.
चवी नुसार मीठ.
तळण्यासाठी तेल.
कृती:
एका भांड्यात पाणी तापवुन घ्यावे. उकळी आल्यावर गॅस बंद करुन मग त्यात कापलेला फ्लॉवर ५ मिनिटं टाकुन ठेवावा.
नंतर बाहेर काढुन वेगळा ठेवावा.
एका भांड्यात थोड तेल तापवुन त्यात लसुण हिरवी मिरची परतुन घ्यावी.
मग त्यात थोडा सोया सॉस, टोमॅटो सॉस, चीली सॉस टाकुन मोठ्या आचेवर परतुन घ्याव.
नंतर त्यात कांदा, पाती कांदा, भोपळी मिरची टाकुन परतुन घ्याव. चवीनुसार मीठ टाकाव. आच मध्यम करावी.
ज्या प्रमाणात ग्रेव्ही हवी त्या प्रमाणात पाणी टाकावे.
एक उकळी आली की मग त्यात १-२ चमचे कॉन फ्लॉवर पाण्यात मिसळुन टाकावे.
१ मिनिटा नंतर आच बंद करावी.
एका भांड्यात २ चमचे मैदा, १ चमचा कॉन फ्लॉवर मीठ एकत्र करुन घ्यावे.
गरम पाण्यातुन बाहेर काढुन ठेवलेले फ्लॉवरचे तुकडे या मिश्रणात घोळवुन घ्यावे.
शक्यतो पाणी टाकु नये. अगदिच कोरड वाटल तर पाण्याचा एक हबका मारावा.
हे पिठात घोळवेलेले तुकडे गरम तेलात सोनेरी रंग येइस्तो खरपुस तळुन घ्यावे.
वाढायच्या काही क्षणांपुर्वी वर तयार केलेल्या ग्रेव्हीत हे तळलेले फ्लॉवर चे तुकडे आयत्यावेळी घालावे आणि गरमा गरम सर्व्ह कराव.
***********************************************************************************
गोभी-६५
साहित्यः
१ लहान कांदा बारीक चौकोनी कापुन.
फ्लॉवरचे लहान तुकडे.
कढीपत्ता.
चवी नुसार मीठ.
२ चमचे मैदा.
१ चमचा कॉन फ्लॉवर
१ चमचा लाल तिखट.
तंदुर रंग (ऑपशनल)
कृती:
एका भांड्यात पाणी तापवुन घ्यावे. उकळी आल्यावर गॅस बंद करुन मग त्यात कापलेला फ्लॉवर ५ मिनिटं टाकुन ठेवावा.
नंतर बाहेर काढुन वेगळा ठेवावा. (वरचीच स्टेप)
एका भांड्यात मैदा,कॉन फ्लॉवर, मीठ,लाल तिखट, रंग एकत्र करुन थोड थोड पाणी टाकत भजी सारखे पीठ तयार करावे.
फ्लॉवरचे तुकडे त्या मिश्रणात घोळवुन गरम तेलात तळुन घावे.
फ्राईंग पॅन मध्ये थोड्या तेलावर कांदा परतुन घ्यावा. कढीपत्ता टाकावा.
१/२ चमचा लाल तिखट टाकुन परतुन घ्याव.
त्यात वर तळलेले फ्लॉवरचे तुकडे टाकुन मोठ्या आचेवर १/२ मिनिट परतुन घ्याव.
गरमा गरम वाढावे.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
वाचने
13040
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
काटा आला जिभेवर !!
ए ह्याचं
व्वा!!
मस्त्च...बघुन बहुधा जीभ जड झाली.
प्रलय
मस्त. फोटो
फर्स्ट
मस्त! >>नेहम
अंगारकी
अवघड आहे
ए बाबाऽऽ
मस्त
veg चायनिझ
मस्त