बाबरीचे श्राद्ध
आता राम लल्लालाच करायला हवे
बाबरीपरी मशिदींच रक्षण
अन रसूल अल्लालाच धावायला हवंय
मंदिर जन्मभूमी वाचवायला .....
स्वत:च्याच अस्तित्वासाठी ...
तथाकथित धार्मिकांचे चोचले जोपासण्यासाठी
स्वत:चे सत्व जपण्यासाठी अन टिकविण्याकरितासुद्धा.....
खूनखराबा, जाळपोळ, विध्वंस करणा-यांना
जातपात नसते, धर्म तर नसतोच नसतो...
असते ती फक्त एक जीवघेणी नशा...
धगधगत्या ज्वाळांची...लाल भडक रक्ताची ...आर्त किंकाळ्याची
वेदनेने तडफडणा-या अश्राप हुंदक्यांची...
तर बा रामलल्ला परमेश्वरा अन रसूललल्ला परवरदिगारा
कान, डोळे, तोंड बंद करून
महात्म्यासारखा स्थितप्रज्ञ बसला असशील तर जरा माणसात ये.
थांबव या हिंस्र पशूंना...
काव्यरस
मिसळपाव
