Skip to main content

पुण्यात बाँबस्फोट

लेखक बाबुराव यांनी शनिवार, 13/02/2010 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात कोरेगाव पार्क मधे असलेल्या जर्मन बेकरी मधे स्फोट होवून दहा लोक मरण पावल्याची आन अनेक जखमी झाल्याची बातमी हाय. काय खबर ?

अभुतपूर्व संकट!

लेखक फास्टरफेणे यांनी शनिवार, 13/02/2010 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
भारत नावाचं एक राज्य होतं...तिथं इटलीराणी राज्य करीत होती...तिच्या राज्यात एक महाराष्ट्र नावाचा प्रांत होता. त्या प्रांतातले सगळे सरदार इमानदार होते. एकही जण राणीच्या शब्दाबाहेर नव्हता. राजधानीतून बोलावणं आलं कि सगळे सरदार चळ्चळ कापायचे. राणीचा दराराच असा होता! ते सरदार इतके इमानदार होते कि राजपुत्राचे जोडेसुद्धा ते डोक्यावर घ्यायचे! भारत राज्यात सगळं कसं आलबेल चाललं होतं. महाराष्ट्र प्रांतात एक खान रहायचा. या खानाचं काम म्हणजे भारत राज्याच्या नागरिकांना "जीवनावश्यक" चित्रपटरस पुरवायचा. एकही आठवडा असा गेला नाही कि भारताच्या नागरिकांनी चित्रपटरस पिला नाही.

शिव-वडा

लेखक पॅपिलॉन यांनी शनिवार, 13/02/2010 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
राहुल आला अन् टोपी घालून गेला! खान आला अन् टपली मारून गेला!! ढाण्या वाघाचा पार शिव-वडा झाला!!!
काव्यरस

रेशीमगाठी..

लेखक राधा१ यांनी शनिवार, 13/02/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रसन्न सकाळ... सगळे रोजच्या सारखेच सुरु होते. धडधड...रोजचेच स्टेशन..रोजचीच गाडी...वेळ एकदम सकाळची म्हणुन फारशी गर्दी नाहीच.. लेडीजचा पहिला दर्जाचा डबा..एक रोजचा ग्रुप दारात गप्पा मारत उभा आहे... बाजुच्या जेन्ट्सच्या डब्याच्या दारात दोन मुलं निसर्ग सौंदर्य (???) बघत इकडे तिकडे बघत उभे आहेत. एका मुलाच लक्ष सहज(?) मुलींच्या डब्याकडे जातं..आणि एका मुली बरोबर नजरानजर होते. आणि मग येथे सुरू होतो...

माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..३ (आठवणींतले वसंतराव)

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 13/02/2010 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..१ माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..२ आठवणीतले वसंतराव! १) कुमारांसोबत..दोघंही अगदी तरूण दिसताहेत.. २) गोरेगावमधली कुठलीशी मैफल..

काही जुनी टिपणे.

लेखक रामदास यांनी शनिवार, 13/02/2010 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
आता, आपण मोठं होऊ या. तू जा घरी. मला वाळवणं घालायची आहेत. मग, माझा उभा जन्म उन्हातच. --------------------------- माझं इवलंस मन घे तुझ्याकडे ठेवून. बाकी सगळं लागेल मला उरलेल्या आयुष्यासाठी. ----------------------- तू जा रे माघारी नको भेटूस रे वेळी अवेळी. बोभाटा होतो पाय घसरल्याचा. मग ? मग ? स्सालं ... आख्खं आयुष्य स्किड झालं जळल्या रबराचा वास न येता. ---------------------- हॅपी व्हॅलेंटाईन डे.

मॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 13/02/2010 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास. त्यांचे अनुभव दुसऱ्या दिवशी ऐकून हे जाणवले की, हे शहरी लोक नुसता हौशी उत्साह न दाखवता शर्यत पुर्ण करु शकले हा काही योगायोग नव्हे. शहरातील आजचे जगणे पाहता - त्यात रोज बाहेरील खाणे आले, कामाचा व इतर सगळा ताण आला, रोजचा प्रवास, ह्याची गोळाबेरीज केली तर शहरी लोकांची शारीरीक क्षमता कशी टिकून राहील असा प्रश्न पडेल.

हसली रे हसली...

लेखक Navigator यांनी शुक्रवार, 12/02/2010 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
हसली रे हसली... हसली रे हसली... माझ्या जाळ्यात ती फ़सली, बागेत होतो खात भेळ पा्हता पाहता मुलांचा खेळ रंगल्या होत्या आमच्या गप्पा तेवढ्यात तिकडुन आले तिचे पप्पा वडिलांना बघताच बावरली बिचारी आम्ही दोघेही पडलो विचारी सुट्ला तिचा माझा संग झाला आमचा प्रेमभंग तेवढ्यात दुसरीही अशीच हसली मला वाटले ती पण फ़सली म्हणुन पुढे गेलो तर................. ........................ काणाखाली बसली... -संदीप...
काव्यरस

(नो एक्स्पेक्टेशन्स)

लेखक कवटी यांनी शुक्रवार, 12/02/2010 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
ते - मी हाकलून देइपर्यंत काल गेला नाहीस? तो - तसं काही नाही. ते - तसच तस्सच. तो - तुला अता भ्रमच पोसायचा असेल तर .... ते - अ‍ॅ हॅ रे भ्रम! मग मी "चालते व्हा" ची खरड पाठवल्या पाठवल्या कसा गमन झालास? तो - योगायोग : ) ते - व्वा आम्ही मारे भ्रमात होतो आम्च्या खरडीचा एवढी वट आहे. तो - आपल्या भ्रमाचा भोपळा फोडल्याबद्दल क्षमस्व. : P ते - ज्जा ... आता परत करणरच नाही खरड. तो - बघ आपलं काय ठरलं होत - नो एक्स्पेक्टेशन्स. तुम्ही डेव्हिएट होताय. ते - अरे खरच. चुकलं चुकलं. : ( (इथे खर म्हणजे "हे आहे हे अस आहे . पटल तर...." असे लिहायला हात शिवशिवत होते. ;) ) तो - जा आता. चुकलं चुकलं म्हणे : ) ....

एक कप च्या - परीक्षण

लेखक फारएन्ड यांनी शुक्रवार, 12/02/2010 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
'कला' या संस्थेने ६ फेब्रुवारी ला बे एरियात याचा खेळ ठेवला होता. त्याच बरोबर 'एक साधा प्रश्न' ही एक आणि डॉ जगन्नाथ वाणी यांच्या सामाजिक कार्याबद्दल एक अशा दोन छोट्या फिल्म्स ही बघायला मिळाल्या. दोन्ही छान आहेत. 'एक कप च्या' मला अतिशय आवडला. ज्यांना थिएटर मधे मिळणार नाही त्यांनी डीव्हीडी आणून जरूर पाहा. एकदम हलका फुलका, साधी कथा, सहज सोपे विनोद असलेला चित्रपट आहे. चित्रपटाच्या सुरूवातीलाच वातावरण निर्मिती सुरेख केलेली आहे. किशोर कदम च्या कुटुंबातील वातावरण फारच मस्त घेतले आहे.