प्रेमदिन
प्रेमदिन आला म्हणून करतात प्रेम
प्रेमदिन सरला की पळतं प्रेम
प्रेमदिन सरला की ओसरतं प्रेम
प्रेमदिन सरला की विसरतं प्रेम
कशाला हवी ही प्रेमाची कसरत
प्रेमदिन संपला की बसायचं हात हलवत
प्रेम करा, प्रेम करा.... म्हणून होतं का प्रेम
प्रेमदिन आला म्हणून करता येतं का प्रेम
सगळा नुसता दिखावा.... सगळं प्रेम उथळ
एक दिवसाची टिमकी, बाकी थापा निव्वळ
जयश्री
मिसळपाव