Skip to main content

प्रेमदिन

प्रेमदिन

Published on 14/02/2010 - 16:36 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रेमदिन आला म्हणून करतात प्रेम प्रेमदिन सरला की पळतं प्रेम प्रेमदिन सरला की ओसरतं प्रेम प्रेमदिन सरला की विसरतं प्रेम कशाला हवी ही प्रेमाची कसरत प्रेमदिन संपला की बसायचं हात हलवत प्रेम करा, प्रेम करा.... म्हणून होतं का प्रेम प्रेमदिन आला म्हणून करता येतं का प्रेम सगळा नुसता दिखावा.... सगळं प्रेम उथळ एक दिवसाची टिमकी, बाकी थापा निव्वळ जयश्री
लेखनविषय:

याद्या 1881
प्रतिक्रिया 7

कशाला हवी ही प्रेमाची कसरत प्रेमदिन संपला की बसायचं हात हलवत सगळा नुसता दिखावा.... सगळं प्रेम उथळ एक दिवसाची टिमकी, बाकी थापा निव्वळ
मस्त कविता... :) तात्या.

छान कविता... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

पण ह्यातून बहुतेक होतकरु लोकांना एक चान्स मिळत असावा .. ज्याची ते वर्षभर वाट पहात असावेत ;) बर्‍याच जणांचं प्रेम खरं असुनही अव्यक्त राहुन जातं असं वाटतं ! बाकी कवितेशी सहमत ;)

In reply to by टारझन

पण ह्यातून बहुतेक होतकरु लोकांना एक चान्स मिळत असावा .. ज्याची ते वर्षभर वाट पहात असावेत Wink बर्‍याच जणांचं प्रेम खरं असुनही अव्यक्त राहुन जातं असं वाटतं ! टारूशेठशी सहमत. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥