सुरक्षा कोणाची, कशी, केव्हा, कोणाच्या पैशाने? सगळा घोळ. सध्या घडत असलेले सुरक्षेचे एक नाटक वाटते. बेजबाबदार मीडिया २४ तास बातमी ह्या नावाचा काय दुरुपयोग आणि घोळ घालते आहे ते बघताना सुरक्षा कशाला म्हणतात हे कळेनासे झाले आहे.
वरळी सी लिंक किती व कशी असुरक्षित आहे, त्या करता किती दिवसात कोणती साधने बसवण्याचा प्रयत्न कसा सुरू आहे ..... ही बातमी म्हणून जगाला सांगणे. . . . बिनडोक, बेजबाबदार.... सगळे चीड आणणारे. ऐन वेळेवर मोठी किंमत देऊन सबस्टॅंडर्ड काहीतरी बसवून घोळ घालणे व खिसे भरणे .... हे किती वेळा घडले, घडणार?
बुलेटप्रुफचा घोळ अजून निस्तरला नाही तोवर दुसरा घोळ सुरू झाला.