Skip to main content

ऐक माझ्या फुला..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 29/04/2010 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक माझ्या फ़ुला, तू जरा, तू जरा गंधल्या अंतरी, दे मला, आसरा कोवळे रूपडे , नाजुका कोमला गौर हा वर्ण गं, साजिरा गोजिरा आसमानीच गं तू परी लाजरी सावरी, बावरी .. तू कुणी अप्सरा गोड वाणी तुझी गं मरंदापरी तू असे मंजुळा की असे शर्करा! मी अबोली म्हणू, कि म्हणू सायली तू निशीगंध की तू असे मोगरा!! ही निळाई तुझ्या लोचनी दाटली धुंदला रंग हा, लाजवी सागरा पल्लवाचे तुझ्या मेघ, गाती जणू छेडती दादरा त्या खुल्या अंबरा साद तू घातली, चैत्र हुंकारला ऐक माझ्या फ़ुला, ऐक ना तू जरा - प्राजु गालगा, गालगा, गालगा, गालगा
काव्यरस

प्रिया माझी "शहाजहान" ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 29/04/2010 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
ताजमहाल च्या मालकीबद्दल सध्या बराच वादविवाद मिपा वर सुरु आहे पण ताजमहाल अमर प्रेमाचे प्रतिक आहे यात सर्वाचे एकमत आहे. त्यासंबंधी सुचलेला विनोद . प्रिया माझी "शहाजहान" ! ! ! होता बादशहा धनवान ऐसा, " ताज " त्याने निर्मिला. प्रेमवंचित आम्हां गरिबांना कायमचे करण्याचा स्वार्थ त्याने साधला. '' ताज " नाही ना " सदनिका " शक्यही नव्हते "झोपडे " झालो घर जावई गातो आता “ त्या तिथे पलीकडे स्मारक अभिनव, अमर प्रितीचे, माझिया प्रियेचे ( महालासम ) झोपडे “ निरंजन वहाळेकर
काव्यरस

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

लेखक विकास यांनी गुरुवार, 29/04/2010 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येस महाराष्ट्र स्थापनेच्या मुहुर्तापासून आज हयात असलेल्या/नसलेल्या कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन स्फुर्तिदायी मराठी व्यक्तींची नावे येथे प्रतिसादांमधे लिहीत हा धागा मोठा करूया. त्या व्यक्ती महाराष्ट्रस्थापनेच्या आधी जन्माला आल्या असल्या तरी हरकत नाही.

चक्रव्यूह

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 29/04/2010 04:37 या दिवशी प्रकाशित केले.
(हे मात्रावृत्तातलं काव्य आहे, पण वृत्ताचं नाव माहीत नाही. जाणकारांनी सांगावं) पूर्वेपासुनि परवामधुनी उजव्या बाजुस आणि उद्या पसरूनी जणु रक्त शरीरा भिंति सदोदित खड्या उभ्या सूर्य उगवतो अन् मावळतो काही सावल्या हालवतो स्थितप्रज्ञासम स्तब्धस्थित त्या स्थितिक्कणांना न्याहळतो चंद्रप्रकाशी न्हाउन जाउन भिंति दुग्धिमा पांघरती भव्य भयानक भीषण सुंदर आणि विषण्ण त्या दिसती जगड्व्याळ या जंजाळातुन उगीच उंदिर शोधे वाट अडवणुकीचे सुखही न त्यांना ना सुटकेचे दु:ख मनात कुरतडूनही जरा न तुटती अशाश्वताच्या शाश्वत गाठी निराश उंदिर चाले पुढल्या चक्रव्युहा अभिमन्यूपाठी

किस्सा मुंबई पोलिसांचा

लेखक नेत्रेश यांनी गुरुवार, 29/04/2010 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज मि. पा. वर पोलिसांचे दोन किस्से वाचुन १२-१३ वर्षांपुर्वीची घटना आठवली... मी मुंबईहुन कोकणात (S.T. ने) जायला नीघालो होतो. वेळ साधारण दुपारची होती. S.T. लागायला वेळ होता. मी मुंबई सेंट्रलच्या S.T. स्टँड बाहेर फुटपाथ वर रमत गमत चाललो होतो. फारसे सामान नव्हते. फक्त १ सॅक होती. सॅक जुनी होत आल्यामुळे नवी घ्यायच्या वीचारात होतो. तीथेच फुटपाथ वर बसलेल्या फेरीवाल्याकडे बर्यापैकी सॅक होत्या. बघताना १ सॅक पसंत पडली. घासाघीस चालु झाली. "बढीया है साब, ए १ माल, गैरंटी है साब...ले लो साब, २५० दे दो" ...

मदत पुन्हा एकदा

लेखक राजे साहेब यांनी गुरुवार, 29/04/2010 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो मला आपलया मद्तीची पुन्हा एकदा गरज आहे ,http://www.youtube.com/watch?v=QfYLu_MhLQQ हा विदिओ दाउन्लोड होत नाहीये सगले उपाय केले आता आपली गरज आहे तरी वेळ काहुन बघावे , आनी हो आपण सुद्धा जरुर हा विदिओ बघावा ध्न्यवाद लोभ असावा , राजे साहेब

फुन्सुक फडके

लेखक विकास यांनी बुधवार, 28/04/2010 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या म.टा. मधे "फडकेंचा फुन्सुक" हा एक छोटासा लेख आला आहे. लेख दिनेश कानजी पण (त्यांच्या शेवटच्या वाक्यावरून) अरूणाचल प्रदेशातीलच दिसत आहेत. त्यातील काही वाक्ये (लेख कृपया तेथेच वाचा)
फुन्सुक हे नाव असू शकतं हे ' थ्री इडियट्स'मुळे कळलं. पण पडद्यावर न दिसलेला एक मातृभक्त फुन्सुकही आहे. मुंबईतल्या मराठी घरात तो मोठा झाला. सध्या अरुणाचलात असूनही महाराष्ट्रातल्या आईचं ऋण तो अद्याप विसरलेला नाही. ... इथली काही मुलं तुम्ही मुंबईत घेऊन जा. त्यांना तिथे शिकवा, शहाणंसुरतं करा, असा सल्ला लाला यांनी दिला.

टी. पी.

लेखक वारा यांनी बुधवार, 28/04/2010 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमची भारतीय कंपनी एका जापानी इलेक्ट्रोनीक कंपनीची ओथोराइस्ड डीस्ट्रीब्युटर आहे. नॉर्मली टेक्नीकल सपोर्ट वाल्यांचे काम कस्ट्मर ओरीएंटेड असते. पाच सहा वर्षे काम केल्यावर तसा सगळा प्रोड्क्ट परीवार समजुन जातो. यानंतर सहसा कोणी अभ्यास करत बसत नाही. जुन्याच स्किमा कॉपी पेस्ट करुन कस्ट्मर कडे फॉरवर्ड केल्या जातात. आणि लोकांच्या संगणक टि.पी. स्किल्स हळुहळु कळायला लागतात. काही स्कील्स खाली देत आहे , मिपा करानी याला अजुन प्रगल्भ करावे अशी ईच्छा. (याचा उपयोग आम्हालाही भविष्यात होईल.) १) डेस्कटॉप वर उजवा क्लीक करुन रिफ्रेश करणे.

नथुराम गोडसे आणि खारे शेंगदाणे ~~ अंतिम इच्छेचे स्वरूप !!

लेखक इन्द्र्राज पवार यांनी बुधवार, 28/04/2010 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रथमच हे स्पष्ट करतो की, लेखाच्या शीर्षकावरून कुणी हा अर्थ काढू नये की याचे प्रयोजन "गांधीहत्या आणि गोडसे" असा काही आहे. बिलकुल नाही.) बडोदा येथे काही कामानिमित्त आलो असताना मिसळपाव वरील एक सदस्यासामावेत इ-मेलिंग चालू होते, त्यावेळी त्यानी "आता बडोद्यात आला आहात तर तेथील प्रसिद्ध खारे शेंगदाणे जरूर खाणे जे नारळाच्या पाण्यात भिजवून करतात..." अद्याप शहरात गेलेलो नाही त्यामुळे हे खारे शेंगदाणे अजून लांबच आहेत. तरीही मेल मधील या उल्लेखाने ३० जानेवारी १९४८ हा दिवस आठवला आणि आठवली दिल्ली रेल्वे स्टेशनच्या परिसरात श्री.