Skip to main content

आ.बा.चा ढाबा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 30/04/2010 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
आबा, बाबा, दाजिबा जमले की ढाब्याला जोर चढतो. तंदूर रोट्या कमी पडतात, गिलासावर गिलास वाढतात, कोंबडीच्या तंगड्या त्यांच्या पोटात उडतात! आमचा बाप, बायलीचा बाप, दाजीचा बाप अशी थोर बापमाणसं ढाब्यावर गेली की ती परत येईपर्यँत आमच्या घराला निस्ता घोर लागतो. बोलून चालून ही एकमेकांची ईवायी मंडळी! घोटानंतर घोट वाढला की आवाजसुद्धा चढू लागतो. जोतो दुसऱ्‍यावर ओरडू लागतो. एक तोळा कमीच दिला, पावण्यारावळ्यांची चांगली सोय झाली नाही, खायला बक्कळ होतं पण प्यायची ठेप जमली नाही असे आरोप प्रत्यारोप होऊन गिलासावर राग निघू लागला की ढाब्यावाल्याचं धाबं दणाणतं!

धनी माझं कसं येईना अजून

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 30/04/2010 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
धनी माझं कसं येईना अजून
दिस हा गेला रात चढली कितीक बसावं सजून धजून वाट पाहूनी डोळं थकलं धनी माझं कसं येईना अजून ||धृ||
रातीचा मी शिणगार केला शेज सजवूनी गजरा माळला शालू नेसूनी तयार झाले कुंकू ल्याले भांगातून ||१|| धनी माझं कसं येईना अजून
सांगून गेलं आठदिस झालं कुठं आसलं कुना ठावं लवकर येतो म्हनलं होतं लढाईतून परतून ||२|| धनी माझं कसं येईना अजून
काळीज माझं चिमनी जसं नाही काही थार्‍यावर फोलपणा हा सजण्याचा न जाई मनातून ||३|| धनी माझं कसं येईना अजून - पाषाणभेद (दगडफोड्या) ३०/०४/२
काव्यरस

ऐक माझ्या मुला

लेखक सन्जोप राव यांनी शुक्रवार, 30/04/2010 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझी प्रेरणा - पण एक सांगा, सतत दुसर्‍या कुणाच्या तरी प्रकाशात राहाण्याचा आरोप मी सहन का करावा? (अशा वेळी साधारणतः 'आम्ही' हे सर्वनाम वापरण्याची प्रथा आहे.

मन.....

लेखक स्पंदन यांनी शुक्रवार, 30/04/2010 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
मूसळधार पावसात..... अंग चिंब चिंब भिजले भिजलेल्या अंगातील..... मन मात्र तहाणलेलेच राहीले. ~ स्पंदन ~

फुकट वेळ असला की हे असं होतं...

लेखक मेघवेडा यांनी शुक्रवार, 30/04/2010 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
किती दिवस झाले मुखपृष्ठावरचा डावीकडचा 'लेखन करा' टॅब खुणावत आहे! आज मात्र मी मनावर घेतलंय. आज मी काहीतरी लिहिणारच! एखादा वैचारिक लेख लिहावा लिहावा असं कधीपासून मनात होतं. मीही विचारवंत होणार! मीही काहीतरी अर्थपूर्ण लिहिणार.. माझ्याही लेखावर प्रतिसादाच्या खिरापती वाटल्या जाणार!! केवळ विचारानंच बघा कसं गारगार वाटतं! मग एका क्षणात भावी विचारवंताच्या मनाला एक विचार हलकेच स्पर्श करून जातो.. कशाला इतका तो प्रपंच? वैचारिक लेख लिहिणं म्हणजे काय विचार करण्याइतकं सोप्पंय होय? शिंप्याने कपडे शिवावे- ते त्याचं काम, धोब्याने ते धुवावे.. ('ते' म्हणजे कपडे..

किस्सा मुंबई पोलिसांचा (२)

लेखक नेत्रेश यांनी शुक्रवार, 30/04/2010 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
हा अनुभव माज्या नात्यातील एकाला आलेला. साधारण ४ - ५ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. हा कमर्शीयल आर्ट कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला. उत्तम चित्रकार. हातात जादु म्हणाना. तसेच खुप कष्ट करायची तयारी. काही वेगळे, थोडे इंटरेस्टींग असे दिसले की पठ्याचा हात चालु लागलाच म्हणुन समजावे. कायम स्केच पॅड, पेन्सिल्स वगैरे साहित्य असलेली बॅग खांद्याला. एक दिवस कॉलेज मधुन उशीराने घरी परत येताना बस स्टॉप वर बसची वाट बघत बराच वेळ थांबला होता. काळोख पडत आला होता. बस स्टॉपवर १ - २ लोक होते. बाजुलाचाच मुंबई पोलीसांची नीळी जीप उभी होती. एक दोन पोलीस आत बसले होते आणी एक बाहेर जीपला हात टेकुन पान खात तीरका उभा होता.

कविता (देवद्वार छंद)

लेखक आरसा यांनी गुरुवार, 29/04/2010 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
पुढील दोन वर्षासाठी महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी समिती मधे सहभागी होण्याचे ठरवले आहे. नव्या जोमाने, काही बदल घडवून आणण्याच्या उमेदीने वार्तापत्र मराठी मधे काढण्याचा हट्ट नवीन समितीने धरला आहे, अन त्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. घरी माझी आई, बाबा, मुलगी , नवरा, सगळेच मराठी कविता करतात, पण मी कधी त्या वाटेला गेले नाही, हा माझा प्रांत नव्हे ... परवा अचानक मनातले विचार या रचनेत प्रकटले...