हा अनुभव माज्या नात्यातील एकाला आलेला.
साधारण ४ - ५ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. हा कमर्शीयल आर्ट कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला. उत्तम चित्रकार. हातात जादु म्हणाना. तसेच खुप कष्ट करायची तयारी.
काही वेगळे, थोडे इंटरेस्टींग असे दिसले की पठ्याचा हात चालु लागलाच म्हणुन समजावे. कायम स्केच पॅड, पेन्सिल्स वगैरे साहित्य असलेली बॅग खांद्याला.
एक दिवस कॉलेज मधुन उशीराने घरी परत येताना बस स्टॉप वर बसची वाट बघत बराच वेळ थांबला होता. काळोख पडत आला होता. बस स्टॉपवर १ - २ लोक होते. बाजुलाचाच मुंबई पोलीसांची नीळी जीप उभी होती. एक दोन पोलीस आत बसले होते आणी एक बाहेर जीपला हात टेकुन पान खात तीरका उभा होता.
हा बाहेत पान खाणारा पोलीस अंगाने मस्त सुटला होता. त्याचे पोट (ढेरी) ईन केलेल्या शर्ट मधुन खासच दीसत होते. त्या विचीत्र आकाराकडे लक्ष जाताच या कंटाळलेल्या माणसातला कलाकार जागा झाला. नकळतच स्केचबुक आणी पेन्सील बाहेर आली आणी हा एकग्र चित्ताने त्या पोलीसाच्या ढेरीचा शेप गीरऊ लागला. दुसरीकडे कुठेही लक्ष नाही, याचे डोळे फक्त त्याच्या पोटाकडे आणी वहीकडे.
ईकडे पोलीसाचे लक्ष त्याच्याकडे गेले. तो एवढ्या एकाग्रतेने तो कुठे पहातोय याचा अंदाज आला. बहुतेक त्याल खुप अन्-कंफर्टेबल झाले असावे आणी तो पोलीस या चित्रकारच्या जवळ आला.
याला अजुन भानच नव्हते. पोलीसाने खांद्यावर हात मारुन मानगुट पकडले.
"काय चालले आहे?" पोलीस
"नाही..काही नाही...असेच जरा..." हा दचकुन फाफलला. तो पर्यंत पोलीसाने याची 'कला' पाहीली आणी भयंकर चिडुन याच्या ए़क कानाखाली मारली.
"हे धंदे करतोस ईथे बसुन? लाज नाही वाटत?" पोलीस.
तो पर्यंत बाकीचे पोलीस जीप मधुन उतरुन तीथे आले. जाड पोलीसाचा हात याच्या मानेवर पक्का बसला होता. एका मीनीटात हा भानावर आला.
"साहेब, मी कमर्शीयल आर्ट चा स्टुडंट आहे. मी ** कॉलेज मध्ये शीकतो. सर माझी स्केच बुक बघा. आणी हे माझे ID. चुकलो सर, मी मुद्दाम नाही केले, असाच हात चालायला लागला." चित्रकार
गाडीतुन आलेल्या पोलीसांनी याचे ID आणी स्केच बुक तपासले. बरेचसे अर्धवट काढलेले आकार, चेहेरे, हात-पाय आणी बाकी बरीचशी चित्रे पाहुन त्यांचे समाधान झाले असावे.
पण याने आत्ताच काढलेला पोटाचा आकार पाहुन ते दोघेही जोरदार हसत सुटले. वातावरण नीवळले. "पुढच्यावेळी जरा जपुन चित्रे काढ....नाहीतर परत मार खायची पाळी येईल" पोलीसांचा प्रेमळ सल्ला मीळाला. त्याने काढलेले पोटाच्या चित्राचे पान काढुन घेउन त्याचे स्केच बुक आणी ID परत दिले.
एवढ्यात त्याची बस आली आणी हा पटकन बस मध्ये चढला.
पण याने काढलेले ते चित्र त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये नक्की गाजले असणार :)
वाचने
2439
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेहेहे
हाहाहाहा स
लै भारी
मस्तच! >> ते
In reply to लै भारी by भडकमकर मास्तर
अजून एक...
प्रतिसादापद्दल धन्यवाद
घाटपांडेक
धमाल किस्सा