वैशाख वणवा पेटला की गुलमोहर देखील पेटतोच. तो असा तसा पेटत नाही, दुरून नखशिखांत अग्निज्वालांनी वेढलेला भासतो. मृगजळामागगील गुलमोहराची फुले म्हणजे सक्षात ज्वालांचे ज्वलंत उदाहरणच! उन्हाळ्यामुळे त्याची हिरवी पाने झडली तरी लाल कळ्या उमलून येतात, त्यातून फुले फुलतात. अन् आख्खं झाड ताम्रोत्सव साजरा करतांना दिसतं. इतरांची पानझड झालेली असतांना हे झाड मात्र ओकंबोकं न वाटता काहीतरी भरगच्च वाटू लागतं आणि ऐन उन्हाळ्यात शीतलता, शांतता शोधणारी आपली नजर त्या भगभगीत फुलांमुळे आणखीनच गरम होण्याची शक्यता असते
गुलमोहराच्या फुलांचा एक वेगळाच साचा असतो. एकूण पाकळ्या पाच.