Skip to main content

आणि अचानक.....

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 02/06/2010 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अचानक डोळे पाणावले, काही समजेना हे मला काय झाले कधीच नव्हतो इतका उदास, इतका शांत कधीच नव्हती पडली जगण्याची भ्रांत निराशेच्या भोवर्यात गटांगळ्या खात खोल खोल कुठेतरी मनाच्या गाभार्यात माझ्याही नकळत मी कसां शिरतो मिटताच पापण्या चेहरा तुझा आठवतो निमिषात एका घडून जाते सारे संपतात शब्द उरतात फक्त सुस्कारे वाटते भेटशील का परत फिरुनी एकदा किमान हो म्हण तेवढाच उदयाला आसरा
काव्यरस

श्री क्षेत्र भुलेश्वर..अद्भूत शिल्पसौंदर्य

लेखक येडाखुळा यांनी बुधवार, 02/06/2010 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांना भुलेश्वरचं दर्शन घडवण्याचा मानस आहे. सासवड पासून साधारण २६ (?) कि.मी. वर आहे हे मंदिर.पुणे - सोलापूर रस्त्यावरून यवतच्या अलीकडे एक फाटा फुटतो. तिकडूनही एक रस्ता आहे. हे मंदिर आहे यादव काळातलं. अतिशय देखणी शिल्पं असलेलं. जगरहाटीपासून दूर घेऊन जाणारं, गूढरम्य... इथे गेल्यावर कसलीतरी अनामिक धुंदी चढते...स्वत:ला विसरून जातो आपण अगदी. असं वाटतं की तिथल्या मूर्तींकडे आपण पाहण्यापेक्षा भूतकाळाचा पडदा दूर करून त्याच आपल्याशी बोलायला उत्सुक असाव्यात. भारून जाणे, मंत्रमुग्ध होणे...छे..शब्दच सापडत नाहीत.

महात्म्याची अखेर

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 02/06/2010 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
महात्म्याची अखेर हे जगन फडणीस यांचे अभ्यासपूर्ण पुसक. हे पुस्तक केवळ गांधीहत्या ह्या विषयाला वाहिलेले व ससंदर्भ दाखले असलेले पुस्तक आहे. 'घरगुती सावरकर' मधे ५५ कोटी साठी गांधीजींनी उपोषण केले का यावर अतिशय रोचक व अभ्यासपूर्ण चर्चा चालली आहे. यावर हे पुस्तक काय म्हणते हे दाखवण्यासाठी व त्यायोगे नव्या धाग्यात खंडन-मंडन करता यावे म्हणून हा काथ्याकूट चालु करत आहे.

जलतरंग

लेखक आवशीचो घोव् यांनी मंगळवार, 01/06/2010 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच साम मराठीवर "गुरुकुल" कार्यक्रमात एका वादकाला जलतरंग वाजवताना ऐकलं. फार मजा आली. सहसा कधी ऐकायला न मिळणार्या वाद्या बाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक मराठमोळं नाव समोर आलं. मिलिंद तुळणकर अधिक माहिती आणि तुळणकरांचे जलतरंग वादन या दुव्यावर http://www.artists-india.com/resume/milind_tulankar.php

आधुनिक अंधश्रद्धा अर्थात बुवाबाजी...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 01/06/2010 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल बुवा बाबांची संख्या वारेमाप वाढलीय. पूर्वीची बुवाबाजी अत्याधुनिक रूप घेऊन आलीय. बुवा, बाबा, भगत, मांत्रिक, तांत्रिक हे शब्द बदलून स्वामी, महात्मा, गुरुजी, महाराज, सद्गुरु अशा अनेक हायटेक उपाध्यांमध्ये रूपांतरीत झालेले दिसतात. आजचे बाबा हुशार आहेत, उच्चशिक्षितही आहेत. समाजमनाचा दांडगा अभ्यास त्यांनी केलेला असतो. मानसशास्त्रही ते कोळून प्यालेले असतात. समाजाची नाडी त्यांनी ओळखलेली असते.

ती...

लेखक भानस यांनी मंगळवार, 01/06/2010 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
लोकल, म्हणजे विविधतेचा मुक्त खजिना. मी, सदैव माणसांमध्ये रमणारी. ठराविक गाड्या, त्यामुळे अनेक तऱ्हांनी ओळखी. ब्रिजवरून धावता धावता दृष्टीस पडणारी नेमकी माणसे. डब्यात तर...... नुसते डोळ्यातून दिसणारे प्रश्न, आपुलकी..... आलीस का? ह्म्म... काही हात उंचावून दखल घेणार्‍या. मैत्रिणींच्या मैत्रिणी.... अग आज शालीनि दिसत नाहीये. न विचारताच माहिती पुरवणार्‍या. काही न बोलणार्‍या पण जागा देणार्‍या. एखादे दिवशी, माझ्या सुंदर साडीवर, ती कशी खुलतेय तुझ्या अंगावर.... लांबूनही मस्त गं अशा खुणा करणाऱ्या सख्या.

रिलायन्स फार्मा फंड एक छान टॉनिक

लेखक शेखर जोग यांनी मंगळवार, 01/06/2010 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण १ ते १.५ वर्षापूर्वी औषध क्षेत्रातल्या कंपन्याना कोणीही फारसे विचारत नव्हते गुंतवणूकीदारानी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. पण आता याच कंपन्या गुंतवणूकीदारांच्या आवडीच्या झाल्या आहेत. मागच्या पूर्ण वर्षात औषध क्षेत्रातील म्युच्युअल फंडस्नी गुंतवणूकीदाराना सरासरी ८८% नफा दिलेला आहे व त्यामुळेच त्यांची गणना अग्रेसर म्युच्युअल फंडात होइल. आणि याच औषध क्षेत्रातील फंडांच्या प्रकारातील रिलायन्स फार्मा फंड हा अत्यंत अग्रगण्य फंड मानायला हरकत नाही. जरी हा फंड या प्रकारातील सर्वात शेवटचा फंड, म्हणजे २००४ मे महिन्यात सुरू झाला, तरी कानामागून येऊन अनेक फंडसना तिखट झाला.

रविवारची सकाळ - अपडेटेड

लेखक रम्या यांनी मंगळवार, 01/06/2010 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारच्या सकाळी जांभई देत उठलो. कामाची सुट्टी, पेपर वाचन, रविवारची पुरवणी, फक्त खाणं आणि तंगड्या पसरून टि. व्ही. पहाणं. काय साला दिवस आहे! नाद करायचा नाय! आंघोळ उरकून पेपर उघडला आणि आत आवाज दिला, "चहा आंण गं आणि बरोबर कांदपोहे सुद्धा" बाहेर फक्त चहाच आला. "कांदेपोहे कुठे आहेत?" "मिळणार नाहीत" मिळणार नाहीत? म्हणजे काय? रविवारच्या सकाळी सकाळी तिरसट उत्तर? धोका आहे राव. विचार करून पाहीला. काल भांडण वगैरे तर काही झालं नव्हतं. टि. व्ही. वरच्या बर्‍याच कार्यक्रमात दाखवतात, बायकोचा वाढदिवस पती विसरला कि मग बायको रागावते. च्यामारी कसा काय विसरलो मी?

मोहाची फुलं

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 01/06/2010 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल महिन्यातलं मेळघाटचं जंगल... जंगलभर एकच वास... कसला? तर मोहाच्या फुलांचा... फुलं चविला अतीशय गोड... वास पण तितकाच गोड...

दुर्ग आणि ढाकोबा संदर्भातील काही क्वेरीज

लेखक अप्पा जोगळेकर यांनी मंगळवार, 01/06/2010 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्ग आणि ढाकोबा यांच्यातले अंतर किती आहे? (म्हणजे किती वेळ लागतो चालत ?) दुर्गला जाण्यासाठी डोणेदार आणि खुटेदार असे दोन घाटरस्ते आहेत असे कळले. ते कितपत अवघड आहेत? म्हणजे क्लाईम्ब आहे की नुसतीच दमछाक करणारी वाट आहे. (खुटेदार ला सहा सहा फूटाच्या अंतरावर खिळे मारलेत असं ऐकलंय म्हणून विचारतो आहे.) ढाकोबाहून दार्‍या घाटातून कोकणात उतरण्यासाठी किती वेळ लागतो ? आणि तो घाटरस्ता कितपत अवघड आहे ? दुर्गजवळ्चे मंदिर मुक्कामास योग्य आहे का ? ('डोंगरयात्रा' चाळून पाहिलं पण त्यात वाट कितपत अवघड आहे ते दिलेले नाही. ) ढाकोबा ते आंबोली हे अंतर किती आहे ? -माहितगारांनी मार्गदर्शन करावे.