आणि अचानक.....
आणि अचानक डोळे पाणावले,
काही समजेना हे मला काय झाले
कधीच नव्हतो इतका उदास, इतका शांत
कधीच नव्हती पडली जगण्याची भ्रांत
निराशेच्या भोवर्यात गटांगळ्या खात
खोल खोल कुठेतरी मनाच्या गाभार्यात
माझ्याही नकळत मी कसां शिरतो
मिटताच पापण्या चेहरा तुझा आठवतो
निमिषात एका घडून जाते सारे
संपतात शब्द उरतात फक्त सुस्कारे
वाटते भेटशील का परत फिरुनी एकदा
किमान हो म्हण तेवढाच उदयाला आसरा
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1523
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
सुंदर
सुंदर binarybandya