Skip to main content

मोहाची फुलं

मोहाची फुलं

लेखक विमुक्त
Published on मंगळवार, 01/06/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
एप्रिल महिन्यातलं मेळघाटचं जंगल... जंगलभर एकच वास... कसला? तर मोहाच्या फुलांचा... फुलं चविला अतीशय गोड... वास पण तितकाच गोड... (मोहाच झाड) (झाडाखाली पडलेला फुलांचा सडा) (मोहाची फुलं) फुलं इतकी गोड असतात की एका वेळेस ५-६ पेक्षा जास्त खाऊच शकत नाही... आणि जास्त वेळ वास घेतला तर नुसत्या वासानेच थोडी झिंग चढल्या सारखं वाटतं... गावकरी ही फुलं जमवतात आणि सुकवून साठवतात... मग गरज पडेल तशी ह्या फुलांपासून दारु बनवून प्यायची... ह्या फुलांपासून खीर, गोड रोट, अन लापशी पण बनवतात... विमुक्त
लेखनविषय:

याद्या 15221
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

तिथे पण गेलास का? माणूस आहेस का कोण?

__/\__ ह्या माणसाचा जितका हेवा वाटतो तितका कोणाचाच वाटला नव्हता... :)

In reply to by मनिष

धन्यवाद रे विमुक्ता!! अदिती

कधी मोहाचे झाड आणि त्याची फुले पहायला मिळतील असे वाटले नव्हते,पण आज तुमच्यामुळे हे झाड पहायला मिळाले. धन्यवाद... :) मदनबाण..... Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it. Cullen Hightower

In reply to by मदनबाण

कधी मोहाचे झाड आणि त्याची फुले पहायला मिळतील असे वाटले नव्हते,पण आज तुमच्यामुळे हे झाड पहायला मिळाले. असेच म्हणतो.... तसेच तुमच्यामुळे त्या मोहाच्या फुलांची प्यायचाही योग लवकरच जुळून यावा.... आंबोळी

In reply to by आंबोळी

कधी मोहाचे झाड आणि त्याची फुले पहायला मिळतील असे वाटले नव्हते,पण आज तुमच्यामुळे हे झाड पहायला मिळाले. मीही असेच म्हणतो.... तसेच तुमच्यामुळे त्या मोहाच्या फुलांची प्यायचाही योग पून्हा एकदा लवकरच जुळून यावा.... (महुवाप्रेमी) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D

In reply to by अनिल हटेला

कधी मोहाचे झाड आणि त्याची फुले पहायला मिळतील असे वाटले नव्हते,पण आज तुमच्यामुळे हे झाड पहायला मिळाले.
+१
तसेच तुमच्यामुळे त्या मोहाच्या फुलांची प्यायचाही योग पून्हा एकदा लवकरच जुळून यावा....
-१ ;)

>>जास्त वेळ वास घेतला तर नुसत्या वासानेच थोडी झिंग चढल्या सारखं वाटतं... हे ठीक हो. अनुभव काय आहे तो लिहा की... की अशी झिंग येण्याआधीच सारं काही बेतशीरपणे आटोपून निघाला होता? तसं असेल तर मात्र तू ('हाय कंबख्त...'च्या चालीवर) मोहाचा अनुभवच घेतला नाहीस.

छान माहिती आणि छायाचित्रे पण...... ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

धन्यवाद विमुक्त. माझ्या मित्राच्या वडिलांनी आणली होती मोहाची फुले एकदा. मी आणि माझ्या मित्राने चोरुन खाल्ली १०-१२ फुलं आणि नंतर दोन्ही घरी भरपूर ओरडाही.

In reply to by स्वाती२

आमच्या पिताश्रींनी मागच्याच महिन्यात सातपुड्यातील जंगलांमधुन मोहाची सुकवलेली फुले आणली होती. खाउन पाहिली गोड होती. पण लय भारी नाही वाटली :( जाता जाता: मोहाची दारु आणली असती तर .... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

मोहची फुले हे शिर्शक वाचुन गो. नि दान (शी! अनुस्वार कसा द्यायचाबुवा) च्या " दुर्ग दर्शन " पुस्तकाची आठवण झाली. कर्नाळा भेटीचे वर्णन करताना कर्नाळ्याच्या जन्गलातील वर्णन! तुझी भटकन्ति वाचुन नेहमीच य पुस्तकची आठवण येते.

मस्त!! प्रचंड हेवा वाटतो तुझा. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

सुंदर फोटो.

बंगाली -> महुवा सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

हे मोहाचे झाड (?) घराच्या बागेमधे लावायला बंदी वगैरे आहे का? नसल्यास बी / रोप कुठे मिळेल?

In reply to by सहज

भारतात बंदी नाही. (असे आमचा वार्ताहर कळवतो.) माझ्या माहितीप्रमाणे (हॅहॅहॅ) बी चालत नाही. रोप हवे. रोपे मुबलक प्रमाणात मोहाच्या झाडाखाली मिळतात. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अजुन काही संबधित माहीती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् कीर्तनकार ह.भ.प. बबनराव पाचपुते यांनी आदिवासी विकास खात्याचा कार्यभार सांभाळल्यानंतर शंभर दिवसाच्या ‘टारगेट’मध्ये अगदी सुरुवातीलाच ‘मोह’ अनावर झाला अन् उसाच्या कंट्री लिकरपेक्षा मोहाच्या फुलापासून तयार केल्या जाणाऱ्या दारूला ‘हर्बल लिकर’ म्हणून बाजारात आणण्याचा निर्णय घेवून टाकला आहे. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=23836:2009-11-15-17-29-02&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104 ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

भांग जशी देवाला चालते, तशी मोहाची दारु कोणत्या देवाला चालते का? ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

ज्यायला कालजाला हात घातला बोल. मवाची दारु पीवाला न जवला झे रं चाकन्याला बाकी झाड बगुनच टाईट झालो बग. लै भारी र बाला मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

हे सुद्धा मिपावर आहे माहीत नव्हतं.