मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्री क्षेत्र भुलेश्वर..अद्भूत शिल्पसौंदर्य

येडाखुळा · · कलादालन
नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांना भुलेश्वरचं दर्शन घडवण्याचा मानस आहे. सासवड पासून साधारण २६ (?) कि.मी. वर आहे हे मंदिर.पुणे - सोलापूर रस्त्यावरून यवतच्या अलीकडे एक फाटा फुटतो. तिकडूनही एक रस्ता आहे. हे मंदिर आहे यादव काळातलं. अतिशय देखणी शिल्पं असलेलं. जगरहाटीपासून दूर घेऊन जाणारं, गूढरम्य... इथे गेल्यावर कसलीतरी अनामिक धुंदी चढते...स्वत:ला विसरून जातो आपण अगदी. असं वाटतं की तिथल्या मूर्तींकडे आपण पाहण्यापेक्षा भूतकाळाचा पडदा दूर करून त्याच आपल्याशी बोलायला उत्सुक असाव्यात. भारून जाणे, मंत्रमुग्ध होणे...छे..शब्दच सापडत नाहीत. यात मुळीच अतिशयोक्ती नाही. हे आहे मंदिराचं बाह्य रूप... Image removed. या प्रवेशद्वारामधून आपण आत जातो... Image removed. दोन्ही बाजूला चढून जायला जिने आहेत...अंधारातून चाचपडत पुढे गेलं कि मात्र आपण वेगळ्याच विश्वात असतो. Image removed. इथून पुढे बोलायला फारसं काही राहत नाही... Image removed. छाया प्रकाशाचा हा खेळ... Image removed. इथे रामायणा मधले देखील काही प्रसंग आहेत. पण गाईड असल्यासच जाणून घेता येतं. Image removed. काही सुंदर मूर्ती.. Image removed. Image removed. अजून एक विशेष असा की इथे स्त्री रूपातील गणपती पहावयास मिळतो. Image removed. शिल्पकलेचे काही अद्भूत नमुने इथे आहेत.. अतीशय प्रमाणबद्ध आणि रेखीव शिल्पं... Image removed. आणि काही उदासवाणी? जणू काही हा पराभूत योद्धा आहे... Image removed. अप्रतीम काम आहे हे... Image removed. फोटोच द्यायचे झाले तर खूप खूप देता येतील...पण स्वत: तिथे जाऊन हे सगळं अनुभवणं म्हणजे शब्दांच्या पलीकडचं आहे... डोळ्यांना जे काही दिसतं ते कॅमेरा कैद करू शकतो..मनाचे तरंग तर नाही... दर वेळी एक नवा अनुभव...श्री क्षेत्र भुलेश्वर... Image removed.

वाचन 20434 प्रतिक्रिया 0