Skip to main content

वटपोर्णिमेच्या शुभेच्छा

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 25/06/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
(चित्र जालावरुन साभार.) वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. मला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक "सौन्दर्य लहरी" मधून - विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम| वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६|| महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो.

(तूळ)

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 25/06/2010 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
हातात वर्तमानपत्र घेवुन आम्ही पहायचो ती कर्क राशीचं भविष्य अन मी तूळ राशीचं भविष्य पहायचो राहूकाल सांभाळत शुभ मूहूर्त शोधताना असंच आयुष्यही मंगल बनवायचं एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो कालपुरुषाच्या मुखामधून कधीतरी तिचा ग्रास ग्रहण झाला मी मात्र बघतो आहे दोन्ही राशी... कर्क आणि तूळ डोळ्यात पाणी आणून.
काव्यरस

घो(स)ळ

लेखक आंबोळी यांनी शुक्रवार, 25/06/2010 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
च्यायला या नान्याने सगळ्यांनांच झपाटलय.... हातात हात घेवुन आम्ही झपाटायचो ती एकाच्या मानगुटीवर बसायची अन् मी दुस-याच्या अंगात यायचो झाडावर लटकत लोंबत असतांना बोलत असतांना असंच सगळ्यांना झपाटायच एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो पुनर्जन्माच्या फेर्‍यातून कधीतरी तिचा आत्मा मुक्त झाला मी मात्र मारत आहे त्याच गावातून झपाटण्यासाठी चकरा.... बॉडी टु बॉडी. ---कंदिलकुमार सहजरावांच्या सल्ल्या नुसार जळ्ळा तो शिर्षकात आणलेला आहे.

(धूळ)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी शुक्रवार, 25/06/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन यज्ञात आमची एक शुल्लक आहुती हातात झाडू घेवुन आम्ही झाडायचो ती एका कोपर्‍याला साफ ठेवायची अन् मी दुस-या कोपर्‍याला साफ ठेवायचो झाडू सावरत झाडत असताना पुसत असतांना रस्ते प्रत्यक्षातही चकाकायचे एकमेकांना हलकेच चोरुन बघायचो मुकादमाच्या गाडीवरून कधीतरी तिची ड्यूटी बदलून गेली मी मात्र मारतो झाडू रस्त्यांवरून झाडूवाल्यासारख्या कायम...हा कोपरा ते तो कोपरा.
काव्यरस

<<टेंगूळ>>

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 25/06/2010 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियांच्या रुळावरुन भल्याभल्यांच्या मालगाड्या धडधडत निघुन गेल्या..आमचीही मालगाडी..धडतधडत नाही तर धडपडत.. दात ओठ खात आम्ही नेहेमीच भांडायचो.. ती लाटणे फेकुन मारायची अन मी ते चुकवायचो.. तोल न सांभाळुन बोलत असताना भांडत असताना.. डोक्यावरती आलेली टेंगळ्यांना ती रोज रात्री आयोडेक्स चोळायची.. आज सकाळीच नटुन सवरुन घालुन हिरवी साडी ती निघुन गेली..वटपौर्णिमेला.. मायला ही अशी ही दिसु शकते तर..! मी विचार करतोय ..कपाळावरचे टेंगुळ दाबत दाबत.. स्त्री वर्गाला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा! - योगेश
काव्यरस

ट्वायलाईट २ - 'न्यू मून'

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 25/06/2010 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
स्टेफनी मेयर ह्या लेखीकेच्या ट्वायलाईट सागा वर आधारीत पहिल्या चित्रपटाची ट्वायलाईटची ओळख आपण मागच्या भागात करुन घेतली. आज आपण ओळख करुन घेणार आहोत ह्याच्या पुढच्या भागाची 'न्यू मून'ची. खरेतर पहिल्या भागात चित्रपटातील सर्व पात्रांची ओळख झाली असल्यास बर्‍याचदा दुसरा भाग थोडा संथ अथवा कंटाळवाणा वाटतो, पण 'न्यू मून' ह्याला निश्चीतच अपवाद ठरतो.

पळ

लेखक सहज यांनी शुक्रवार, 25/06/2010 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अर्थातच मित्रवर्य नानाजी यांची रुळ व मराठी जालीय खूळ खोडी काढून आम्ही असेच बुंग्गाट सुटायचो तो त्याच्या संस्थळावर अन मी दुसर्‍याच्या संस्थळावर पहारा ठेवायचो अश्याच खोड्या काढताना निस्तारताना, कधी आय्डी शेयर करताना अजुन एक ब्लॉग आपणच काढायचा एकमेकांना सांगून खळाखळा हसायचो लिव्हरेजच्या निसरड्या वाटेवरुन कधीतरी त्याची हवा निघुन गेली मी मात्र वसुलि करत आहे अजुन सोनेरी द्र्व्याच्या अमलेत सोमवार टू रविवार
काव्यरस

( फौल ) : स्पॅनिश व्हर्शनसह ...

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 25/06/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
काल अवलियांनी त्यांचे 'रुळ' हे काव्य मिपावर टाकुन मॅच सुरु झाल्याची शिट्टी वाजवली आणि त्यानंतर एक से एक महारथी मैदानात उतरले आणि त्यांनी धडाधङ गोल मारुन अगदी बाजार उठवला. पण आम्ही काल जरा 'इंज्युयर्ड' असल्याने बेंचवरुनच हे सामने पाहिले, आज आमच्याअ फिजियोने आम्हाला फिट घोषीत केले अहे व आम्ही मैदानात उतरलो आहोत ...
काव्यरस

फोटोंवर वॉटरमार्क/कॉपीराईट मार्क टाकणे "आवश्यक" आहे.

लेखक योगेश२४ यांनी शुक्रवार, 25/06/2010 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी काढलेली काहि प्रकाशचित्रे मलाच फॉरवर्डेड मेल मधुन येत आहेत (अगदी शिर्षक आणि दिलेल्या कॅप्शनसहित). दुर्दैवाने मी त्यावर वॉटरमार्क आणि कॉपीराईट मार्क टाकलेले नव्हते :(. (मला स्वतःला वॉटरमार्क आणि कॉपीराईट मार्क टाकणे आवडत नाही, त्यामुळे फोटोचे मूळ सौंदर्य कमी होते हे "माझे" मत होते.) पण काही दिवसांपासुन मीच काढलेले फोटो मलाच मेलमधुन येताना पाहिल्याने आता हे टाकणे गरजेचे वाटु लागले आहेत. सध्या हे दोन मेलमधुन सर्वत्र फिरत आहेत. भर पावसात . . . . . .