Skip to main content

अंदाज अपना अपना

लेखक टारझन यांनी बुधवार, 30/06/2010 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , शिर्षक वाचुन एकदम अमिर-सलमान-परेश रावल समोर उभे राहिले की नाही ? अगदी !! ज्याला "अंदाज अपना अपना" आवडला नाही असा एकंही जण मला भेटलेला नाही. आज पर्यंत ६० वेळा तरी हा पिक्चर पाहिला असेल. नंतर तर काऊंटिंग विसरलो.
मी लै लहाण असतांना माझ्या मावशीच्या घरी पहिल्यांदा हा पिक्चर पाहिला होता. तेंव्हा केबल म्हणजे "वा वा !! केबल आहे का घरी !! वावावा !! " असला प्रकार होता.

कितीदा..!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 30/06/2010 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
गुत्त्यात मी प्यायलो कितीदा सस्त्यात मी पटलो कितीदा! तिचे दुर्लक्ष, तिचे नकार इष्कात मी हरलो कितीदा! मागितली मी नभाची मालकी सूर्यास मी भेटलो कितीदा! दिले धडे मी धर्मरक्षणाचे विहिरीत मी बाटलो कितीदा! तिचे ओठ, तिची स्तनाग्रे स्वप्नात मी रंगलो कितीदा! -- तात्या अभ्यंकर, ३० जून, २०१० - ख्रिस्तपश्चात.

खासदार वेतनवाढ विरोधात ऑनलाईन याचिका

लेखक chintamani1969 यांनी बुधवार, 30/06/2010 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मंडळीना नमस्कार, पुण्याच्या सजग नागरिक मंचाने खासदार वेतनवाढ विरोधात एक ऑनलाईन याचिका दाखल केली आहे . ही माहिती दिनांक ३० जूनच्या सकाळ पुणे मध्ये मुखपृष्ठावर आहे तरी सर्व मिपाकर मंडळीनी कृपया प्रतिसाद द्यावा . ह्या लिंक वर क्लिक करा . http://www.petitiononline.com/sajag100/petition-sign.html?

कुंभारवाडा

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 30/06/2010 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्या डागांनी गालबोटलेल्या सूर्याने फुंकलेले वारे भन्नाट भिरभिरतात पृथ्वीच्या चुंबकीय भोवर्‍यात मग उभं राहातं ध्रुवप्रदेशात अरोरा बोरिआलिसचं अद्भुत प्रकाशशिल्प, न्हाऊ घालत घनतिमिर थंडगार प्रदीर्घ रात्रीला दिसतात कधी सप्तरंगाचे तुषार उडणार्‍या थेंबांतून निघताना घुसमटलेल्या प्रतिभेच्या अनावर उन्मेषाप्रमाणे आणि बहरून येतात फ्रॅक्टल्सच्या अनंत वृक्षांवर रंगभरली फुलं प्रत्येक परागात त्या वृक्षाच्या अनंत प्रतिमा बाळगून कुंभारवाड्यात मात्र अजूनही भाजली जातात त्याच जुनाट मातीची भांडी चार साच्यांची विविधता व अर्धज्ञानी बोटांच्या ठशांची समृद्धता मिरवत तोच कंटाळवाणा चंद्र जातो ठरल्याप्रमाणे लिंबोणीच
काव्यरस

(पारध)

लेखक अवलिया यांनी बुधवार, 30/06/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा... भर बाजारात पाध्यांनी फोडलेले थोबाड. वस्ती लेखकांची स्थिरावलेली होती हाव पाध्यांची उफाळलेली होती नशा हो सत्तेची नित्य चढत होती भूक जुगाडाची चाळवलेली होती प्रतिसादांत त्या मैथुनी क्लांतता* नव्हती तरी लाईन तिरकी सर्वच उडवली होती प्रतिसाद डिलीट ही चाल धूर्त होती मैत्रीमधेच "त्या" त्यांची मने गुंतली होती नव्या पाध्यांचे चाळे पुन्हा बहरती जुन्या नानाची ओळख त्यांना नव्हती * असे शब्द असलेले लेख प्रतिसाद उडवले जात नाहीत असे समजल्यावरुन.
काव्यरस

दक्षिणायन..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 30/06/2010 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
तो अविष्कार आता माझा नव्हे तो पुरस्कार आता माझा नव्हे.. मी मस्त मजेत गायलो, भिजलो तो पाऊस आता माझा नव्हे.. घेतली होती रम्य, हळुवार चुंबने तो किनारा आता माझा नव्हे.. मोप मिळविल्या टाळ्या अन् शिट्ट्या तो रंगमंच आता माझा नव्हे.. मी स्त्रीलंपट काहीसा, सभ्य बुरख्यातला! तो स्वभाव आता माझा नव्हे.. घुसविली मी काळजात कट्यार तो तेजिनिधी आता माझा नव्हे.. उपाध्या, पद्व्या करतो अता अर्पण तो सन्मान आता माझा नव्हे.. -- तात्या अभ्यंकर.

डॉक्टर जगो..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 30/06/2010 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टरलोक पेशंटला नेहमीच कापतात, पैशांत मापतात किंवा टाळूवरचं लोणी चापतात... असे अनेक गैरसमज जनमाणसांत पसरलेले असतील. परंतु डॉक्टरांची कथा अन् व्यथा निराळीच आहे. मूळात हा व्यवसाय/ पेशा रांत्रंदिन युद्धाचा प्रसंग असा असतो. डोळ्यात तेल घालून रुग्ण तपासणे, योग्य निदान करणे, उपचार पुरवणे हे काही सोपे काम नाहीये मित्रांनो. पेशंटचा आजार वा पिडा कशी दूर करता येईल याच विचारांत डॉक्टर गढलेले असतात. रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही किंबहुना तसे उद्दिष्ट त्यांच्यापुढे मुळीच नसते. समाजसेवा अन् सेवाभाव डॉक्टरकीत दडलेला असला तरी मेवा लाटणारे लुटारू डॉक्टरही आढळतात.

हाती माझ्या शुन्यच उरले

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 30/06/2010 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
हाती माझ्या शुन्यच उरले
हाती माझ्या शुन्यच उरले खिसा फाटकाच, हाती न काही लागले ||धृ|| कोणास माझा म्हणू मी, कोण कोणाचा होतो मी दैवगतीने सारे मी पण जळले, रक्ताचेही नाते तुटले हाती माझ्या शुन्यच उरले ||१|| कोठूनी आणावा पैसा आता, कशा बांधू इमले माड्या काळाबरोबरी काळच आला, जवळचे सारे काही नुरले हाती माझ्या शुन्यच उरले ||२|| ओळख आता विस
काव्यरस