Skip to main content

आठवण आणि ……

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 22/07/2010 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
आठवण आणि …… वादळ, वारा, पावसातहि भेटीस येणे अपूर्व होते, प्रीतिचे ते क्षण उन्मादी मनांत माझ्या ठसले होते प्रेमकहाणी विफल आपुली प्रारब्धाचे देणे होते, विधिलिखित हे भालीचे त्या समयी मज कळले नव्हते. निशब्द अधिकार तुजवर बिम्बवित मी गेलो नसतो, स्वप्न मोगरा फुलवीत मनींचा सुगंधित मी जाहलो नसतो. जीर्ण घराच्या मज भिंतीवरची तसविर तुझी चिरतरुण आहे, गाली खळी अन ओठ गुलाबी त्यांत आजहि तसेच आहे निरंजन वहाळेकर
काव्यरस

पाऊस आला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/07/2010 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस आला
पाऊस आला पाऊस आला पडू लागल्या धारा थेंबांच्या नक्षीला साथ द्याया धावे अवखळ वारा || अलगद हलक्या सरी येवूनी सुरू होतसे वर्षाव वेग वाढूनी जोर येतसे धारेला नसतो ठाव क्षणात ओली होई धरती पडता असंख्य धारा ||१|| नभातून तुषारांचे पडती बारीक बारीक थेंब धरती होईल हिरवी अवघी लेवूनी हिरवे कोंब हिरवाईची किमया होईल निसर्ग बदलेल सारा ||२|| - पाषाणभेद १७/०७/२०१०
काव्यरस

हा तोच किनारा फिरतो मी

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 22/07/2010 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
उजव्या बाजुस गजबजणारी तीच गाज घुमते अरबी हा तोच किनारा फिरतो मी ।।धृ।। दगडावरती झोकुन सारे वार्‍यामनिचे गुपित खारे लेउन लाटा उधळण करती तीच तुषारांची धुंदी ।।१।। तोच दिवस त्या महिन्याचाही तोच कोन त्या किरणांचाही परंतु पृथ्वी सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही ।।२।। धरून ऐना कुंद हवेला तनामनाने हिरवुन गेला तसा न सागर आज सांगतो जन्मजन्मीच्या गुजगोष्टी ।।३।। केसांमधल्या लाटा सारत शब्दहासरे तुषार बरसत उजव्या बाजुस गाज रोखुनि चालत तू ना मजसाथी ।।४।। काय बोललो तेव्हा आपण कसे कुठे अन गेले ते क्षण मनात ओल्या रेतीवरच्या त्याच खुणा धरल्या जपुनी ।।५।। डाव्या बाजुस गाज अता ही सूर्यास्ताची सरते तरिही ज
काव्यरस

आंतरजाल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 22/07/2010 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
जेम्स लेनवरचा धागा आता अप्रकाशित केला गेलेला आहे. या निमित्ताने काही प्रश्न पडतात : - राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारे विषय आणि त्यावरील चर्चा - मग त्या चर्चा कितीही नियंत्रित वातावरणामधे चालवल्या गेलेल्या असोत - या गोष्टी आंतरजालावर पूर्णपणे वर्ज्य आहेत काय ? - आंतरजालीय चावड्यांवर व्यक्त केली गेलेली राजकीय मते आणि चावडीच्या मालकाचा अजिबात संबंध नाही असा वेगळा "श्रेयअव्हेर" करणे आवश्यक आहे काय ? असल्यास नक्की कुठे ?

मी आणी माझा आयडी

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 22/07/2010 02:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज हापिसातुन घरी आलो, लॅपटॉप सुरु केला तोच त्यातुन अलादीनच्या दिव्याप्रमणे धुर निघाला आणी त्यातुइन एक आकृती तयार झाली. आकृती म्हणाली कसं काय? मी विचारलं कोण तु? आकृती म्हणाली अरे मी तुझा आयडी, आंतरजालावरचा. मी : - अरे मग असा कंप्युटर मधुन बाहेर का आलास? आयडी: - आलो तुझ्याशी गप्पा मारायला. मी: - काय बोलायचय बोल. आयडी :- काही नाही यार. आजकाल आंतरजालाचा कंटाळा येतो.

(अवलिया रुप)

लेखक केसुरंगा यांनी गुरुवार, 22/07/2010 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा क्रान्तियांची सुरेख रचना अरूपाचे रूप आणि हरिकथेतील कीर्तनकुमार परा यांचे अवलियाचे रूप> "अवलिया" रूप। अवांतर खूप पाध्ये देई चोप । वारंवार कंटकांचेपाठी । रोजपडेकाठी उभा पाध्येजेठी । चौपाटीत मिपाचा कैवारी । साळसूद वरी खर्डी व्यनी करी । संपादका परात्पर गुरु । नाना कैवारु सहजची उद्धरु । धागे काही मायबाप, भ्राता । तूच सखा, त्राता घे रे नीलकांता । सुदर्शन केसुरंगा
काव्यरस

रस्त्यावरील अपघात

लेखक विकास यांनी बुधवार, 21/07/2010 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
भोचक यांना कधी प्रत्यक्षात जरी भेटलो नसलो तरी, आज हूरहूर लागली आहे. जो काही थोडाफार संवाद झाला तो आधी पण पुरेसा नव्हता, पण आता अधूराच राहणार याचे वाईट वाटत राहील. हे माझ्याबाबतीतच नाही तर अनेकांच्या बाबतीत खरे आहे असे राहून राहून वाटते. पण अशा चांगल्या आणि होतकरू व्यक्तीच्या अकाली मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना केवळ श्रद्धांजली म्हणून थांबणे जीवावर येत आहे. अशी शोक व्यक्त करण्याची वेळ का यावी हा प्रश्न टोचत आहे. अशी वेळ कुणावरही येऊ नये हीच प्रार्थना...

(केव्हा तरी पहाटे)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 21/07/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
केव्हा भल्या पहाटे उठवून माय गेली खुलले जराच डोळे वरडून माय गेली सांगू तिला कसा मी वेळ गाढ झोपण्याची उडवून शाल, पाणी शिंपडून माय गेली कळले मला न केव्हा चढली रात्री जराशी कळले परि मला हो भडकून माय गेली उठले घरात काही आवाज भांडणाचे पेले चा-पाण्याचे आपटून माय गेली स्मरते मला न तेव्हा वदलो मी काय रात्री मग वेळ मेसेजाची दाखवून माय गेली (काल रात्री घरी यायला अंमळ उशीर झाल्याने चिडलेल्या आमच्या आईने सकाळी लवकर न उठण्यावरून आमची चांगली हजेरी घेतली. त्यावेळच्या समर प्रसंगाचे हे संक्षिप्त वर्णन.) **अन्यत्र पूर्वप्रकाशित

निषेध त्या न्याय व्यवस्थेचा अन त्या अन्यायी व्यवस्थेचे समर्थन करणारांचा....

लेखक आम्हाघरीधन यांनी बुधवार, 21/07/2010 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
या चर्चेतील मुद्दे वाचले मुलतः कोणत्याही थोर व्यक्तीच्या बद्दल कुणाही सोम्यागोम्याने काहीही माहीती द्यावी कुणाही लंपट लेखकाने काहीही लिहावे अन शासनाने अशा लिखानावर बंदी आणली असता कुणाही येरागबाळ्याने न्यायालयात याचिका दाखल करावी की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे? हे कितपत योग्य आहे? आपल्या पैकी कितीतरी जण न्याय व्यवस्थेच्या या अन्यायी निर्णयाचे समर्थन करतांना दिसतात तेंव्हा न्यायाची चाड आपणाला आहे काय? हा प्रश्न निर्माण होतो.

हातातला खजिना (लोकल गोष्टी-३)

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 21/07/2010 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
हातातला खजिना ============================================ रोज सकाळी राजसला शाळेत सोडल्यावर मी ऑफिससाठी स्टेशन गाठायचे.. राजसची शाळा पावणेनऊला सुरू व्हायची त्यानंतर अगदी चालत निघाले तरी नऊ सव्वा नऊ पर्यंत मी पार्ले स्टेशनवर पोहचायचेच. माझ्या कडे तसा बराच वेळ असायचा.. दोन नंबर प्लॅटफॉर्म वर चेंगरा-चेंगरीत घुसून लोकल पकडावी लागायची नाही. सहा नंबर प्लॅटफॉर्म वर नऊ अठरा चर्चगेट लोकल लागलेली असायची. त्या लोकलने मी आरामात जाऊ शकायचे.. आणि जरी काही कारणांनी ही लोकल चुकली तरी पुढच्या लोकलनी मी वेळेत ऑफिसला पोहचायचे. त्यामुळे तसा बराच निवांतपणा होता. आणि मन निवांत असलं की त्याला आजूबाजूच दिसतं..