Skip to main content

(केव्हा तरी पहाटे)

(केव्हा तरी पहाटे)

Published on बुधवार, 21/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
केव्हा भल्या पहाटे उठवून माय गेली खुलले जराच डोळे वरडून माय गेली सांगू तिला कसा मी वेळ गाढ झोपण्याची उडवून शाल, पाणी शिंपडून माय गेली कळले मला न केव्हा चढली रात्री जराशी कळले परि मला हो भडकून माय गेली उठले घरात काही आवाज भांडणाचे पेले चा-पाण्याचे आपटून माय गेली स्मरते मला न तेव्हा वदलो मी काय रात्री मग वेळ मेसेजाची दाखवून माय गेली (काल रात्री घरी यायला अंमळ उशीर झाल्याने चिडलेल्या आमच्या आईने सकाळी लवकर न उठण्यावरून आमची चांगली हजेरी घेतली. त्यावेळच्या समर प्रसंगाचे हे संक्षिप्त वर्णन.) **अन्यत्र पूर्वप्रकाशित
लेखनविषय:

याद्या 3034
प्रतिक्रिया 22

पुन्हा वाचण्याचा आनंद मिळाला.

वा पु.पे बुधवारच्या कविता मंगळ्वारी येऊ लागल्या. छान आहे कविता. --------------- धनंजय बोरगांवकर

हा हा हा =)) =)) =)) पुपे परत वाचली पण यावेळी अजुन मज्जा आली. (तुमच रुपड डोल्या म्होर उब र्‍हायल बगा या येळी.)

In reply to by गणपा

हाहाहा! असेच म्हणतो! =)) =))

लै भारी रे.. आधी पण वाचली होती आणी आता परत वाचली. --टुकुल

ही ही ही ही ही :)) मायच्या आयडिया मस्त आहेत. अजमावून पहायला हव्यात. पण आमच्या घरात सर्वात उशीरा उठणारी मीच आहे. :$ मीनल. http://myurmee.blogspot.com/

केव्हातरी असंही होऊ द्यायचं असतं. उशिरा उठत चला पण लिखाणाच्या बाबतीत नको. कारण आपण पुण्याचे! ************************************* माझं पुस्तक, माझा ब्लॉग.

मस्त रे पुपे लगे रहो.........! :) -दिलीप बिरुटे

मस्तच! याचे कोणीतरी रसग्रहण करावे ;) (का कवितेच्या मुळाशी रसग्रहणच आहे? :?)

पुपे पुन्हा वाचायला मजा आली. :-)

पेशव्या, पुन्हा एकदा वाचायला मजा आली. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हेच म्हंतो. या निमित्ताने पुप्याने बुधवारचे सदर पुन्हा सुरु करावे. -Nile

हे रा़क्षसी हास्य होते....! ....अशी अस्सल हजेरी.....कोणी घेतली नाहि हो बरेच दिवसात... एकदम आठ्वण आली.... .....उद्या होउनच जाउ दे!....

मस्त --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

मस्त! ह ह पु वा. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मस्तच! यावर उपाय म्हणजे रात्री घरी यायला उशीर झाला न झाला तरीही सकाळी लवकर उठू नये!

ताजा अनुभव, स्वानुभव, प्रामाणिक कथन हे सर्व असल्यामुळे हे विडंबन नेहमीच्या धोधो विडंबनांपेक्षा वेगळे आहे. आवडले.

मस्त! _________________________________________________ ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील