Skip to main content

देवा एक माझे | पुरवावे कोड |

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 22/07/2010 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
देवा एक माझे | पुरवावे कोड | तुझे माझे आड | नको काही || नको कर्म कांड | नको ब्रह्म माया | येर झार वाया | संसाराची || नको बडिवार | सोवळे ओवळे | तेणे ना आकळे | सत्य तत्त्व || देवा ऐसे द्यावे | मज वरदान | नामानुसंधान | राहो सदा || तुझी श्याम मूर्ती | सदा राहो चित्ती | आणि सर्व वृत्ती | तुझे पाशी || सदाचा सन्नीध | माझ्या देव आहे | प्रेमे मज पाहे | ऐसे व्हावे || अलोट ते सुख | तुज मी स्मरावे | अंतरी राखावे | समचरण || प्रेम सागराचा | पूर तुझे दारी | सर्वत्र श्री-हरी | बाकी काय || -- सागर लहरी २२.७.२०१०

नका जावू अशा पावसात

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/07/2010 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
नका जावू अशा पावसात
सिच्यूऐशन: रातीचा पाउस पडूं र्‍हायलाय आन हिरो पहारा करायच्या डुटीला जावूं र्‍हायलाय......
भर रातीचं आभाळ फाटलं मनी काहूर काळजीचं दाटलं येळीअवेळी बाहेर पडता जीवा घोर लागं कारभारी....नका जावू अशा पावसात ||धृ|| उगा काळजी लागं दिसभर पडं संततधार रातीलाही नाही उतार घरातच र्‍हावा तुमी माझ्यासंगती घ्यावं मला उबार्‍यात कारभारी नका जावू पावसात ||१|| रातीला तुमी डुटीला* जाता उलटी सारी कामं करता एकलीचा माझा येळ जाईना कशी काढू मी रात कारभारी नका जावू पावसात
काव्यरस

नव्या वर्षाची गुढी उभारू चला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/07/2010 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या वर्षाची गुढी उभारू चला
फाल्गून सरला चैत्री पाडवा आला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||धृ|| नऊवार साडी चौरंगी खण काठी धुवून टाका बांधून लिंबाचा पाला हारकड्याने सजवू धजवू तिला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||१|| शुभमुहूर्त असे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा शुभ काळ असे नव्या कार्यरंभाचा पाने आंब्याची फुले झेंडूची घेवून तोरण लावू दाराला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||२|| धरती नटली चैत्रपालवी घरात सजली गृहलक्ष्मी विसरा १ जानेवारीच्या वेड्या जल्लोशाला सण मराठी वर्षारंभाचा
काव्यरस

विठ्ठलाचा बाजार

लेखक Manoj Katwe यांनी गुरुवार, 22/07/2010 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.esakal.com/esakal/20100722/5722669071799675150.htm http://www.esakal.com/esakal/20100722/5556652452577345971.htm सकाळ मध्य प्रसिद्ध झालेले हे वृत्त वाचले, आणि राजकरण्यांनी विठ्ठलाचा मांडलेला बाजार पाहून मन विषण्ण झाले. ह्या विठ्ठल मंदिराच्या कार्यकार्णीचा निषेध. जोपर्यंत मंदिराचे समिती सदस्य राजकारन्यांचे तळवे चाटायचे बंद करीत नाही तो पर्यंत विठ्ठलाला लांबूनच राम राम १५ दिवस वारी करून आलेले वारकर्यांना जेव्हा महापूज

आफ्रीकन अमेरीकन बडबडगीत - कुम्बायाह

लेखक शुचि यांनी गुरुवार, 22/07/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
मुलगी लहान असताना, आमचा आवडीचा खेळ म्हणजे - एकत्र बडबडगीतं गाणं. पैकी मला आठवणारी बहुतेक बडबडगीतं मराठी होती. कारण इंग्रजी ५ वी पासून चालू झालेलं. त्यामुळे मुलगी देखील मराठी गाणी सर्वात आधी शिकली. "ससा रे ससा नी कापूस जसा" असो की "या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या" किंवा "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला" असो तिला गाणी ऐकायला आणि मला गायला अतिशय आवडत.

प्रतिबिंब

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 22/07/2010 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो. अहो पोहोचलात का ऑफीसात ? हो . पोचलो बोल लवकर. मला मिटिंगला जायचे आहे. पाऊस आहे का ? फालतू प्रश्न विचारु नकोस. तुम्ही शनिवारचं तिकिट काढलं का पुण्याचं? हो आत्ताच काढल. बोरीवली - स्वारगेट बसचं. म्हणजे स्वारगेटहून सिंहगड रोडला जायला सोपं कॅन्सल करता येईल का ? कॅन्सल ?अग तू ऑफीस मधे जाण्यापुर्वी तिकिट काढण्यासाठी मागं लागली होतीस आणि आता कॅन्सल करायचं म्हणतेस ?आता या एसटी च्या नव्या साईट वरुन तिकिट कसं रद्द करायचं ते बघायला पाहिजे. पण का? पुणे प्रोग्रॅम कॅन्सल करायचा ? नाही नाही. मी काय म्हणते. बोल लवकर. आपण सिंहगडने जाऊ या का ?

माझ्या समोर बसलेली ती (लोकल गोष्टी-४)

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 22/07/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या समोर बसलेली ती ============================================= तारीख, वार, वेळ.. काही काही आठवत नाही आहे,आठवती आहे.. ती, फक्त ती.. माझ्या समोर बसलेली ती; मी पार्लं की सांताक्रुझ या पैकी कोणत्या तरी स्टेशनवर लोकलमध्ये चढले, ती माझ्या आधीच लोकल मध्ये बसलेली होती. लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती.. नाही..! गर्दी नव्हतीच. मला बसायला विंडो सीट मिळाली. ती वाऱ्याच्या दिशेस असलेल्या सिट वर बसलेली होती, खिडकीजवळची जागा रिकामी असून तिथे न बसता थोडंसं अंतर सोडून.. दुसऱ्या कोणाला ही तिथे बसता येऊ नये अशी. तशी मी सहसा बसायला जात नाही, दारा जवळच उभी राहते.. त्या दिवशी थोडा थकवा जाणवत होता..

आठवण आणि ……

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 22/07/2010 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
आठवण आणि …… वादळ, वारा, पावसातहि भेटीस येणे अपूर्व होते, प्रीतिचे ते क्षण उन्मादी मनांत माझ्या ठसले होते प्रेमकहाणी विफल आपुली प्रारब्धाचे देणे होते, विधिलिखित हे भालीचे त्या समयी मज कळले नव्हते. निशब्द अधिकार तुजवर बिम्बवित मी गेलो नसतो, स्वप्न मोगरा फुलवीत मनींचा सुगंधित मी जाहलो नसतो. जीर्ण घराच्या मज भिंतीवरची तसविर तुझी चिरतरुण आहे, गाली खळी अन ओठ गुलाबी त्यांत आजहि तसेच आहे निरंजन वहाळेकर
काव्यरस