Skip to main content

कापुसकोंड्याची गोष्ट....... म्हणजे नक्की कोणती गोष्ट

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी गुरुवार, 29/07/2010 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
.... लहानपणी आपल्यातल्या बहुतेक सगळ्यांनीच हि गोष्ट ऐकली असेल.... ... जेंव्हा गोष्ट ऐकायची इच्छा व्हायची आणि घरातल्या कोणत्या तरी मामा कडे (कारण असल्या गोष्टी सांगण्यात मामा लोकांचाच उत्साह जास्त असतो) गोष्टीची फर्माईश व्हायची...तेंव्हा मामा सुरू व्हायचा... ....कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?.....मग ते पुढलं कधिही न संपणारं गुर्‍हाळ चालु व्हायचं... मामा : कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?.... मी : सांग... मामा : सांग काय म्हणतीस्....कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का? मी : सांग ना रे मामा... मामा : मी : सांग ना रे मामा...काय म्हणतीस? .कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का? ........... ......... ...... ..

लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी (लोकल गोष्टी )

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 29/07/2010 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी ============================================ फेरीवाले आणि भिकारी यांचा सगळ्यात जास्त सुळसुळाट लेडीज डब्यातच असावा.. त्यात पुरूष फेरीवाले आणि भिकारी ही आलेच. आंधळ्या भिकाऱ्यांना तर लेडीज डबे अगदी अचूकपणे ओळखता येतात.. कधीही न चुकता ते या डब्यांमधून सहज चढ-उतर करतात.. डब्यात चढल्यावर मात्र त्यांना समोर उभ्या असलेल्या बायका दिसत नाहीत. कोणत्याही टीसीने आजवर भिकाऱ्यांना हटकलेलं मी पाहिलेलं नाही.. फेरीवाल्यांना मात्र कधी कधी डब्यातून उतरवलं जातं. नेहमीच दंड किंवा शिक्षा केली जाते असं नाही. ते एका डब्यातून उतरून दुसऱ्या डब्यात चढतात.. पाळली जात नसली तरी..

संस्थळी प्रतिसाद देता

लेखक शुचि यांनी गुरुवार, 29/07/2010 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवीत्वा अन्न हे पूर्णब्रम्ह उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म जय जय रघुवीर समर्थ च्या चालीवर - संस्थळी प्रतिसाद देता सौजन्य सांडूनच चाला महाभारत होते सौजन्य सांडता फुकाचे शब्दाने शब्द वाढे शब्द हे आगलावे फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ
काव्यरस

मळ्यातली सहल

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 29/07/2010 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो. संध्याकाळचे ४:३० वाजून गेले होते. पावसाळ्याचे वातावरण अन मला घरी पोहोचण्यासाठी २ तासाचा हायवे वरचा प्रवास असल्याने मी लवकर निघण्याची घाई करत होतो. मामा गेल्यानंतर मळ्याचा कारभार मामींनीच हातात घेतला होता.मीही बर्‍याच दिवसात मळ्यात गेलेलो नव्हतो म्हणून मामींनी फारच आग्रह केल्याने मी त्यांच्या मळ्यात जाण्याचे ठरवले.

कलात्म

लेखक नीधप यांनी बुधवार, 28/07/2010 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
योग्य विभाग न लक्षात आल्यामुळे जनातलं मनातलं मधे हे टाकतेय. ------------------------------- महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कलाजगताबद्दल एक विशेषांक काढला आहे माइंड अ‍ॅण्ड मिडीया या संस्थेने. एकूण दोन भागात असलेल्या या विषेशांकाचे नाव कलात्म असे आहे. अतिथी संपादक स्वतः डॉ. श्रीराम लागू आहेत. ऐल आणि पैल असे दोन भाग आहेत. एकूण मिळून साधारण ८० लेख आहेत. रवी परांजपे, डॉ.

अघटीत

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 28/07/2010 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य गारठला, चंद्र विझला जेव्हा माणसाने माणुसकीचा बळी दिला... तारे हरपले, अवकाश संपले, जेव्हा प्रेम हृदयाला सोडून गेले...
काव्यरस

मी अनुभवलेली अमेरीका

लेखक शुचि यांनी बुधवार, 28/07/2010 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सासूबाईंचा अनुभव त्यांच्या शब्दात - अमेरीकेत प्रवेश म्हणजे स्वर्गात प्रवेश मिळण्यापेक्षादेखील कठीण हे आजूबाजूंचांकडून ऐकून होते पण याचा साक्षात अनुभव आला काही एक वर्षांपूर्वी. कॉन्सुलेट्च्या फेर्‍या आणि त्यांचे १७६० फॉर्म्स भरता भरता नाकी नऊ आले होते, जीव मेटाकुटीला आला होता. दर वेळेस कॉन्सुलेटला जाते वेळी सिद्धीविनायकाचं दर्शन घडत असे आणि बाप्पाची आळवणी पण तो सोनियाचा दिनु काही उगवत नव्हता. आपल्या इंडीयन लोकांना तुमचा मुलगा जर "आय टी" मधे असेल आणि अमेरीकेत असेल तर व्हिसा मिळणं बरच सुकर होतं.